Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Rules: जगभरातील क्रिप्टो कंपन्यांसाठी नियमावली तयार; G-20 बैठकीत मसुद्यावर चर्चा

Cryptocurrency

Image Source : www.thenewscrypto.com

क्रिप्टो करन्सी कंपन्यांवर अद्यापही जागतिक स्तरावर नियम किंवा कायदे नाहीत. या आभासी चलनातील गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर क्रिप्टो व्यवहार आणि कंपन्यांवर फायनान्शिअल स्टॅबिलीटी बोर्डने (FSB) नियमावली तयार केली आहे. FSB ही एक जागतिक संघटना आहे. G-20 बैठकीत या नियमांवर चर्चा होणार आहे.

Crypto Rules: क्रिप्टो करन्सीतील व्यवहार जगभर चालतात. अनेकजण या आभासी चलनामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मात्र, हे क्षेत्र अनियमित आहे. मागील काही वर्षांमध्ये जगभरातील क्रिप्टो एक्सजेंच कंपन्या बुडाल्याच्या घटना घडल्या. तसेच या कंपनीच्या मालकांवर गैरव्यवहार, अनियमितपणाचे खटलेही दाखल झाले. त्यामुळे जागतिक स्तरावर किप्टो कंपन्यांसाठी नियमावली बनवण्याचे काम सुरू होते. जागतिक स्तरावरील फायनान्शिअल स्टॅबिलिटी बोर्ड (SBF) ने याबाबत नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. 

G20 - बैठकीत नियमांवर होणार चर्चा 

जगभरातील क्रिप्टो कंपन्यांसाठी नियम तयार करण्यात आले आहेत. मात्र, या नियमांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. G-20 परिषदेच्या बैठका यावर्षी भारतामध्ये घेण्यात येत आहेत. यातील अर्थमंत्र्यांच्या बैठकीत या मसुद्यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच G20 परिषदेच्या सल्ल्यानुसारच हे नियम तयार करण्यात आले आहे. क्रिप्टो कंपनी दिवाळखोरीत निघू नये, कोणतेही गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी नियम आखण्यात आले आहेत.

कठोर नियमावलीसाठी भारत आग्रही

क्रिप्टो कंपन्या आणि संबंधित व्यवहारांसाठी कठोर नियमावली असावी, अशी भूमिका भारताने घेतली आहे. (Rules for crypto companies) काही महिन्यांपूर्वी भारताने क्रिप्टो व्यवहार मनी लाँड्रींग कायद्याखाली आणले आहेत. मात्र, क्रिप्टो व्यवहार जागतिक स्तरावरून चालतात त्यामुळे सर्व देशांमध्ये एकसमान कायद्यांची गरज पुढे येत आहेत. त्यासाठी G-20 देशांनी पुढाकार घेतला आहे. 

क्रिप्टो बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी प्रयत्न   

क्रिप्टो व्यवहारातील अस्थिरता कमी करण्यासाठी हे नियम बनवले आहेत. क्रिप्टो गुंतवणुकीतील सर्व बाबींवर अद्याप नियम तयार झालेले नाहीत. (Crypto currency companies regulation) मात्र, येत्या काळात जगभरात क्रिप्टोबाबत समान कायदे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. FSB ने तयार केलेले नियम भारतासाठी पुरेस नसल्यास देशांतर्गत कठोर नियम आखण्यात येतील. अतिरेकी कायवायांसाठी क्रिप्टो करन्सीद्वारे पैशांचा पुरवठा होऊ नये यासाठीही भारत आग्रही आहे. 

"पुढील आर्थिक संकट क्रिप्टोमुळे"

देशावर पुढील आर्थिक संकट क्रिप्टो करन्सीच्या रुपाने येईल, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच एका कार्यक्रमात म्हटले होते. या आभासी चलनावर सरकारी नियंत्रण नसल्याने आर्थिक संकट उभे राहील असेही त्यांनी म्हटले होते. मागील वर्षी जगातील सर्वात मोठा क्रिप्टो एक्सजेन्स FTX कोसळला. तर इतर अनेक एक्सचेंजवर गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत.