Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gmail Blue Tick Service: Gmail ही सुरु करणार 'ब्ल्यू टिक सेवा', मग यासाठी पैसे भरावे लागणार का?

Gmail Blue Tick Service

Gmail Blue Tick Service: बनावट ईमेल आणि चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी जीमेलने ब्ल्यू टिक सेवा सुरु केली आहे. या सेवेसाठी वापरकर्त्यांना किती शुल्क भरावे लागणार आणि ही सुविधा कोणाला दिली जात आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने (Twitter) ब्ल्यू टिक सेवेसाठी शुल्क आकारायला सुरुवात केल्यानंतर डेटा सुरक्षिततेचे कारण देत, अनेक सोशल माध्यमांनी ब्ल्यू टिक सेवा (Blue Tick Service) द्यायला सुरुवात केली आहे. आता या यादीत आणखी एक नवीन नाव जोडले गेले आहे; ते म्हणजे जीमेल. होय ट्विटरप्रमाणेच जीमेलने (Gmail) देखील ब्ल्यू टिक सेवा द्यायला सुरुवात केली आहे.

सध्या बनावट ईमेलचे प्रमाण वाढले आहे. याच धर्तीवर कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे Gmail वापरकर्त्यांना आता चांगलीच धडकी भरली आहे. कारण सध्या जीमेल ही सेवा मोफत देत आहे. पण इथून पुढे वापरकर्त्यांना शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. यासाठी किती शुल्क भरावे लागणार आणि ही सुविधा कोणाला दिली जाणार आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

ब्ल्यू टिक सेवा कधीपासून लागू झाली?

गुगलच्या ब्लॉग पोस्टनुसार Gmail वर मिळणारी ब्ल्यू टिक सेवा (Blue Tick Service) 3 मे 2023 पासून लागू करण्यात आली आहे. या आठवड्याच्या शेवटपर्यंत ही सेवा सर्वांपर्यंत पोहचेल, असे कंपनीने म्हटले आहे.

ब्ल्यू टिक सेवा कोणाला मिळणार?

सध्या Gmail कडून ब्ल्यू टिक सेवा (Blue Tick Service) दोन टप्प्यात दिली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात नामांकित कंपन्यांचा (Popular Companies) समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कलाकार मंडळी (Celebrity), मीडिया (Media) आणि त्यानंतर सर्वसामान्य वापरकर्त्यांचा (General Public) यामध्ये समावेश केला जाणार आहे.

या ब्ल्यू टिक सेवेसाठी तुम्हाला Gmail अकाउंट व्हेरिफाय (Verify) करावे लागेल. त्यासोबतच कागदपत्रांची पडताळणी देखील करावी लागणार आहे. ब्ल्यू टिक सेवा घेतल्यानंतर वापरकर्त्यांना बनावट किंवा खोट्या माहितीद्वारे तयार केलेली ईमेल येणार नाहीत, असा कंपनीला विश्वास आहे.

किती शुक्ल द्यावे लागणार?

सध्या बऱ्याच माध्यमांनी ब्ल्यू टिक सेवा (Blue Tick Service) द्यायला सुरुवात केली आहे. या सेवे अंतर्गत ग्राहकांना अनेक वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत. त्या बदल्यात त्यांच्याकडून शुल्क घेतले जात आहे. अशा परिस्थितीत Gmail ने देखील ब्ल्यू टिक सेवा द्यायला सुरुवात केली आहे. मात्र सध्या ब्ल्यू टिकसाठी कोणतेही शुल्क कंपनी आकारणार नाही. ही सेवा सध्या तरी मोफत दिली जात आहे.

Source: navbharattimes.indiatimes.com