Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Unemployment Rate in India: शहरी बेरोजगारी 7.2 टक्क्यांपर्यंत घटली, पुरुष आणि महिलांच्या बेरोजगारीचा दरही घसरला

Unemployment Rate in India: NSSO च्या ताज्या आकडेवारीनुसार, शहरी भागातील पुरुषांसाठी (15 वर्षे आणि त्यावरील) बेरोजगारीचा दर 2022 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 6.5 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. हा दर एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत 8.3 टक्क्यांवर होता.

Read More

Joyalukkas jewellery group: दुबईला हवालाने कॅश ट्रान्सफर करणे भोवले! जॉयलुक्कास ज्वेलर्सच्या संपत्तीवर 'ईडी'ची टाच

Joyalukkas jewellery group:दक्षिण भारतातील मोठ्या ज्वेलर्सपैकी एक असलेल्या जॉयलुक्कास ज्वेलर्सला (Joyalukkas jewelers) दुबईत कॅश ट्रान्सफर करणे महागात पडले आहे. रोख निधी हस्तांतर करताना परदेशी चलन विनियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचनालयाने (ED) जॉयलुक्कास ज्वेलर्सची 305 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

Read More

Got a New Job? नवीन नोकरी लागल्यावर Financial Planning साठी 'या' 3 गोष्टी नक्की करा

Financial Planning: तुम्हाला ही भविष्यात आरामात आयुष्य जगायचे असेल, तर पैशाचे नियोजन आणि व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन नोकरी मिळाल्यावर कोणत्या 3 गोष्टी पहिल्यांदा करायच्या जाणून घ्या.

Read More

PPF Account for Children: लहान मुलांचे सुद्धा पीपीएफ अकाउंट काढता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Public Provident Fund: पीपीएफ खात्यात गुंतवणूक करणाऱ्यांना कर सवलतीचा लाभ मिळतो. या योजनेत ग्राहकांना 80C अंतर्गत कर सवलत मिळते. तुमच्या मुलांनाही सरकारकडून PPF खाते (PPF Scheme) काढण्याची सुविधा आता दिली जाणार आहे. ज्या प्रकारे पालकांना PPF मध्ये अनेक फायदे मिळतात, तसेच फायदे मुलांना देखील आता मिळणार आहेत.

Read More

Fraud calls: सावधान! बँक, विम्यासंबंधीत फेक कॉल्सचा भडीमार; 'या' राज्यातून येतात सर्वाधिक बनावट कॉल?

बनावट कॉल सेंटर्सद्वारे फेक कॉल (Fraud calls) येण्याचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढतच आहे. दुसऱ्या राज्यातून फोन येत असल्यामुळे तक्रारी सहसा दाखल होत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांची अशा कॉल्सद्वारे फसवणूक होते. बँकिंग सेवा आणि विमा क्षेत्रासंबंधीत सर्वाधिक फेक कॉल ग्राहकांना येतात. कोणत्या राज्यातून सर्वाधिक फेक कॉल्स येतात पाहा. तसेच कॉल कोणत्या वेळी जास्त येतात याचीही माहिती जाणून घ्या.

Read More

IPL ने पुरुषांच्या क्रिकेटचा झाला तसा फायदा WPL मुळे महिला क्रिकेटचा होईल का?  

Women’s Premier League : BCCI ने IPL च्या धर्तीवर महिलांसाठी विमेन्स प्रिमिअर लीग (WPL) ची घोषणा केली. आणि म्हणता म्हणता 3 मार्चपासून महिलांच्या T20 मॅचेसना सुरुवातही होणार आहे. या स्पर्धेचा महिला क्रिकेटला नेमका कसा फायदा होईल. आणि महिला क्रिकेटची आर्थिक घडी यामुळे बसू शकेल का?

Read More

world recession impact : ‘जगात मोठी मंदी नाही पण अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने,’ शक्तिकांत दास काय म्हणाले ते जाणून

RBI governor शक्तिकांत दास यांनी जागतिक मंदीसह अनेक प्रश्नांवर भाष्य केले आहे. ‘जगाला मोठ्या मंदीचा सामना करावा लागणार नाही,’ यासह त्यांनी आणखी कोणत्या प्रश्नावर भूमिका मांडली आहे, ते जाणून घेऊया.

Read More

Ericsson layoff: आयटीनंतर टेलिकॉम क्षेत्रावरही संकट! एरिक्सन कंपनी 8500 कर्मचारी कपात करणार

टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी एरिक्सनने 8500 कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्यात येत आहे. त्यानंतर आता मंदीचे पडसाद टेलिकॉम क्षेत्रावरही दिसू लागले आहेत.

Read More

Pradhan Mantri Awas Yojana : औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत टेंडर घोटाळा

औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात औरंगाबादच्या सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

Narayana Murthy on Moonlighting: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मूनलाईटिंगबाबत मांडले परखड मत म्हणाले...

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मूनलाईटिंगबाबत इन्फोसिसच्या संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी परखड मत मांडले आहे. तरुणांनी मूनलाईटिंगमध्ये पडू नये. भारताला प्रामाणिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी कार्यालयात येण्याला तरुण कर्मचाऱ्यांनी प्राधान्य द्यायला हवे, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे.

Read More

Reliance ने आणलेली पहिली Hydrogen Bus कशी आहे? ती आवाजही करत नाही आणि धूरही सोडत नाही

India’s First Hydrogen Bus : देशातली पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी बस लोकांना सेवा देण्यासाठी तयार आहे. ओलेक्ट्रा या कंपनीने रिलायन्सबरोबर सहकार्याने ही बस तयार केली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा खर्च तर कमी होणारच आहे शिवाय ही पर्यावरणपूरक इंधनावर बनलेली बस आहे.

Read More

Reliance Retail opens Gap store : रिलायन्स रिटेलने मुंबईत गॅप स्टोअर उघडला, भारतातील पहिला फ्री-स्टँडिंग शोरूम

रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) शुक्रवारी मुंबईत पहिले फ्रीस्टँडिंग गॅप स्टोअर उघडण्याची घोषणा केली. रिलायन्स रिटेलने मुंबईत प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड GAP चे पहिले फ्री-स्टँडिंग स्टोअर उघडले आहे.

Read More