तुम्हाला भारतातील टॉप 10 श्रीमंत व्यक्ती कोण आहेत माहित आहेत का? संपूर्ण दहाच्या 10 माहित नसतील. पण अंबानी, अदानी ही नावे तर नक्की माहित असतील. पण याचबरोबर आणखीही काही भारतीय आहेत; जे अब्जाधीश आहेत. ज्यांचे जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आदराने नाव घेतले जाते.
ज्याप्रमाणे भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढू लागली आहे. तसेच जागतिक पातळीवर सुद्धा त्याची संख्या वाढत आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2022 च्या फोर्ब्सच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत (Forbes 2023 World's Billionaires List) 166 भारतीयांची नावे होती. त्यात यावर्षी 3 जणांनी भर पडली असून ती आता 169 वर पोहोचली आहे.
भारतातील श्रीमंत व्यक्तींचा विचार करता रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 98.1 बिलिअन इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अदानी ग्रुपचे गौतम अदानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 50.6 बिलिअन इतकी आहे. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India)चे सायरस पुनावाला हा 27.5 बिलिअन इतक्या संपत्तीने भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
वर्ल्ड टॉप 10 मध्ये अमेरिकेतील 8 उद्योगपती
फोर्ब्स द्वारे दरवर्षी श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली जाते. यावर्षीची म्हणजेच 2023 ची भारतातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्सने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर फोर्ब्सकडून रिअल टाईममध्ये जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींची नावे, त्यांची संपत्ती अपडेट केली जाते. सध्या जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये अमेरिकेतील 8 उद्योजक आहेत. त्याच पहिल्या क्रमांकावर टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरचे मालक इलॉन मस्क (250.4 बिलिअन डॉलर) पहिल्या क्रमांकावर आहेत. फ्रान्सचे बर्नाड अर्नॉल्ट आणि फॅमिली हे 245.7 बिलिअन डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अॅमेझॉनचे जेफ बेझॉस हे 157.3 बिलिअन डॉलर्स संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारतात अंबानी, अदानी आणि पुनावाला यांच्यानंतर एचसीएल टेक्नॉलॉजीसचे शिव नदार, जेएसडब्ल्यू ग्रुपच्या सावित्री जिंदाल आणि फॅमिली, सन फार्मास्युटिक्लचे दिलीप संघवी, डीमार्टचे राधाकिशन दमाणी, अर्सेलर मित्तलचे लक्ष्मी मित्तल, आदित्या बिर्ला ग्रुपचे कुमार बिर्ला आणइ कोटक महिन्द्रा बँकेचे उदय कोटक यांचा टॉप 10 मध्ये नंबर लागतो.
भारतातील टॉप 10 श्रीमंत महिला
भारतातील टॉप 10 श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत सावित्री जिंदाल यांचा 5 वा क्रमांक लागतो. तर भारतातील श्रीमंत महिला उद्योगांच्या यादीत त्यांचा पहिला क्रमांक येतो.
- सावित्री जिंदाल
- रोशनी नदार मल्होत्रा
- फालगुनी नायर
- किरण मझुमदार शॉ
- निलीमा मोटापार्टी
- राधा वेम्बू
- लीना गांधी तिवारी
- अनु आगा आणि मेहर पद्मजी
- नेहा नारखेडे
- रेणू मुंजल