जून महिना संपून जुलै महिना सुरू झाला आहे. याच जुलै महिन्यापासून नवीन आर्थिक तिमाहीची सुरुवात झाली आहे. खासगी क्षेत्रातील वीज उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यु एनर्जीने (JSW Energy) शुक्रवारी 14 जुलै 2023 रोजी जून तिमाहीतील कंपनीच्या नफ्याबद्दल सविस्तर माहिती दिली. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 554.78 कोटी रुपये होता. या तिमाहीत त्यामध्ये घट नोंदवण्यात आली आहे. ही घट नेमकी किती आहे? ती होण्यामागे नेमके कारण काय, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
नफ्यात घट होण्याचे कारण जाणून घ्या
खासगी क्षेत्रातील वीज उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यु एनर्जी (JSW Energy) कंपनीने शुक्रवारी जून तिमाहीतील नफ्याची माहिती जाहीर केली. यातील माहितीनुसार जून तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात 47.66 टक्क्यांची घट झाली आहे. ही घट पकडून कंपनीचा नफा या तिमाहीत 290.35 कोटी रुपयांवर आला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 554.78 कोटी रुपये होता. ज्यामध्ये यावर्षी घट नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मित्रा (Mytrah) अधिग्रहण आणि इंड बाराथसोबत 700 मेगावॅट थर्मल एनसीएलटी डील सारख्या एकरकमी मोठ्या खर्चामुळे जून तिमाहीत जेएसडब्ल्यु एनर्जी कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे.
एकूण महसुल आणि ऑपरेटिंग प्रॉफिटबद्दल जाणून घ्या
जेएसडब्ल्यु एनर्जीने दिलेल्या माहितीनुसार जून तिमाहीत कंपनीच्या एकूण महसूलात घट पाहायला मिळाली आहे. या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 3,013.22 कोटी रुपये इतका आहे. मागील वर्षी याच तिमाहीत तो 3,115.33 कोटी रुपये होता. याउलट कंपनीच्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ पकडून कंपनीने या तिमाहीत 1,307 कोटी रुपये कमावले आहेत. मागील वर्षी हेच प्रॉफिट केवळ 1,111 कोटी रुपये होते. तसेच कंपनीचे EBITDA मार्जिन 43 टक्क्यांनी वाढले आहे. जे मागील वर्षी 36 टक्क्यांपर्यंत मर्यादित होते.
उत्पादन क्षमतेमध्ये वाढ
जून तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पादन वार्षिक आधारावर 14 टक्क्यांनी वाढले आहे. ते वाढून 6.7 मिलियन युनिट पर्यंत पोहचले. यापूर्वी मागील वर्षात कंपनीने ऑपरेशनल क्षमतेत सुधारणा करून उत्पादन क्षमता 6,564 मेगावॅटपर्यंत पोहचवली होती.
शेअर्सची कामगिरी जाणून घ्या
या दरम्यान जेएसडब्ल्यु एनर्जीचे (JSW Energy) शेअर्स एनएसीईवर (NSE) 1.57 टक्क्यांनी वाढून 303.60 रुपयांनी बंद झाले. मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 15.72 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तर मागील एका वर्षात शेअर्समध्ये 32.72 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
Source: hindi.moneycontrol.com