Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ericsson layoff: आयटीनंतर टेलिकॉम क्षेत्रावरही संकट! एरिक्सन कंपनी 8500 कर्मचारी कपात करणार

Ericsson layoff

Image Source : www.datacenterdynamics.com

टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी एरिक्सनने 8500 कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्यात येत आहे. त्यानंतर आता मंदीचे पडसाद टेलिकॉम क्षेत्रावरही दिसू लागले आहेत.

Ericsson layoff: टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी एरिक्सनने 8500 कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्यात येत आहे. त्यानंतर आता मंदीचे पडसाद टेलिकॉम क्षेत्रावरही दिसू लागले आहेत. टेलिकॉम उपकरणे निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून एवढी मोठी कर्मचारी कपात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

खर्चात कपात करण्याचा प्रयत्न (Cost cutting by Ericsson)

जगभरातील विविध कार्यालयातून ही कर्मचारी कपात केली जाणार आहे. व्यवसायातील अस्थिरतेमुळे कंपनीने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना मेमो पाठवल्याचे रियटर्स वृत्तवाहिनीने म्हटले आहे. (Ericsson layoff in India) एरिक्सन कंपनीने जगभरातील विविध देशांत कार्यालये आहेत. प्रत्येक स्थानिक कार्यालयाचा आढावा घेऊन कर्मचारी कपात केली जाईल, असे कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी बोरजे एखोल्म यांनी म्हटले आहे.

एरिक्सन कंपनीमध्ये जगभरात 1 लाख 5 हजार कर्मचारी आहेत. सर्वात प्रथम स्वीडनमधील कार्यालयातील 1400 कर्मचारी कमी करण्यात येणार आहेत. कोणत्या देशातील सर्वाधिक कर्मचारी कामावरून काढून टाकले जातील, याबाबत कंपनीने माहिती दिली नाही. मात्र, अमेरिकेतील कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक जॉब जातील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एसिक्सनच्या व्यवसायात मंदी (Ericsson business growth reduced)

एरिक्सन कंपनीच्या टेलिकॉम इक्विपमेंटचा व्यवसाय रोडावल्याने डिसेंबर 2023 पर्यंत 880 मिलियन डॉलर खर्चात कपात केली जाईल, असे कंपनीने डिसेंबर महिन्यात म्हटले होते. व्यवसायात टिकून राहण्यासाठी खर्चात कपात अत्यंत आवश्यक असल्याचे CEO बोरजे एखोल्म यांनी म्हटले आहे. कोरोना काळात टेलिकॉम कंपन्यांच्या कामात वाढ झाली होती. (Ericsson layoff) त्यामुळे नोकरभरती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. आता मात्र, व्यवसाय मंदावल्याने कंपनीकडून कर्मचारी कपात करण्यात येत आहे. Verizon या टेलिकॉम उपकरणे बनवणाऱ्या मोठ्या कंपनीनेही खर्चात कपात करण्याची घोषणा केली आहे.

भारतामध्ये एरिक्सनची कार्यालये कोठे आहेत? (Ericsson offices in India)

एरिक्सन कंपनीची भारतामध्ये पुणे, दिल्ली, चेन्नई, गुरुग्राम, नोयडा येथे कार्यालये आहे. विविध प्रकारचे ऑपरेशन्स या कार्यालयातून चालतात. भारतातील किती कर्मचारी कमी केले जातील, याबाबत माहिती मिळाली नाही. टेलिकॉम एक्सचेंज सिस्टिम, राऊटर, ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क, रेडिओ सिस्टिम, नेटवर्किंगमधील विविध हार्डवेअर कंपनीकडून तयार करण्यात येतात.