Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Behavioral Ads: लोकांच्या आवडीनिवडीनुसार जाहिरात दाखवण्यास फेसबुक, इन्स्टाग्रामवर बंदी; 'या' देशाने घेतला कठोर निर्णय

social media ads

Image Source : www.mobilemarketingreads.com

फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर युझर्सच्या आवडीनिवडीनुसार जाहिरात दाखवण्यास नॉर्वे देशाने बंदी घातली आहे. जर मेटाने या नियमाचे उल्लंघन केले तर प्रतिदिन लाखोंचा दंडही आकरण्यात येईल. लोकांच्या माहितीचा गैरवापर होत असल्याचे नॉर्वे सरकारचे म्हणणे आहे.

Meta Behavioral Ads Ban: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतरही अनेक सोशल मीडिया साइट्स अनेकजण वापरतात. या सोशल माध्यमांना जाहिरातींतून उत्पन्न मिळते. जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी ही माध्यमे युझर्सला काही ठराविक जाहिरातीच दाखवतात. ज्या त्याच्या आवडीनिवडीनुसार असतात. मात्र, युझर्सला अशा जाहिराती दाखवण्यास फेसबुक, इन्स्टाग्राम यांची मालकी असलेल्या मेटाला नॉर्वे देशाने बंदी घातली आहे.

युझर्सचा जाहिरातींद्वारे पाठलाग

वापरकर्त्यांना यापुढे मेटा कंपनी त्यांच्या आवडीनिवडी, वैयक्तिक माहिती यानुसार जाहिराती पाठवू शकत नाही. समजा, तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल आणि फेसबुकवर तुम्ही ट्रेकिंगसंबित माहिती वाचत असाल तर फेसबुक तुम्हाला ट्रेकिंग गॅझेट्स जसे की बूट, सेफ्टी हेल्मेटसह इतर उत्पादनांच्या जाहिराती दाखवते. मात्र, यापुढे मेटाला असे करता येणार नाही. पर्सनलाइज्ड जाहिराती दाखवण्यास मेटाला बंदी घातली आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास दंड

मेटा कंपनीने जर या नियमांचे उल्लंघन केले तर प्रतिदिन 10 लाख Norwegian Kron एवढा दंड आकारण्यात येईल. युझर्सची वैयक्तिक माहिती चुकीच्या पद्धतीने वापरू नये, यासाठी नॉर्वे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. सोशल मीडिया अॅप्स युझर्सला त्याच्या आवडीनिवडीवरुन ट्रॅक करत राहतात. त्यामुळे त्याला इतर कोणत्याही वस्तू दाखवल्या जात नाही. यास आता आळा बसेल.

युरोपियन यूनियन न्यायालयात मेटा विरोधात निकाल  

नागरिकांची परवानगी नसतानाही मेटा त्यांची वैयक्तिक माहिती वापरत असल्याचा निर्णय युरोपियन युनियनच्या न्यायलयाने 4 जुलैला दिला होता. त्यानंतर नॉर्वे देशाने मेटावर निर्बंध आणले आहेत. ही बंदी तात्पुरत्या स्वरुपात असल्याचेही बोलले जात आहे. युझर्सची माहिती कशी वापरायची यावर तोडगा निघाल्यावर ही बंदी उठवली जाऊ शकते. मात्र, जाहिरात करण्यासाठी युझर्सची वैयक्तिक माहिती वापरता येणार नाही.