Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गॅस इंधन तयार करण्यास आणि इतर गोष्टींवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने तयार केले 6000 कोटींचे बजेट

Coal Gasification

Image Source : www.livemint.com

Coal Gasification: देशात कोळश्यापासून गॅस इंधन तयार करण्याच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार 6,000 कोटी रुपयांच्या योजनेचा विचार करत आहे. कोळश्यापासून गॅस इंधन निर्मिती केल्यास नैसर्गिक वायू, मिथेनॉल आणि इतर आवश्यक उत्पादनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि कोळसा क्षेत्रात क्रांती होईल अशी भूमिका सरकारने मांडली आहे.

Fuel Produced From Coal: गेल्या काही महिन्यांपासून अनेक कारणांमुळे गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला प्रचंड झळ पोहचत आहे. आता तर सरकारने गॅस वर दिली जाणारी सबसिडी देखील जवळ जवळ बंद केली आहे. त्यामुळे आता गॅस इंधनासाठी इतर पर्यायी साधनांचा विचार केला जातोय.

सरकार देशात कोळशापासून गॅस इंधनाच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी 6,000 कोटी रुपयांची योजना आणण्याचा विचार करत आहे. शुक्रवारी अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. कोळसा, लिग्नाइटपासून गॅस इंधन बनवण्याच्या योजनेसाठी युनिट्सची निवड पारदर्शक आणि स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे केली जाईल, अशी माहिती कोळसा मंत्रालयाने दिली.

सरकारी आणि खाजगी क्षेत्राचा समावेश

या योजनेत दोन विभाग असेल. पहिल्या ब्लॉकमध्ये, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (पीएसयू) समर्थन देईल, तर दुसऱ्या ब्लॉकमध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम दोन्हींचा समावेश असेल. या विभागांतर्गत किमान एक प्रकल्प शुल्क-आधारित बोली प्रक्रियेद्वारे निवडला जाईल. त्याचे निकष ठरवण्यासाठी NITI आयोगाचा सल्ला घेतला जाईल.

100 दशलक्ष टन गॅस निर्मितीचे उद्दिष्ट

निवेदनानुसार, तिसर्‍या विभागात प्रकल्पांचे प्रात्यक्षिक, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर आणि लघु-उत्पादन-आधारित गॅस इंधन निर्मिती संयंत्रांसाठी अर्थसंकल्पीय समर्थनाची तरतूद समाविष्ट आहे. 2029-30 पर्यंत कोळशापासून 100 दशलक्ष टन गॅस निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.