भारतातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक पीक म्हणजे कापूस (cotton). आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने (ICAC) दिलेल्या माहितीनुसार भारतीय बाजारपेठेत कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आवक वाढल्याने कापसाचे दर घटण्याचे संकेत देण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत कापसाचे दर वाढतील की घटतील, यावर तज्ज्ञांचे मत काय, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
आवक वाढल्याने दर घटण्याची शक्यता
देशातील शेतकऱ्यांनी कापसाला जास्त दर मिळावा यासाठी कापसाचा पुरवठा कमी प्रमाणात करायला सुरुवात केली. परिणामी बाजारपेठेत कापसाचे दर वाढले. डिसेंबर 2022 दरम्यान कापसाचे दर 68,500 गाठींपर्यंत पोहचले. वाढलेले दर पाहून पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कापसाचा पुरवठा करायला सुरुवात केली. ज्यामुळे सध्या कापसाचे दर घटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जागतिक बाजारपेठेत कापसाचा दर घटला
आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने (ICAC) दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात कापसाचा दर 61,800 गाठींपर्यंत घटला आहे. समितीच्या अंदाजानुसार जागतिक स्तरावर कापसाच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. कापसाचे दर जागतिक बाजारपेठेत 96.1 पाउंड पासून 113.3 पाउंड दरम्यान राहतील. डिसेंबर 2022 मध्ये हा अंदाज 115 पाउंड इतका होता.
अरुण सेखसरिया काय म्हणतात?
डीडी कॉटनचे एमडी अरुण सेखसरिया (Arun Sekhsaria, MD, DD Cotton) यांच्या म्हणण्यानुसार एप्रिल महिन्यात बाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. सध्या शेतकऱ्यांकडे कापसाचा मुबलक साठा आहे. मे, जून, जुलै या महिन्यात कापसाची आवक आणखी वाढू शकते. खास करून भारतात कापसाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेष म्हणजे सरकारने इंपोर्ट ड्युटीमध्ये (Import Duty) कोणतेही बदल केलेले नाही. त्यामुळे पुढे जाऊन कापसाच्या दरात मोठा बदल होईल असे सध्या तरी वाटत नाही.
भारतात यावर्षी कापसाचे उत्पादन किती होईल?
USDA च्या (U.S. Department of Agriculture) अंदाजानुसार भारतात यावर्षी कापसाचे उत्पादन हे 314 लाख गाठींपर्यंत जाईल. तर CAI च्या अंदाजानुसार हा आकडा 313 लाख गाठींपर्यंत जाईल. भारत सरकारने या वर्षात 337 लाख गाठींपर्यंत कापसाचे उत्पादन पोहचेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतातील कापसाच्या आयात निर्यातीचे आकडे जाणून घ्या
भारतात 2016-17 वर्षी कापसाची आयात 30.94 लाख गाठींपर्यंत करण्यात आली. तर 2017-18 मध्ये 15.80 लाख गाठी, 2018-19 मध्ये 35.37 लाख गाठी आणि 2019-20 मध्ये 15.50 लाख गाठींची आयात करण्यात आली. तसेच 2020-21 मध्ये 11.03 लाख गाठी आणि 2021-22 मध्ये 10.50 लाख गाठींची आयात केली गेली.
तर भारतातून कापसाची निर्यात 2016-17 साली 58.21 लाख गाठींपर्यंत झाली. 2017-18 साली 67.59 लाख गाठी, 2018-19 साली 43.55 लाख गाठी आणि 2019-20 साली 47.04 लाख गाठींची निर्यात करण्यात आली. 2020-21 साली 77.59 लाख गाठी तर 2021-22 साली 45 लाख गाठींची निर्यात करण्यात आली.
Source: hindi.moneycontrol.com