• 08 Jun, 2023 01:12

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paytm Travel Carnival 2023 | ट्रेन, बस आणि विमान प्रवासासाठी Paytm देतेय मोठी सूट, जाणून घ्या ऑफर

Paytm Travel Carnival 2023

Paytm Payment App चा वापर करणाऱ्यांना ‘पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हल’ मध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. बुकिंगसाठी ग्राहकांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीये. या खास ऑफर्समध्ये तुमच्या प्रवासासाठी जर तुम्ही फ्लाइट, ट्रेन किंवा बस बुकिंग करत असाल तर तुम्हांला 25 टक्के पर्यंत सवलत दिली जाणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Paytm Ticket Concession | सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. कामानिमित्त बाहेरगावी असलेले लोक सुट्ट्यांमध्ये आपल्या गावी जातातच. प्रवासासाठी लोक बस, ट्रेन आणि विमान बुकिंग करत असतात. तुम्ही देखील जर गावी जायचा प्लॅन करत असाल आणि प्रवासासाठी बुकिंग करायच्या विचारात असाल तर मग ही बातमी वाचाच! ही ऑफर केवळ 5 मे पर्यंतच वैध आहे हे मात्र विसरू नका! 

पेटीएम पेमेंट्स अॅपचा वापर करणाऱ्यांना ‘पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हल’ मध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. यासाठी ग्राहकांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीये असे देखील पेटीएम ने स्पष्ट केले आहे. या खास ऑफर्समध्ये पेटीएम बस बुकिंगवर 25 टक्के सवलत देणार आहे. तसेच काही निवडक ऑपरेटर्सच्या माध्यमातून जर तुम्ही बुकिंग करणार असाल तर अतिरिक्त 10 टक्के सूट देखील मिळवता येणार आहे. तसेच गावी जाण्यासाठी तुम्ही ट्रेनचा पर्याय निवडत असाल तर ट्रेन तिकिटांच्या बुकिंगसाठी, कंपनी UPI द्वारे पेमेंटवर शून्य पेमेंट गेटवे शुल्क आकारत आहे.

विमान बुकिंगवर मिळवा 15% इन्स्टंट सूट

Paytm Travel Carnival 2023 मधील ऑफर्सचा लाभ घेऊन ज्यांना विमानाने प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी पेटीएमने आनंदाची बातमी आणली आहे.Vistara, IndiGo, Akasa Air, SpiceJet, AirAsia,GoFirst आणि Air India या प्रमुख विमान कंपन्याचे बुकिंग तुम्हाला करता येणार आहे. या विमान कंपन्या अधिकृतरीत्या या पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हलचा भाग होणार आहेत.

पेमेंट करताना पेटीएम आरबीएल बँक क्रेडिट कार्ड (RBL Bank Credit Card) आणि, येस बँक क्रेडिट कार्ड (Yes Bank Credit Card) आणि एचएसबीसी इंडिया बँक क्रेडिट कार्डद्वारे (HSBC Bank Credit Card) विमान बुकिंग केल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई तिकीट बुकिंगवर 15% इन्स्टंट सूट दिली जाणार आहे.

केवळ हेच नाही तर पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हलमध्ये कंपनीतर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सशस्त्र दलातील जवानांसाठी विशेष सवलत देखील दिली जाणार आहे. यासाठी ग्राहकांना संबंधित विभागाचे ओळखपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे, त्याशिवाय या योजनेचा फायदा नागरिकांना घेता येणार नाहीये.

कॅन्सल प्रोटेक्ट कव्हरचा पर्याय 

पेटीएमतर्फे ग्राहकांना आणखी एक विशेष सवलत दिली जात आहे. याद्वारे जर तुम्ही तुमच्या बुकिंगबद्दल साशंक असाल आणि वेळेवर तिकीट बुक होईल किंवा नाही याबद्दल चिंता करत असाल तर थांबा. तुमच्या प्रवासाची तिकिटे लॉक करायची सोय पेटीएम तुम्हाला देऊ करत आहे. यात तुम्ही ‘Cancel Protect Cover’ या योजेनेत अत्यल्प शुल्क देऊन सहभागी होऊ शकता. त्यानंतर तुम्ही लॉक केलेली फ्लाइट, ट्रेन आणि बसची तिकिटे जर तुम्ही रद्द करत असाल तर तुम्हांला कोणतेही शुल्क देण्याची गरज नसेल. तिकीट रद्द केल्यावर ग्राहकांना 100% परतावा दिला जाईल.