Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air Conditioner price down: पावसाची चाहूल लागताच एसीचे दर गडगडले, ऑफरनंतर आता ग्राहकांची झुंबड

Air Conditioner price down: पावसाची चाहूल लागताच एसीचे दर गडगडले, ऑफरनंतर आता ग्राहकांची झुंबड

Image Source : www.newindianexpress.com

Air Conditioner price down: पावसाची चाहूल लागल्यानंतर आता अनेक ठिकाणी गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गारवा वाढवणारे एअर कंडिशनर काहीसे मागे पडले. मात्र आगामी उन्हाळा डोळ्यासमोर ठेऊन आताच त्याची खरेदी काही ठिकाणी जोरात सुरू झाली आहे. याला कारण भन्नाट आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल (Amazon prime day sale) 2023 लाइव्ह झाला आहे. हा सेल दोन दिवस चालेल आणि त्याचा शेवटचा दिवस 16 जुलै असणार आहे. याठिकाणी विक्रीतल्या प्रत्येक श्रेणीतल्या वस्तूंवर एकापेक्षा जास्त सूट दिली जात आहे. विशेषत: अप्लायन्सेसबद्दल बोलायचं झाल्यास, ग्राहकांना किमान 35 टक्के सूट देऊन एसी (Air Conditioner) , फ्रिज (Fridge), वॉशिंग मशीन (Washing machine) खरेदी करता येणार आहे. विशेषत: एसीबद्दल बोलायचं झाल्यास उन्हाळ्यात त्याची किंमत गगनाला भिडते आणि त्यामुळेच अनेकांना इच्छा असूनही ते विकत घेता येत नाही. न्यूज 18नं हे वृत्त दिलं आहे.

ब्रँडेड एअर कंडिशनरच्या किंमतीत घट

अनेक लोक एसी खरेदी करण्यासाठी ऑफर किंवा विक्रीची वाट पाहत असतात. दरम्यान, आता तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण पाऊस पडताच ब्रँडेड एअर कंडिशनरच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. एसीवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल माहिती घेऊ.

व्होल्टास 1.4 टन 3 स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी: 

हा एसी सेलमध्ये 55 टक्के सवलतीनंतर 31,990 रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे. हा एसी मध्यम आकाराच्या खोलीसाठी तयार करण्यात आला आहे. व्होल्टासचा स्प्लिट एसी धूळविरोधी, प्रतिजैविक संरक्षण, स्व-निदान यासारख्या विशेष वैशिष्ट्यांसह येतो.

लॉयड 1.5 टन 3 स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी: 

हा एसी 45 टक्क्यांच्या सवलतीत सेलमध्ये खरेदी केला जाऊ शकता. त्यानंतर त्याची किंमत 32,990 रुपये झाली आहे. लॉयडचा स्प्लिट एसी व्हेरिएबल स्पीड कंप्रेसरसह येतो जो खोलीतील तापमान आणि उष्णतेच्या भारानुसार वीज वापर आपोआप अ‍ॅडजस्ट करतो. हा एसी अत्यंत कमी आवाज करतो. यात टर्बो कूल मोड, क्लीन फिल्टर इंडिकेशन, ऑटो रीस्टार्ट यासारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

एलजी 1.5 टन 5 स्टार ड्यूअल इन्व्हर्टर स्प्लिट एसी: 

तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून हा एसी 41 टक्के सवलतीत खरेदी करू शकता. त्यानंतर त्याची किंमत 41,490 रुपये होईल. एलजीचा स्प्लिट एसी 6 फॅन स्पीडसह येतो. त्याचबरोबर स्मार्ट डायग्नोसिस सिस्टम आणि म्यूट फंक्शनदेखील यात आहेत.