• 08 Jun, 2023 01:20

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Yes Bank लवकरच 'ग्लोबल कलेक्शन सर्व्हिस' सुरू करणार, 'या' खातेधारकांना होणार फायदा

Yes Bank New Payment Collection Service

Yes Bank New Payment Collection Service : देशातील खासगी क्षेत्रातील येस बँक लवकरच आपल्या एक्सपोर्ट ग्राहकांसाठी एक खास पेमेंट कलेक्शन सेवा (Payment Collection Service) सुरु करणार आहे. या सेवेचे नाव 'ग्लोबल कलेक्शन सर्व्हिस' (Global Collection Service) असे ठेवण्यात आले आहे. यामुळे एक्सपोर्टधारकांना परदेशी चलन सहज स्वीकारणे आणि त्याला भारतीय रुपयात बदलणे शक्य होणार आहे.

देशातील खासगी क्षेत्रातील येस बँक (Yes Bank) आपल्या ग्राहकांसाठी लवकरच एक खास सेवा घेऊन येणार आहे. या सेवेचे नाव 'ग्लोबल कलेक्शन सर्व्हिस' (Global Collection Service) असे ठेवण्यात आले आहे. कॅशफ्री पेमेंटसोबत (Cashfree Payment) मिळून येस बँक (Yes Bank) ग्लोबल कलेक्शन सर्व्हिस लवकरच सुरु करणार असल्याची माहिती बँकेने बुधवारी (3 मे 2023) जाहीर केली. ही एक प्रकारची पेमेंट कलेक्शन सेवा असेल. खास एक्सपोर्टधारकांसाठी ही सेवा तयार करण्यात आली आहे. नेमकी कशी असेल ही सेवा, जाणून घेऊयात.

एका दिवसात परकीय चलन भारतीय रुपयात बदलता येणार

भारतातील एक्सपोर्टधारकांसाठी येस बँक लवकरच एक खास पेमेंट कलेक्शन सेवा सुरु करणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचे खाते येस बँकेत असणे गरजेचे आहे. ग्लोबल कलेक्शन सेवे अंतर्गत एक्सपोर्टधारकांना 180 देशांमधून 30हून अधिक परकीय चलनांना स्वीकारता येणार आहे. तसेच या परकीय चलनाला भारतीय रुपयात बदलता देखील येईल. विशेष म्हणजे केवळ एका दिवसात परकीय चलन भारतीय रुपयात बदलले जाणार आहे.

'या' चलनांना स्वीकारले जाईल 

ग्लोबल कलेक्शन सेवे अंतर्गत चार विदेशी चलनांमध्ये ग्राहकांना आर्थिक व्यवहार स्वीकारता येणार आहेत. यामध्ये अमेरिकेचा डॉलर, ब्रिटिश पाउंड, युरो आणि कॅनेडियन डॉलर या चलनांचा समावेश करण्यात आला आहे. ऑनलाइन पेमेंट गेटवे संदर्भातील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार (RBI) 10,000 अमेरिकी डॉलर्सपर्यंत हे कलेक्शन करता येणार आहे.

येस बँकचे प्रमुख काय म्हणाले?

येस बँकेच्या डिजिटल आणि ट्रान्झॅक्शन विभागाचे भारताचे प्रमुख अजय रंजन (Ajay Ranjan) यांनी ग्लोबल कलेक्शन संदर्भात असे म्हणाले, की या सेवेचा उद्देश हा भारतातील एक्सपोर्टधारकांना जगभरातील वेगवेगळे पेमेंट सहज आणि सोप्या पद्धतीने स्वीकारण्यासाठी मदत करणार आहे. तसेच कमी वेळेत त्या चलनाला भारतीय रुपयात बदलता येणार आहे. यामुळे आर्थिक व्यवहार व्यवस्थित आणि सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.

एका महिन्यात शेअर्समध्ये 5.90% वाढ  

बुधवारी (3 मे 2023) एनएसईवर (NSE) येस बँकेचा शेअर्स 1.25 % घसरून 16.15 रुपये भावाने बंद झाला. मात्र गेल्या एका महिन्यात बँकेच्या शेअरमध्ये 5.90 टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच एका वर्षाचा आढावा घेता येस बँकेचा शेअर्स 19.19 टक्के घसरलेला पाहायला मिळाले आहे.

Source: hindi.moneycontrol.com