PPF Scheme Latest Update:केंद्र सरकारद्वारे अनेक सरकारी योजना चालवल्या जातात, ज्या अंतर्गत तुम्हाला अनेक फायदे मिळत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या योजनेत तुमच्या लहान मुलांना मोठा फायदा होणार आहे. तुमच्या मुलांनाही सरकारकडून PPF खाते (PPF Scheme)काढण्याची सुविधा मिळत आता दिली जाणार आहे. ज्या प्रकारे पालकांना PPF मध्ये अनेक फायदे मिळतात, तसेच फायदे मुलांना देखील आता मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या मुलाचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (Public Provident Fund)आता उघडू शकता.
तुम्ही या योजनेत किती गुंतवणूक करू शकता ?
तुम्ही या योजनेत एका वर्षात 500 रुपये ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.1 टक्के व्याज दिले जाते, यामध्ये तुम्ही 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
मुलांचे खाते कोण उघडू शकते?
लहान मुलांचे खाते त्यांचे पालक उघडू शकतात आणि त्यात फक्त पालकच गुंतवणूक करू शकतात. मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, ते स्वत: देखील खात्यात पैसे जमा करू शकतात आणि त्यावर कोणताही कर लागणार नाही.
लहान मुलांसाठी PPF खाते कसे उघडायचे
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
- तिथे तुम्हाला PPF खाते उघडण्याचा फॉर्म भरावा लागेल.
- आता या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व कागदपत्रे आणि तपशील भरावे लागतील. (मुलाचा जन्मदाखला, आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, PAN कार्ड, रहिवासी दाखला इत्यादी)
- तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्मसोबत जोडून सबमिट करावी लागतील.
- यानंतर तुमचा अर्ज तपासला जाईल आणि तुमचे खाते उघडले जाईल.
कोणती कागदपत्रे लागतील?
जर तुम्ही तुमच्या मुलासाठी PPF खाते उघडणार असाल तर तुम्हाला पालकांचे KYC, मुलाचा फोटो, मुलाचे वय प्रमाणपत्र आवश्यक असेल, ज्यामध्ये आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र आवश्यक असेल.
कर सवलतीचा मिळेल लाभ
पीपीएफ खात्यात गुंतवणूक करणाऱ्यांना कर सवलतीचा लाभ मिळतो. या योजनेत ग्राहकांना 80C अंतर्गत कर सवलत मिळते. त्याचबरोबर या सरकारी योजनेवर मिळणारे व्याज आणि पॉलिसी पूर्ण झाल्यावर मिळणारे पैसेही पूर्णपणे करमुक्त आहेत. मुलाचे वय ३ वर्षांचे असेल आणि १५ वर्षांपर्यंत त्याच्या नावाने PPF खाते उघडले असेल, तर जेव्हा मूल 18 वर्षांचे होईल, तेव्हा या PPF वर खूप चांगले परतावे मिळतील. यासाठी तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. कर सवलतीसाठी अनेक लोक या योजनेत गुंतवणूक करत असतात.