Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Honda Dio 125: होंडाने लाँच केली डिओ स्कूटर; TVS Ntorq ला देणार टक्कर, अफलातून फिचर्स चेक करा

Top 5 scooters

Image Source : www.bikedekho.com

होंडा कंपनीने 125cc श्रेणीतील तिसरी स्कूटर लाँच केली आहे. ही गाडी TVS Ntorq, हिरो कंपनीची डेस्टिनी आणि सुझुकीची अॅक्सेस 125 ला टक्कर देणार आहे. होंडाच्या Grazia आणि Activa या दोन गाड्या 125 सीसी श्रेणीमध्ये आधीपासून आहेत. होंडा डिओ गाडीची फिचर्सही अफलातून आहेत.

Honda Dio 125 launch: होंडा कंपनीने 125cc श्रेणीतील तिसरी स्कूटर लाँच केली आहे. ही गाडी TVS Ntorq, हिरो कंपनीची डेस्टिनी आणि सुझुकीची अॅक्सेस 125 ला टक्कर देणार आहे. होंडाच्या Grazia आणि Activa या दोन गाड्या 125 सीसी श्रेणीमध्ये आधीपासून आहेत. त्यात आता आणखी एका गाडीची भर पडली आहे. डिओ 125 गाडीची किंमत 83,400 रुपयांपासून पुढे सुरू आहे.

डिओ 125 गाडीची फिचर्स

यापूर्वी होंडा कंपनीने डिओ स्कूटर 110cc मध्ये लाँच केली होती. मात्र, आता 125cc मध्ये आणली आहे. या गाडीच्या इंजिनला एनहान्स स्मार्ट पॉवर बूस्ट, आयडील स्टॉप बटन, साइड स्टँड इंडिकेटर, गाडीचे शीट अनलॉक करण्यासाठी स्वीच, एक्स्टरनल फ्युअल लीड, टेलिस्कोपिक सस्पेन्शन, 171 एमएम गाउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. सोबतच गाडीचे डिझाइन अधिक आकर्षक करण्यात आले आहे. यंग ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डिओ 125 गाडी बनवण्यात आली आहे.

होंडा डिओ आणि टीव्हीएस एनटॉर्कमधील फिचर्समधील तुलना 

फिचर्सच्या बाबतीत टीव्हीएस Ntorq होंडा डिओ 125 पेक्षा सरस आहे. होंडा डिओचे टॉप मॉडेल आणि टीव्हीएस Ntorq चे मिड रेंजमधील गाडीची तुलना केली तरी TVS चे फिचर्स चांगले आहेत. LED DRLs, ऑटोमॅटिक हेडलँप, जीपीएस नेव्हिगेशन, युएसबी चार्जिंग पोर्ट, मोबाईल कनेक्टिव्हीटी अशी फिचर्स टीव्हीएस Ntorq ला देण्यात आली आहे. Ntorq च्या टॉप मॉडेलमध्ये व्हॉइस असिस्टंट फिचरही देण्यात आले आहे. जे होंडाच्या डिओ स्कूटरमध्ये नाही.

होंडा डिओमधील स्मार्ट की फिचर्स चांगले आहे. गाडी चालू करण्यासाठी चावी लागण्याची गरज नाही. स्मार्ट की ने गाडी सुरू करू शकता. ACG स्टार्टरद्वारे गाडी बटनाद्वारे चालू आणि बंद करता येते. लास्ट पार्क लोकेशन असिस्टंट हे फिचर दोन्ही गाड्यांमध्ये आहेत. त्यामुळे या स्कूटर खरेदीचा विचार करत असाल तर जी फिचर्स तुमच्या जास्त उपयोगाला येतील, ती गाडी घेतलेले योग्य राहील.