Bank Open Only 5 Days In A Week : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तशी तर सरकारी बँकांना रविवार वगळता दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असतेच. मात्र आता त्यांचे आठवड्यातील कामाचे दिवस केवळ 5 दिवस होऊ शकतात. तर, वित्त मंत्रालय लवकरच या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. आताच्या परिस्थितीत पहिल्या, तिसऱ्या आणि एका महिन्यात पाच शनिवार आल्यास, त्या दिवशीही बँका सुरु राहतात.
IBA ने पाठविला प्रस्ताव
इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज (UFBEs) यांनी 5 दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यासाठी सहमती दर्शवली होती. मात्र त्यांची अट अशी होती की, बँकांना दररोज ठराविक वेळेपेक्षा 40 मिनिटे जास्त काम करावे लागेल. IBA ने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपूढे 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टीचा प्रस्ताव पाठवला होता. याचा अर्थ सोमवार ते शुक्रवार बँकेचे कामकाज सुरु राहील आणि प्रत्येक शनिवार व रविवारला सुट्टी असेल.
मे महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या
महत्वाचे म्हणजे मे महिन्यात देशभऱ्यातील बँका 11 दिवस बंद राहणार आहे. कारण या महिन्यात विविध सणांमुळे 11 दिवस सुट्टी असणार आहे. जर मे महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्हाला बँकेचे कामकाज उरकवायचे असेल, तर घरामधून निघायच्या आधी आपल्या घरचे कॅलेंडर एकदा चेक करा. मे महिन्यात 11 दिवस जरी बँका बंद राहणार असल्या तरी, ग्राहकांना मोबाईल आणि इंटरनेटवर बँकिंग सेवा उपलब्ध असल्याने ते ऑनलाईन व्यवहार करु शकतील. तसेच एटीएम मधून पैसे काढू शकतील.