आपण चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांना भेट देतो. देशात PVR, INOX आणि CINEMAX यासारखे मल्टीप्लेक्स कार्यरत आहेत. याठिकाणी मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किंमती अतिशय महाग आहेत. याशिवाय बाहेरील खाद्यपदार्थ सिनेमागृहात घेऊन जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना पॉपकॉन, चिप्स इत्यादी गोष्टी खाण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येत नाही. मात्र आता PVR आणि INOX या मल्टिप्लेक्सने खाद्य पदार्थांच्या किंमतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका युजरने सिनेमागृहातील खाद्य पदार्थांच्या किंमतीबाबत तक्रार पोस्ट केली होती. त्याची दखल घेत PVR आणि INOX या मल्टिप्लेक्सने खाद्य पदार्थांच्या आणि पेयांच्या किंमतीत 40 टक्क्यांची कपात केली आहे. या सिनेमागृहांनी सोमवार ते गुरुवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत बर्गर, समोसे आणि सँडविच परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
असा निर्णय घेण्याचे कारण जाणून घ्या
सोशल मीडियावरील एका युजरच्या तक्रारीवरून कंपनीने खाद्य पदार्थांच्या आणि पेयांच्या किंमती कमी केल्याचे दिसून आले आहे. साधारण 10 दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया युजरने खाद्यपदार्थ आणि पेयांच्या किंमतीबाबतची तक्रार सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्रिदीप नावाच्या एका युजरने नोएडा येथील PVR मध्ये सिनेमा पाहायला गेल्यावर पॉपकॉर्न आणि ड्रिंक्सच्या बॉक्ससाठी 820 रुपये चार्ज केले होते. त्रिदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार 55 ग्रॅम पनीर पॉपकॉर्नसाठी 460 रुपये, तर 600 मिली पेप्सीसाठी 360 रुपये आकारले होते. यावर त्रिदीप यांनी सोशल मीडियावर कुटुंबासोबत चित्रपट पाहणे परवडणारे नसल्याचे सांगत पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली. अखेर 10 दिवसानंतर PVR ने त्रिदीप यांच्या पोस्टला उत्तर देत त्याच्या मताचा आदर केला आहे.
नवीन खाद्यपदार्थ आणि पेयांच्या किंमती जाणून घ्या
सोमवार ते गुरुवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या दरम्यान PVR ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत खाद्यपदार्थ आणि पेय उपलब्ध करून देणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 99 रुपयांमध्ये बर्गर आणि समोसा मिळणार आहे. तसेच सँडविच व 450 मिलीच्या पेप्सी देखील याच किंमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय अनलिमिटेड विकेंड ऑफर शनिवार आणि रविवारसाठी सुरू करण्यात आली आहे.
Source: hindi.financialexpress.com