Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Reliance Retail opens Gap store : रिलायन्स रिटेलने मुंबईत गॅप स्टोअर उघडला, भारतातील पहिला फ्री-स्टँडिंग शोरूम

रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) शुक्रवारी मुंबईत पहिले फ्रीस्टँडिंग गॅप स्टोअर उघडण्याची घोषणा केली. रिलायन्स रिटेलने मुंबईत प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड GAP चे पहिले फ्री-स्टँडिंग स्टोअर उघडले आहे.

Read More

Air India hiring: एअर इंडियात मेगा भरती! 900 पायलट आणि 4 हजारांपेक्षा जास्त 'केबिन क्रू' ची गरज

एअर इंडियामध्ये मेगा भरती होणार असून जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. एअर इंडिया तब्बल 4200 केबिन क्रू आणि 900 पायलट्सची भरती करणार आहे. 2023 म्हणजे चालू वर्षातच ही मेगा भरती होणार आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींनी या संधीचा फायदा घ्यायला हवा.

Read More

Share Market Closing : सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, ऑटो, मेटल, बँकिंग स्टॉकमध्ये सर्वाधिक घट

Share Market Closing : सलगपणे 6 दिवस आणि या आठवड्याचे पाचही दिवस देशांतर्गत शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. शुक्रवारीही सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाला.

Read More

UPI : जी-20 देशांना भारताच्या UPI सेवेची भुरळ, ही सेवा स्वीकारण्याची अनेक देशांची तयारी

UPI : भारताला डिजिटक इकॉनॉमी बनवण्यासाठी डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये मागील काही वर्षात अनेक सुधारणा झाल्या आहेत. यात यूपीआय सेवा सरस ठरली आहे. सध्या सुरु असलेल्या जी-20 देशांच्या डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपच्या बैठकीत भारताच्या यूपीआय सेवेने सर्वांचे लक्ष वेधले.

Read More

Solapur onion farmer: शेतकऱ्याची क्रूर थट्टा! दहा पोते कांदे विकून हातात आले फक्त 2 रुपये

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर मार्केट यार्डात (Solapur APMC) 10 पोते कांदे विक्रीस आणले होते. या कांद्याला 1 रुपये किलो एवढा कमी भाव मिळाला. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने सर्व खर्च वजा केल्यानंतर दोन रुपयांचा चेक हातात दिला.

Read More

ED Latest Case: गुरु राघवेंद्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकाला अटक, 1000 कोटींहून अधिक रुपयांच्या गैरवापराचे प्रकरण

ED Latest Case: अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी राजेश व्हीआरला बेंगळुरूस्थित श्रीगुरु राघवेंद्र सहकारी बँकेविरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात अटक केली. या प्रकरणात 1000 कोटींहून अधिक लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

Read More

Relief for Zee Entertainment: झी विरोधातील दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तूर्त स्थगिती, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या

Relief for zee Entertainment: कर्जवसुलीसाठी इंड्सइंड बँकेने झी एंटरटेंमेंटविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करण्याच्या याचिकेला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या अपिलीय न्यायाधिकरणाने (The National Company Law Appellate Tribunal) स्थगिती दिली आहे. या निर्णयाने तूर्त झी एंटरटेंमेंटला दिलासा मिळाला.

Read More

Adani Group Crisis: अदानी समूहाची ‘ही’ मागणी फेटाळत न्यायालयाने केली महत्वपूर्ण टिप्पणी

Adani vs Hindenburg प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले आहे. असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या अदानी ग्रुपच्या भवितव्याशी जोडले आहेत. या पार्श्वभूमीवर याप्रकरणी न्यायालयात काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Aadhaar Card Franchise : भांडवल न लावता सुरु करा तुमचा व्यवसाय, सुरु करा स्वतःचे आधार सेवा केंद्र

Aadhar Seva Kendra: आधार सेवा केंद्र ही एक अशी सुविधा आहे जिथे व्यक्ती आधारसाठी नोंदणी करू शकतात, त्यांचे आधार तपशील अपडेट करू शकतात आणि आधारशी संबंधित इतर कामे करू शकतात. हे फ्रँचायझी मॉडेल आहे आणि व्यक्ती अधिकृत सेवा प्रदात्यासह भागीदारी करून आधार सुविधा केंद्र ऑपरेटर होण्यासाठी अर्ज करू शकतात.

Read More

Pune Bypoll Election : 231 लिटर दारू आणि 10 लाख रुपये रोख जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

पुणे जिल्ह्यातील चिंचवड (Chinchwad Bypoll Election)आणि कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ‘ड्राय डे ‘ घोषित करण्यात आला आहे. या दिवसात किरकोळ मद्यविक्रीला बंदी असणार आहे.

Read More

Pangolin scales seized: मुंबईत खवल्या मांजरांची तस्करी! तब्बल 30 लाखांचे खवले जप्त

मुंबईमध्ये खवल्या मांजरांची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडे 30 किलो मांजरांचे खवले (स्केल) आढळून आले. या खवल्यांची किंमत तब्बल 30 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या खवल्यांचा वापर औषध निर्मितीमध्ये केला जातो. मात्र, याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

Read More

Ajay Banga: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेकडून नामांकन मिळालेल्या अजय बंगा यांच्याबद्दल, या 10 गोष्टी जाणून घ्या

Know About Ajay Banga: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनी मास्टरकार्डचे माजी सीईओ 'अजय बंगा' यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केली आहे. जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) हे जूनमध्ये पदावरून पायउतार होणार आहेत. त्यामुळे या पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाला प्राधान्य दिले जात आहे. या निमित्ताने त्यांच्याबद्दल 10 गोष्टी जाणून घेऊयात.

Read More