Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NITI Aayog Report: पाच वर्षात 13.5 कोटी नागरिक झालेत गरीबीतून मुक्त, नीती आयोगाने केला रिपोर्ट सादर

Poverty Report Of NITI Aayog

Poverty Report Of NITI Aayog: NITI आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांनी प्रसिद्ध केलेल्या 'राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक: प्रगती पुनरावलोकन 2023' या अहवालात दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या पुढाकारामुळे पाच वर्षात 13.5 कोटी नागरिक गरीबीतून मुक्त झाले आहेत.

Poverty Report Of NITI Aayog: NITI आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांनी प्रसिद्ध केलेल्या 'राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक: प्रगती पुनरावलोकन 2023' या अहवालात दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या पुढाकारामुळे पाच वर्षात 13.5 कोटी नागरिक गरीबीतून  मुक्त झाले आहेत.  यामध्ये ग्रामीण भागात गरिबीत सर्वात वेगाने घट झाली आणि ती 32.59 टक्क्यांवरून 19.28 टक्क्यांवर आली. त्याच वेळी, शहरी भागातील दारिद्र्य 8.65 टक्क्यांवरून 5.27 टक्क्यांवर आले आहे.

135 दशलक्ष लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर

मार्च 2021 रोजी समाप्त झालेल्या पाच वर्षांत 135 दशलक्ष लोक बहुआयामी (Multifaceted) दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. ज्याचे मोजमाप आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानातील सुधारणांद्वारे केले जाते. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यात गरिबीत सर्वात जलद घट नोंदवली गेली आहे, अशी माहिती नीती आयोगाच्या एका अहवालात सोमवारी देण्यात आली. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) च्या दुसऱ्या आवृत्तीनुसार, बहुआयामी दारिद्र्य 2015-16 मधील 24.85 टक्क्यांवरून 2019-2021 मध्ये 9.89 टक्क्यांनी घटून 14.96 टक्क्यांवर आले आहे आणि ते एकूण 32.59 टक्क्यांवरून 19.28 टक्क्यांवर घसरले आहे.

त्याच वेळी, शहरी भागातील दारिद्र्य 8.65 टक्क्यांवरून 5.27 टक्क्यांवर आले आहे. 2015-16 आणि 2019-21 दरम्यान विक्रमी 135 दशलक्ष लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले, असे NITI आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांनी प्रसिद्ध केलेल्या 'राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक: प्रगती पुनरावलोकन 2023' या अहवालात म्हटले आहे.

MPI च्या सर्व 12 पॅरामीटर्समध्ये सुधारणा

ऑक्सफर्ड विद्यापीठात UNDP आणि OPHI द्वारे जारी केलेल्या जागतिक MPI  (Message Passing Interface) च्या ताज्या अपडेटनुसार, 2005-2006 ते 2019-2021 या केवळ 15 वर्षांत भारतातील एकूण 415 दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. NITI आयोगाच्या अहवालात दारिद्र्य कमी होण्याचे श्रेय स्वच्छता, पोषण, स्वयंपाकाचे इंधन, आर्थिक समावेश, पिण्याचे पाणी आणि विजेची उपलब्धता सुधारण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना देण्यात आले आहे. MPI च्या सर्व 12 पॅरामीटर्समध्ये लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे म्हटल्या गेले आहे.

या राज्यात अधिक प्रगती

2015-16 आणि 2019-21 दरम्यान, MPI (Message Passing Interface) मूल्य 0.117 ते 0.066 पर्यंत जवळजवळ निम्मे झाले आणि गरिबीची तीव्रता 47 टक्क्यांवरून 44 टक्क्यांवर घसरली. तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये गरीबीच्या तीव्रतेत झपाट्याने घट झाली. NITI आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम म्हणाले की, 2030 च्या अंतिम मुदतीपूर्वी भारत SDG (Sustainable Development Goals) लक्ष्य 1.1 बहुआयामी दारिद्र्य किमान अर्धे साध्य करण्याच्या मार्गावर आहे.