Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

US Fed Rate Hike: युएस फेडरल बँक पुन्हा दरवाढ करणार? भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल

Fed Rate Hike

भारतीय वेळेनुसार आज (बुधवार) रात्री 11 वाजता अमेरिकेची फेडरल बँक व्याजदर वाढ करणार की नाही हे स्पष्ट होईल. 25 बेसिस पॉइंट व्याजदर वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेची फेडरल बँक महागाई रोखण्यासाठी सलग 14 महिन्यांपासून दरवाढ करत आहे. आज जर पुन्हा दरवाढ झाली तर 2007 च्या मंदीनंतरची ही सर्वात मोठी व्याजदरवाढ असेल.

Fed Rate Hike: अमेरिकेची फेडरल बँक महागाई रोखण्यासाठी मागील 14 महिन्यांपासून सलग व्याजदर वाढ करत आहे. आज बुधवारी फेडरल बँकेची महत्त्वाची बैठक असून दरवाढ होईल की नाही हे लवकरच समजेल. भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री 11 वाजता फेडरल बँकेचा निर्णय समजेल. फेडरल बँकेकडून 25 बेसिस पॉइंटने व्याजदरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यानंतर बँक दरवाढीला लगाम लावू शकते, असे बोलले जात आहे. आज दरवाढ केली तर 16 वर्षातील ही सर्वात जास्त दरवाढ असेल.

कोरोनाची साथ ओसरल्यानंतर तसेच रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि युरोप खंडातील प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्था मंदीत सापडल्या आहेत. महागाई कमी व्हायचे नाव घेत नसल्याने शिखर बँकांनी दरवाढीचे हत्यार उपसले आहे. अमेरिकेतील लोकप्रतिनिधींकडून व्याजदरवाढ रोखण्यासाठी फेडरल बँकेवर दबावही वाढत आहे. असे असले तरी शेवटची दरवाढ होऊ शकते. मात्र, त्यानंतर दरवाढ थांबवली जाईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

फेडरल बँकेच्या दरवाढीचा भारतावर काय परिणाम होईल.

  • फेडरल बँकेने दरवाढ केली तर डॉलरच्या तुलनेत रुपया खाली येऊ शकतो. त्यामुळे भारताला वस्तू आयात करताना जास्त पैसे मोजावे लागतील. आयातीचा खर्च वाढल्याने महगाईसुद्धा वाढू शकते.
  • अमेरिकेतील व्याजदरवाढीमुळे भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीचा ओघ कमी होऊ शकतो. कारण, अमेरिकेतून गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळेल. भारतीय बाजारातून गुंतवणूकदार पैसे काढून अमेरिकेतील भांडवली बाजारात गुंतवण्यावर भर देतील.
  • इक्विटी मार्केटमधील परदेशी गुंतवणूक कमी होऊ शकते.
  • फेडरल व्याजदर दरवाढीमुळे जगभरातील कर्ज आणखी महाग होऊ शकतात. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील बदलांचा संपूर्ण जगावर परिणाम दिसून येतो. ज्या भारतीय कंपन्यांनी परदेशी चलनात कर्ज घेतले असेल त्यांना जास्त कर्जाचा हप्ता भरावा लागेल. त्याचा परिणाम कंपन्यांच्या ताळेबंदावर होईल.

सध्या अमेरिकेतील व्याजदर ज्याला ‘फंड रेट’ असेही म्हणतात तो 5 टक्के आहे. आज जर व्याज दरवाढ झाली तर 5.25% होईल. 2007 पासूनची ही सर्वात मोठी व्याजदरवाढ असेल. फेडरल बँकेने आणखी दरवाढ केली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते, अशी चिंता अनेक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. 

अमेरिकेतील महागाई दर

अमेरिकेमध्ये महागाईचा दर सुमारे 8 टक्के आहे. फेडरल बँकेच्या मर्यादेपेक्षा 2 टक्क्यांनी महागाई जास्त आहे. चालू वर्षाच्या मध्यावधीपासून महागाई कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. देशातील बड्या बँका कोसळल्याचा परिणामही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला. फेडरल बँक दरवाढ करेल असा अंदाज ब्लूमबर्ग या वृत्तवाहिनीने सुद्धा व्यक्त केला आहे.