भारतीय संरक्षण दल चीन आणि पाकिस्तान सीमेवर पाळत ठेवण्याच्या उद्देशाने 97'मेड-इन-इंडिया'ड्रोनची (Made In India Drone) खरेदी करणार आहे. अमेरिकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता भारतातच तयार केले जाणारे (Made in iIndia) आणखी 97 सक्षम असे ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भारत सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
10000 कोटी रुपये खर्च
पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेवर टेहळणी करण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सुरक्षादलांकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर असे ठरवण्यात आले आहे की भारतीय सैन्याला जमीन आणि समुद्र या दोन्हींवर लक्ष ठेवण्यासाठी मध्यम उंचीच्या आणि दीर्घ क्षमतेच्या 97 ड्रोनची आवश्यकता आहे. त्यानंतर सरकारकडून भारतीय बनावटीचे ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तब्बल 10,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या ड्रोनची क्षमता सतत 30 तास उड्डाण करण्या इतकी सक्षम आहे.
यापूर्वीचे 46 ड्रोन
सैन्य दलात दाखल होणारी हे 97 ड्रोन गेल्या काही वर्षांत तिन्ही सुरक्षा दलांच्या ताफ्यात समाविष्ट केले जातील तसेच हे ड्रोन या पूर्वीपासून सुरक्षा दलाच्या ताफ्यातील 46 ड्रोनच्या व्यतिरिक्त असतील. या ड्रोनमधील सर्वाधिक ड्रोन हे भारतीय वायू दलाच्या ताफ्यात सहभागी होतील. अगोदरच सेवेत असलेले ड्रोन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) द्वारे 'मेक-इन-इंडिया' च्या माध्यमातून मूळ ड्रोन निर्मात्या कंपनीच्या भागीदारीत अपग्रेड केले जात आहेत. त्यामध्ये 60 टक्क्यांहून अधिक उपकरणे ही भारतीय आहेत.