Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Startup layoffs : थांबता थांबेना स्टार्टअप्समधलं लेऑफ, भरतीमधल्या त्रुटीचं कारण देत मीशोनं 251 कर्मचार्‍यांना काढलं

Startup layoffs : थांबता थांबेना स्टार्टअप्समधलं लेऑफ, भरतीमधल्या त्रुटीचं कारण देत मीशोनं 251 कर्मचार्‍यांना काढलं

Startup layoffs : देशभरातल्या स्टार्टअप्समधलं लेऑफ काही थांबायला तयार नाही. आता मीशोनं आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करून त्यात आणखी भर घातलीय. इतर कंपन्यांप्रमाणं आर्थिक कारण देत आपल्या भरतीमध्येच त्रुटी असल्याचं सांगत कर्मचाऱ्यांना घरी पाठवलंय.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या मीशोनं (Meesho) नुकतीच नोकरकपातीचं धोरण जाहीर केलंय. आपण आपल्या 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत असल्याचं सांगितलंय. मीशो सॉफ्टबँकच्या सहकार्यानं (Softbank backed) सुरू असलेलं एक स्टार्टअप आहे. मीशोने वर्षभराच्याच कालावधीत दुसरी नोकरकपात जहीर केलीय. कंपनीतल्या 15 टक्के कर्मचार्‍यांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाचा जवळपास 251 कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून ही माहिती देण्यात आलीय. कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ विदित आत्रे यांनी ही माहिती दिली. आम्ही आधीच कर्मचाऱ्यांची चुकीच्या पद्धतीनं भरती केली. आवश्यकतेपेक्षा अधिक नोकरभरती केली. त्यामुळे कंपनीचं आर्थिक नुकसान होत आहे. सुरुवातीलाच आवश्यत तेवढी भरती केली असती तर आर्थिक नियोजन योग्यप्रकारे झालं असतं, असं त्यांनी ई-मेलमध्ये म्हटलंय.

खर्च कपातीवर भर

मागच्या वर्षापासून (2022) मीशोमध्ये खर्चकपातीवर भर दिला जातोय. कोविडनंतरचं वातावरण आणि चांगली गुंतवणूक यामुळे 2020 ते 2022 या कालावधीत आमचा व्यवसायविस्तार प्रचंड वाढला. जीएमव्ही (Gross merchandise value) वाढीची उद्दिष्ट वार्षिक (Year to year) सरासरी 30 टक्क्यांपर्यंत होत होती. आमचे रोख साठे अशा कठीण परिस्थितीत चांगले बफर करतायत. मात्र आता आम्हाला खर्चावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं आत्रे म्हणाले. ही कपात करताना कंपनीनं इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट, टूल कॉस्ट यासह इतर सर्वच खर्चाचं गणित केलं, असं या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आलंय.

काढण्याचं कारण काय?

मीशोनं ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं, त्यांचा कंपनीतल्या कामगिरीशी काहीही संबंध नाही. या कर्मचारी कपातीचं कारण केवळ व्यावसायिक आहे. अर्थात या सर्व कर्मचाऱ्यांना मदत करणार असल्याचंदेखील आत्रे यांनी सांगितलंय.

काय म्हटलं कंपनीनं?

  • वेतन : ज्या कर्मचाऱ्यांवर या कपातीचा थेट परिणाम झालाय, त्या कर्मचार्‍यांना नोटीस कालावधीतलं पूर्ण वेतन आणि 1 अतिरिक्त महिन्यासह सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षासाठी 15 दिवसांच्या वेचनाच्या आधारावर दिलं जाईल, जे येणाऱ्या वर्षापर्यंत असणार आहे. साधारणपणे 2.5 ते 9 महिन्यांचा पगार कंपनी देईल. मात्र, हा पगार कर्मचाऱ्याच्या पद आणि कंपनीत केलेल्या कामाच्या कालावधीवर अवलंबून असेल.
  • इक्विटी : ईएसओपी (Employee stock ownership plan) वेस्टिंग नियम कंपनी शिथिल करेल. असं झाल्यास कमी झालेले कर्मचारी कंपनीचे भागधारक राहतील, असं या ई-कॉमर्स फर्म मीशोनं म्हटलंय.
  • हेल्थकेअर : कंपनी 31 मार्च 2024पर्यंत कौटुंबिक विमा संरक्षण वाढवणार असल्याचं म्हटलंय.
  • रिलोकेशन : मीशो 1 जानेवारी 2023पासून बेंगळुरूमध्ये 5 मेपर्यंत स्थलांतरित (Relocate) झालेल्या कर्मचाऱ्यांना रिलोकेशन अलाउन्सदेखील (Relocation allowance) देईल.
  • ग्रॅच्युइटी आणि लीव्ह एनकॅशमेंट : यासंदर्भात जे कायदे किंवा नियम आहेत, त्यानुसार ग्रॅच्युइटी आणि लिव्ह एनकॅशमेंटदेखील ऑफर कंपनी करेल.

स्टार्टअप्स आणि लेऑफ

विविध स्टार्टअप्स आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. मागच्या महिन्यापर्यंत बायजूनं जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना कमी केलं. निधी मिळत नसल्यानं कूनं आपल्या 30 टक्के कर्मचाऱ्यांना काढलं. मागच्या दोन तीन महिन्यांचा आढावा घेतला तर स्विगीनं 380 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. यासह शेअर चॅट, गो मेकॅनिक, माय गेट, अनअ‍ॅकेडमी, ओला अशा विविध स्टार्टअप्सनी कमी-अधिक प्रमाणात आपल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं आहे.