Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Services sector exports: सेवा क्षेत्राची निर्यात 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते, वाणिज्य मंत्रालयाचा अंदाज

Services Sector Exports: परकीय व्यापार धोरण (FTP) मधील उपाय हे सेवा निर्यातीला आणखी चालना देण्यासाठी मदत करतील. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-जानेवारी या कालावधीत सेवा निर्यात 272 अब्ज डॉलर झाली आहे.

Read More

NPS New Rules: नॅशनल पेंशन स्कीममधून पैसे काढताना द्यावी लागणार 'ही' कागदपत्रे, 1 एप्रिलपासून होणार बदल

National Pension Scheme: PFRDA ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार केवायसी अपडेटसाठी (KYC Update) ग्राहकांना खालील कागदपत्रे देणे आवश्यक असेल. PFRDA ने सर्व नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की ग्राहकांची कागदपत्रे अनिवार्यपणे अपलोड केली जावीत आणि या कागदपत्रांची खात्री केली जावी. या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास NPS ग्राहकांचे पैसे रोखले जाणार आहेत.

Read More

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण सुरूच, सेन्सेक्सह निफ्टीची घसरणीने सुरुवात

Sensex Opening Bell: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला तर निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता.

Read More

आनंदाची बातमी! BDO कंपनी भारतात 25 हजार नोकरभरती करणार

सगळीकडून नोकरकपातीच्या बातम्या येत असताना नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. फायनान्शिअल सेवा पुरवणारी BDO कंपनी 25 हजार नोकरभरती करणार आहे. भारतातील पुणे, मुंबई सह अनेक मोठ्या शहरांत कंपनीची कार्यालये आहेत.

Read More

Pre-open Share Market: सलग आठवडाभर झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराकडे लक्ष

Share Market Opening: गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. आठवडाभरात 3 टक्के इतकी घट झाल्यानंतर शेअर बाजारात आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Top 5 Most Expensive Paintings in the World: ‘ही’ आहेत जगातील सगळ्यात महाग 5 पेंटिंग्ज

Top 5 Most Expensive Paintings in the World: जगातील सगळ्यात महाग 5 पेंटिंग्जमध्ये कोणती चित्रं येतात, ती कधी आणि कोणी बनवली, त्याची किंमत काय होती अशी सर्व माहिती जाणून घेऊयात.

Read More

Cricket Bat बनविणारे Jammu Kashmir मधील व्यावसायिक अडचणीत, कच्चा माल मिळत नसल्याने हैराण

काश्मीरमध्ये बनवलेल्या बॅट खूप स्वस्त असतात, त्यामुळे जगभरात त्याला मागणी असते. विलोच्या लाकडापासून बनवलेल्या बॅटची गुणवत्ता ब्रिटनमध्ये बनलेल्या विलो बॅट्सइतकीच चांगली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे 400 क्रिकेट बॅट निर्मिती युनिट आहेत मात्र कच्चा माल उपलब्ध नसल्यामुळे हे युनिट चालवणे कठीण बनले आहे.

Read More

How to Update Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये अपडेट करा मुलांची नावे, जाणून घ्या प्रक्रिया

जर तुम्हाला शिधापत्रिकेत नवीन व्यक्तीचे नाव जोडायचे असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन हे काम करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असायला हवी. या लेखाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय काही मिनिटांतच कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेवर जोडू शकता, चला तर मग जाणून घेऊया.

Read More

Gautam Adani Net Worth Fall: हिंडेनबर्गचे तडाखे, श्रीमंत उद्योजकांच्या यादीत 33 व्या स्थानापर्यंत गौतम अदानींची घसरण

Gautam Adani Net Worth Fall:अमेरिकेची रिसर्च कंपनी हिडेंनबर्गने अदानी ग्रुपच्या आर्थिक क्षमतांबाबत केलेल्या अहवालानंतर अदानी ग्रुपला मोठा तडाखा बसला आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली. अदानी ग्रुपचे शेअर मार्केटमध्ये तब्बल 12 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. या अहवालाचा गौतम अदानी यांनाही व्यक्तिगत पातळीवर मोठा फटका बसला.

Read More

Rising Heat in India: वाढत्या उष्णतेसोबत देशात वीजटंचाईचे संकट, विजेची मागणी वाढली

Surging Electricity Demand in India: उष्ण हवामानामुळे शेतीतील सिंचन पंप आणि एअर कंडिशनरचा वापर विजेची मागणी वाढवणार आहे. यामुळे देशाच्या ऊर्जा व्यवस्थेवर ताण पडणार आहे. आयात केलेल्या कोळशाचा वापर करणाऱ्या वीज केंद्रांना उन्हाळ्याच्या हंगामात तीन महिने पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जेणेकरून ब्लॅकआउट म्हणजेच भारनियमन टाळता येईल

Read More

India -America trade: भारत -अमेरिका द्विपक्षीय व्यापारायविषयी जेनेट येलेन काय म्हणाल्या ते जाणून घ्या

India -America trade: बेंगळुरू येथे यूएस आणि भारतीय आयटी क्षेत्रातील उद्योगपतींच्या राऊंडटेबल बैठकीला संबोधित करताना येलेन म्हणाल्या की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा विश्वास आहे की भारत हा अमेरिकेचा अपरिहार्य भागीदार आहे.

Read More

Adani Group Crisis: ‘ही’ बातमी अदानी टोटल गॅसची घसरण थांबवणार?

Adani vs Hindenburg या संघर्षात अदानी ग्रुपचे शेअर्सचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. याचा अदानी टोटल गॅसला मोठा फटका बसलेला दिसून येतोय. मात्र या पार्श्वभूमीवर Adani Group साठी एक दिलासादायक बातमी आली आहे. यामुळे या शेअर्सची घसरण आता थांबणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More