Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSRTC Travel Scheme: आपल्या 'लाल परी'ची ही भन्नाट ऑफर तुम्हाला माहित आहे का?

MSRTC SCHEME AVDEL TITHE PRAVAS

MSRTC Travel Scheme: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation-MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळ राज्यातील प्रवाशांसाठी 'आवडेल तिथे प्रवास' ही भन्नाट योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत तुम्ही राज्याबाहेरही स्वस्तात प्रवास करू शकता.

MSRTC Travel Scheme: मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे आणि तुम्हीही कुटुंबासह लॉन्ग ट्रीपवर जाण्याचा विचार करत आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तुमच्यासारख्या हौशी पर्यटकांना मनसोक्त फिरता यावे आणि खिशाला मोठा भुर्दंडही बसू नये म्हणूण एसटी महामंडळाने आपल्या प्रवाशांसाठी 'आवडेल तेथे प्रवास' ही योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रासह राज्याबाहेरही नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन करू शकता.

आपल्यावर अजूनही इंग्रजी साहेबांचा पडघा असल्यामुळे आपण आजही उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करते. तसे पाहायला गेले तर इंग्रज साहेबांना इथला उन्हाळा मानवत नसल्यामुळे ते या दिवसांत सुट्टी घेऊन त्यांच्या देशात जायचे. आपण भारतीयांनी त्यांचे अनुकरण करत उन्हाळ्याची सुट्टी हिच आपली सुट्टी मानली आणि त्यानुसार आपण आजही उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेतो. असो, तर ही सुट्टी मजेत घालवता यावी, लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मनसोक्त फिरता यावे. धार्मिक पर्यटन करता यावे. राज्याच्या बाहेरील स्थळांना भेट देता यावी. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या एसटी महामंडळाने 'आवडेल तिथे प्रवास' ही योजना आणली आहे. खासगी कंपन्या, रेल्वेच्या आयआरसीटीसीद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजना असूनही एसटीच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आवडेल तिथे प्रवास योजना काय आहे?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation-MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळ 'आवडेल तिथे कोठेही प्रवास' ही योजना 1988 पासून राज्यातील प्रवाशांसाठी ही योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत एसटी महामंडळातर्फे 4 आणि 7 दिवसांचे पास दिले जातात. या पास अंतर्गत प्रवाशी साधी एसटी बस यामध्ये जलद, रात्रसेवा, शहरी, यशवंती या प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. याचे 7 दिवसांसाठी प्रोढ व्यक्तीच्या पासाची किंमत 2040 रुपये तर 4 दिवसांच्या प्रोढ व्यक्तींच्या पासाची किंमत 1170 रुपये आहे. यामध्ये मुलांच्या पासाची किंमत अनुक्रमे 1025 आणि 585 रुपये इतकी आहे.

शिवशाही बसने आवडेल तिथे प्रवास या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रोढ व्यक्तींना 7 दिवसांसाठी 3030 रुपये तर 4 दिवसांसाठी 1520 रुपये पासाची किंमत आहे. तसेच 5 वर्षांवरील आणि 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी अनुक्रमे 1520 आणि 765 रुपये पासाची किंमत आहे.

आवडेल तिथे प्रवास या योजनेंतर्गत प्रौढ व्यक्तींना एसटीमधून प्रवास करताना पासधारकास 30 किलो आणि 12 वर्षांखालील मुलांना 15 किलो वजनाचे सामान नेता येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत एसटी महामंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत या योजनेतून प्रवास करता येईल. आवडेल तिथे प्रवास या योजने अंतर्गत दिला जाणार पास हा प्रवासाच्या 10 दिवस अगोदरच दिला जातो.

_Lalpari travels

आवडेल तिथे प्रवास योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • या योजनेंतर्गत 4 आणि 7 दिवसांच्या कालावधील आवडेल तिथे एसटीने प्रवास करता येतो.
  • पासचा कालावधील पहिल्या दिवसात्या मध्यरात्रीपासून म्हणजे 12 वाजल्यापासून चौथ्या किंवा सातव्या दिवशीच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत असेल.
  • या योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध गाड्यांचा पर्याय स्वीकारता येतो. तसेच एसटीची सेवा जिथपर्यंत आहे; तिथपर्यंत या पासवर प्रवास करता येतो.
  • या योजनेच्या पासचे आरक्षण 10 दिवस अगोदर करता येते.

आवडेल तिथे प्रवास योजनेला भरघोस प्रतिसाद

एसटी महामंडळ आवडेल तिथे प्रवास ही योजना अनेक वर्षांपासून राबवत आहे. या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागली 10 महिन्यांचा आढावा घेतला असता या योजनेचा साधारणपणे 80 ते 85 हजार प्रवाशांनी लाभ घेतला आहे. यातून एसटीमहामंडळाला 10 कोटी 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षात एसटी महामंडळाने या योजनेच्या पास विक्रीतून 44 कोटी 54 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.

आवडेल तिथे प्रवास योजनेचा पास कुठे मिळेल?

आवडेल तिथे प्रवास योजनेचा पास जवळच्या कोणत्याही एसटी डेपोमधून उपलब्ध होईल. हा पास प्रवास करण्यापूर्वी 10 दिवस अगोदर वितरित केला जातो. तसेच या पासच्या माध्यमातून बसचे आरक्षणही करता येऊ शकते. जागा आरक्षित करण्यासाठी त्याचे मूल्य भरून आसन आरक्षित करता येते.