जगभरात आर्थिक मंदीचे परिणाम जाणवू लागले आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, सारख्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केली आहे. अशातच कृत्रिम बुद्धीमत्तेवर काम करणारे Open AI, Chat GPT सारख्या सॉफ्टवेअरने जागतिक बाजारपेठेत धुमाकूळ घातलाय. यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या सुरक्षित आहे किंवा नाही याबद्दल शंका निर्माण व्हायला लागली आहे.
800 पेक्षा अधिक कंपन्यांच्या सर्वेक्षणावर आधारित हा अहवाल आहे. या कंपन्यांमधील मालक, कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा अहवाल बनवला गेला आहे. अहवालानुसार येत्या 5 वर्षात 69 दशलक्ष नवे रोजगार निर्माण होतील तर 83 दशलक्ष रोजगार कमी होतील असे म्हटले आहे.
The Future of Jobs Report 2023 is now live. Find out how macrotrends and technology adoption are likely to change labour markets and shape the demand for jobs and skills in the next few years. #GrowthSummit23https://t.co/hParfDQ8SO pic.twitter.com/HSzrsmQo3e
— World Economic Forum (@wef) May 1, 2023
The Future of Jobs Report 2023 नुसार येत्या 5 वर्षात पुढील 10 क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असे म्हटले आहे.
1) एआय आणि मशीन लर्निंग स्पेशालिस्ट (AI and Machine Learning Specialist)
2) शाश्वत विशेषज्ञ (Sustainability Specialists)
3) व्यवसाय बुद्धिमत्ता स्पेशालिस्ट (Business Intelligence Specialist)
4) माहिती सुरक्षा स्पेशालिस्ट (Data Safety Specialist)
5) फिनटेक इंजिनिअर (FinTech Engineer)
6) डेटा विश्लेषक (Data Specialist)
7) रोबोटिक्स इंजिनिअर (Robotics Engineer)
8) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर (Electronics Engineer)
9) कृषी उपकरण निर्मिती (Agricultural Instruments)
10) डिजिटल ट्रान्सफॉमेशन स्पेशालिस्ट (Digital Transformation Specialist)
पुढील 5 वर्षात या 10 क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होईल असे या अहवालात म्हटले आहे. मुख्य म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्षेत्र येणाऱ्या काळात सर्वात वेगाने वाढणार आहे असे देखील यांत म्हटले आहे.
एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होत असतानाच अशी काही क्षेत्रे या अहवालात नमूद करण्यात आली आहेत ज्यात येणाऱ्या काळात रोजगार निर्मिती घटणार आहे. ही क्षेत्रे खालीलप्रमाणे:
1. बँक संबंधित लिपिक (Bank Clerk)
2. पोस्टल सर्विस क्लर्क (Postal Service Clerk)
3. रोखपाल (Cashier)4. डेटा एंट्री लिपिक (Data Entry Clerk)
5. प्रशासकीय आणि कार्यकारी सचिव (Admin and Office Secretary)
6. मटेरियल रेकॉर्डिंग आणि स्टॉक-कीपिंग क्लर्क (Material Recording and Stock Keeping Clerk)
7. अकाउंटिंग, बुककीपिंग आणि पेरोल क्लर्क (Accounting, Book Keeping and Pay Roll Clerk)
8. आमदार आणि अधिकारी (Legislative and Officers)
9. सांख्यिकी, वित्त आणि विमा लिपिक (Statistics, Finance and Insurance Clerk)
10. घरोघरी विक्री करणारे कर्मचारी (Sales), पत्रकारिता (News) आणि संबंधित कामगार
येणाऱ्या काळात लिपिक, सचिव अशी ऑफिस डेस्कशी निगडीत कामांमध्ये कपात होणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर होत असताना सर्वप्रथम लिपिक आणि सचिवांसारखे ऑफिस डेस्क काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार असल्याचे या अहवालात स्पष्ट म्हटले आहे.