Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF Scheme: मुलांच्या उच्च शिक्षणासाठी महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक, 15 वर्षानंतर मिळेल 40 लाखांहून अधिक रक्कम

PPF Scheme

Image Source : www.axisbank.com

PPF Scheme: तुम्हाला देखील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी एक मोठा फंड तयार करायचा आहे का? जर उत्तर हो असेल, तर तुम्ही सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये (PPF) गुंतवणूक करू शकता. या योजनेत 15 वर्ष सलग गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 40 लाखाहून अधिक परतावा मिळेल. मात्र त्यासाठी मासिक स्वरूपात किती गुंतवणूक करावी लागेल, याचे गणित समजून घ्या.

मुलांच्या जन्मापासूनच आई-वडील त्याच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी गुंतवणूक करायला सुरुवात करतात. ही गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. सरकारी योजनेत गुंतवलेले पैसे हे अधिक सुरक्षित राहतात. लोकांना आर्थिक गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी सरकारने 1968 साली सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेची (PPF Scheme) सुरुवात केली. यामध्ये कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते.

पालक दैनंदिन खर्चातून बचत करून मुलांच्या नावाने पीपीएफ खात्यात गुंतवणूक करू शकतात आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा फंड जमा करू शकतात. तुम्हीही या योजनेत गुंतवणूक केली, तर तुम्हाला 15 वर्षांनंतर 40 लाखाहून अधिक परतावा मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला मासिक किती रुपयांची  गुंतवणूक करावी लागेल, जाणून घ्या.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजनेबद्दल जाणून घ्या

भारत सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेची (PPF) सुरुवात केली. या योजनेतील गुंतवणुकीवर सध्या 7. 1% व्याजदर देण्यात येत आहे. लहान मुलांच्या नावाने पालक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. 15 वर्ष सलग यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर एक मोठा फंड तयार केला जाऊ शकतो. या योजनेचा परिपक्व कालावधी हा 15 वर्षाचा आहे. या योजनेत किमान 500 रुपये ते कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. जर तुम्हालाही पीपीएफ खाते सुरू करायचे असेल, तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेशी संपर्क साधू शकता.

40 लाखाचे गणित समजून घ्या

तुमचा मुलगा 5 वर्षाचा असेल, तर चालू वर्षांपासून म्हणजेच 2023 पासून तुम्ही पीपीएफ खात्यात गुंतवणूक करू शकता. या खात्यातील गुंतवणुकीवर 7.1% व्याजदर देण्यात येत आहे. पीपीएफ कॅल्क्युलेटरच्या हिशोबाने, तुम्हाला 15 वर्षासाठी सलग 12,500 रुपयांची मासिक गुंतवणूक करावी लागेल.  

PPF Calculator

वार्षिक गुंतवणूक
कालावधी
Yr
गुंतवणूक केलेली रक्कम
एकूण व्याज
परिपक्वता मूल्य

तुमची 15 वर्षाची एकूण गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये इतकी होईल. ज्यावर 7.1 % व्याजदराच्या हिशोबाने 18 लाख 18 हजार 209 रुपयांचे व्याज मिळेल. 15 वर्षानंतर तुमच्या मुलाचे वय 20 वर्ष असेल. त्याचवेळी तुम्हाला 40 लाख 68 हजार 209 रुपयांचा मुद्दल अधिक व्याज असा एकूण परतावा मिळेल.ही एकरकमी रक्कम तुम्ही मुलाच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकता.

कर सवलत मिळवता येते का?

पीपीएफमधील गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंतआयकराच्या कलम 80Cअंतर्गत कर सवलत (Tax Free) मिळवता येते. यामध्ये मिळणाऱ्या व्याजावर आणि मॅच्युरिटीच्या संपूर्ण रकमेवर कर भरावा लागत नाही. ही संपूर्ण रक्कम करमुक्त असते.  

(डिस्क्लेमर: 'महामनी' कोणत्याही स्वरूपातील गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )