By Sujit Patil25 Feb, 2023 13:193 mins read 220 views
Financial Planning: तुम्हाला ही भविष्यात आरामात आयुष्य जगायचे असेल, तर पैशाचे नियोजन आणि व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन नोकरी मिळाल्यावर कोणत्या 3 गोष्टी पहिल्यांदा करायच्या जाणून घ्या.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकदा का नोकरी मिळाली की, बरेच जण प्लॅन बनायला सुरुवात करतात. काही जण तर, यासंदर्भातील लिस्टच बनवायला घेतात. नवीन मोबाईल, टू व्हीलर बाईक किंवा कार खरेदी करणं, विकेंडसाठी टूर पॅकेज, खवय्यांसाठी वेगवेगळ्या हॉटेल्सची लिस्टच तयार असते. पगार झाला रे झाला की, या गोष्टींवर लोक लगेच खर्च करतात.
माणूस पैसा कमावतो ते त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यात सुखाने राहण्यासाठी. त्यामुळे नवीन नोकरी लागल्यानंतर पैसे खर्च करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करणं देखील गरजेचं आहे. नवीन नोकरी मिळाल्यानंतर आर्थिक नियोजन करताना कोणत्या 3 गोष्टी सर्वप्रथम करायच्या हे जाणून घ्या.
आर्थिक नियोजन करताना ‘या’ 3 गोष्टींना प्राधान्य द्या
जीवन विमा
नवीन नोकरी मिळाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा टर्म पॉलिसी (Term Policy) घेण्यासाठी प्राधान्य द्या. 2005 मध्ये टर्म पॉलिसी घेण्यासाठी अत्यंत कठीण प्रक्रियेला सामोरं जावं लागत होतं. मात्र ही प्रकिया आता अधिक सोपी झाली आहे.
विशेष म्हणजे नवीन नोकरीला लागल्यानंतर केवळ 2 ते 3 दिवसांमध्ये देखील तुम्हाला टर्म पॉलिसी सहज घेता येते. सुरुवातीला अशा प्रकारची पॉलिसी ही केवळ कर्मचाऱ्याला देण्यात येत होती. मात्र आता काही कंपन्या ही सुविधा कर्मचाऱ्यासोबत त्याच्या जोडीदारालाही देत आहेत.
ही पॉलिसी घेतल्यामुळे कर्मचाऱ्याच्या बाबतीत काही अनुचित घटना घडली, तर त्याच्या कुटुंबाला या पॉलिसीच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते. यातून मिळालेल्या रकमेतून कुटुंबाला राहणीमानाच्या दर्जाबाबत तडजोड न करता कठीण परिस्थिती हाताळता येते. त्यामुळे नोकरी मिळाली की, लगेच टर्म पॉलिसी घेणं आवश्यक आहे.
टर्म पॉलिसी बद्दल 2 गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांचं वय 30 वर्षाच्या आत आहे, त्यांच्यासाठी टर्म पॉलिसीचा प्रीमिअम हा खूपच कमी असतो. त्याचप्रमाणे 40 वर्षांनंतर टर्म पॉलिसी मिळविणं हे अतिशय कठीण असतं.
टर्म पॉलिसीची रक्कम किती असावी, यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. पण सर्वसाधारण कर्मचाऱ्याच्या वार्षिक पगाराच्या किमान पाच पट रकमेचा टर्म प्लॅन असावा असं गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात.
आरोग्य विमा
आता फक्त मुंबईत नाही तर, अनेक निमशहरांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची (Super Speciality Hospital) मागणी प्रचंड वाढू लागली आहे. छोट्या शहरांमध्ये दर्जेदार उपचार घेणं शक्य असलं तरीही त्यासाठी येणारा खर्च हा खूप मोठा असतो.
हल्ली तर लहान मुलांच्या उपचारापासून ते प्रसूतीपर्यंत किंवा दाताच्या रुट कॅनलसारख्या उपचारांसाठी सुद्धा भरपूर पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे कोणावरही अशा खर्चाचा बोजा न टाकता आरोग्य विम्याच्या (Medical Policy) मदतीने वैद्यकीय खर्च सांभाळता येतो.
टर्म पॉलिसीप्रमाणेच, तुम्ही तरुण वयात आरोग्य विमा घेतला, तर पॉलिसीचा प्रीमियम कमीत कमी बसतॊ. याउलट जसे वय वाढेल तसा प्रीमियम देखील वाढत जातो. संपूर्ण परिवारासाठी ही आरोग्य विमा घेता येतो. मग तो तुम्ही वेगवेगळा किंवा नवीन पॉलिसी घेण्याऐवजी विद्यमान पॉलिसीमध्ये कुटुंबाला ॲड करू शकता. सध्या बाजारपेठेत अनेक चांगल्या कंपन्या कमी प्रीमियममध्ये उत्तम सुविधा देत आहेत. त्यामुळे नवी नोकरी मिळाली की, आरोग्य विमा घ्यायला विसरू नका.
गुंतवणूक
टर्म पॉलिसी आणि आरोग्य विमा घेतल्यानंतर गुंतवणुकीला (Investment) प्राधान्य द्यायला हवं. तुमच्या भविष्यातील गरजांचा विचार करून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे शेतकरी धान्य कोठारात साठवून ठेवतो आणि आवश्यकता असेल तेव्हा वापरतो, अगदी त्याच प्रमाणे गुंतवणुकीचे आहे. याशिवाय आर्थिक स्वावलंबनासाठी गुंतवणूक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मासिक वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणुकीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी काही पर्याय खालीलप्रमाणे-
मुदत ठेव योजना (FD): मुदत ठेव योजनेमध्ये (Fixed Deposit) बँकेत आपले पैसे ठराविक मुदतीसाठी ठेवण्यात येतात. पूर्वी याच गुंतवणूक पर्यायाला लोकांची सर्वाधिक पसंती होती, मात्र सध्याच्या घडीला यावरील व्याजदर (Low interest rate) इतर पर्यायांच्या तुलनेत कमी असल्याचे पाहायला मिळत आहेत.
शेअर मार्केट: शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड्स (Mutual Fund), शेअर, फ्युचर्स असे अनेक प्रकारचे गुंतवणूक प्लॅन असतात. पण यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला एखाद्या प्लॅनबद्दल सविस्तर माहिती असेल, तरच तुम्ही यामध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य द्या. कमीत कमी रकमेपासून यामध्ये गुंतवणूक सुरु करतात येते. विशेष म्हणजे यामध्ये मिळणारा व्याजदर हा देखील जास्त असतो.
सरकारी योजना: सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या EPF, PPF आणि GPF या योजनांबद्दल (Government Scheme) माहिती करून घ्या आणि त्यामध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता. यामध्ये चांगला व्याजदर आणि सुरक्षितता (Good Interest Rate & Safety) अशा दोन्ही गोष्टी मिळतात. महत्त्वाचं म्हणजे सरकारी योजना असल्याने पैसे बुडण्याची भीती नसते. भविष्यात दीर्घकाळासाठी या गुंतवणूक योजना फायद्याच्या ठरतात. याशिवाय अनेक वेगवेगळ्या योजनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवून तुमचे भविष्य आर्थिक दृष्ट्या अधिक सुरक्षित करू शकता.
वर्ल्ड बँकेच्या प्रमुखपदी उमेदवारांची शिफारस करण्याची मुदत संपली असून इतर देशांनी कोणत्याही नावाची शिफारस केली नाही. त्यामुळे अजय बंगा यांची निवड निश्चित समजली जाते. प्रतिष्ठित अशा जागतिक बँकेचे प्रमुखपद भुषवण्याचा मान एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळणार आहे. पुण्यातील खडकी कंन्टोनमेंट येथे त्यांचा जन्म झाला आहे.
बनावट आणि भेसळयुक्त औषधे तयार करणाऱ्या 76 कंपन्यांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालायने कारवाई केली आहे. मागील काही दिवासांपूर्वी गांबिया आणि उझबेकिस्तान देशांमध्ये लहान मुलांचा मृत्यू झाला होता. या मुलांच्या मृत्यूस भारतीय कंपन्यांनी तयार केलेले औषध जबाबदार असल्याचा आरोप दोन्ही देशांनी केला होता. त्यानंतर भारत सरकारने बनावट कंपन्यांना शोधण्याचे अभियान राबवले होते.
Unacademy layoffs: भारतातील E-Learning प्लॅटफॉर्म कंपनी 'Unacademy' ने 380 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे. नोकरकपात केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काही सुविधा दिल्या आहेत. ही कर्मचारी कपात करण्याचे कारण काय? आणि कोणत्या सुविधा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.