Top 5 Fellowships in India: साक्षरता ही काळाची गरज बनली आहे. पण, आर्थिक बाजू भक्कम नसल्यामुळे अनेक विद्यार्थी आपले शिक्षण अपूर्ण सोडून देतात. सरकारने त्यांच्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्याचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी पुढे गेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार, विविध शैक्षणिक व्यवस्थापन दरवर्षी लाखो भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शैक्षणिक पदव्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी विविध शिष्यवृत्ती आणि फेलोशिप देतात. त्यातील टॉप 5 मध्ये येणाऱ्या फेलोशिप कोणत्या ते जाणून घेऊया.
Table of contents [Show]
पंतप्रधान रिसर्च फेलोशिप योजना
पंतप्रधान रिसर्च फेलोशिप योजना संशोधनातील सर्वोत्तम प्रतिभावंतांना दिली जाते. या योजनेअंतर्गत 1000 B.Tech विद्यार्थ्यांना IIT आणि IISc मध्ये PhD करण्याची संधी दिली जाते. दरवर्षी प्रमुख संस्थांमधील 1000 सर्वोत्कृष्ट विद्यार्थी निवडले जातात आणि त्यांना IIT आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये पीएचडी करण्याची संधी दिली जाते. इतकेच नाही तर निवडलेल्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना चांगली फेलोशिप रक्कमही मिळते. पीएचडी आणि एमटेक स्कॉलर्सना पंतप्रधान रिसर्च फेलोशिप योजनेचा लाभ मिळू शकतो. याअंतर्गत त्यांना दरमहा 75000 रुपये दिले जातील.
शताब्दी-पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिप योजना
या फेलोशिपचा उद्देश पीएचडी, एमडी, एमएस पदवीधारकांना ICMR संस्था आणि केंद्रांमध्ये मूलभूत विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्यासाठी पाठबळ देणे आहे. या फेलोशिपसाठी उमेदवारांनी पीएचडी, एमडी, एमएस पूर्ण केल्याच्या तीन वर्षांच्या आत अर्ज करावा आणि अर्जाच्या तारखेला उमेदवारांचे वय 32 वर्षांपेक्षा कमी असावे. फेलोशिप मिळाल्यावर, उमेदवाराला दरमहा 50,000 रुपये मिळतात.
नॅशनल पोस्ट डॉक्टरल फेलोशिप
नॅशनल पोस्ट डॉक्टरल फेलोशिप ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीएचडी, एमडी, एमएस पदवी घेतलेल्या आणि विज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या स्पेशलायझेशनच्या क्षेत्रात पुढील संशोधन कार्य करू इच्छिणाऱ्या संशोधन विद्यार्थ्यांना ऑफर केली जाते. पात्र विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती अंतर्गत वार्षिक 2 लाख रुपयांचे संशोधन अनुदान, तसेच मासिक 55,000 रुपये स्टायपेंड दिले जाते.
UGC-NET जुनियर रिसर्च फेलोशिप
हे 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. UGC-NET संबंधित अभ्यास क्षेत्रातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पीएचडी पदवी मिळविण्यासाठी दरवर्षी दोनदा राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आयोजित करते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर फायद्यांसह दरमहा 14,000 रुपये आणि 25,000 रुपये भत्ता मिळतो.
इन्स्टिट्यूट पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप
आयआयटी रोपरने संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप सुरू केली आहे. ही फेलोशिप पीएचडी पदवीधारक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच वर्षांच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. ज्या उमेदवारांनी आयआयटी रोपर येथील प्राध्यापकाच्या अधिपत्याखाली पीएचडी प्रबंध पूर्ण केले आहे त्यांना ही फेलोशिप दिली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांनी अर्ज करण्याची मुदत आहे. फेलोशिप अंतर्गत, विद्यार्थ्यांना दरमहा 55,000 रुपये दिले जातात.