Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Power Profit : टाटा पॉवरच्या नफ्यात 48 टक्क्यांची वाढ, भागधारकांना लाभांशही जाहीर

Tata Power Profit

Image Source : www.livemint.com

Tata Power Q4 net profit : टाटा पॉवरने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा निकाल चांगला लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत टाटा पॉवरचा चौथ्या तिमाहीतील नफा 48.5 टक्के वाढला. कंपनीला 939 कोटी रुपयांचा नफा झाला.

48 percent rise in Q4 net profit : टाटा ग्रुप कंपनीच्या टाटा पॉवरने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा निकाल चांगला लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत टाटा पॉवरचा चौथ्या तिमाहीतील नफा 48.5 टक्के वाढला. कंपनीला 939 कोटी रुपयांचा नफा झाला. 

महसूली उत्पन्न 4.1 टक्क्यांनी वाढून 12454 कोटी रुपये झाले. मागील वर्षी चौथ्या तिमाहीचे उत्पन्न 632 कोटी रुपये तर महसूली उत्पन्न 11960 कोटी रुपये होते. टाटा पॉवरच्या संचालक मंडळाने समभागधारकांना प्रति शेअर 2 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली.

प्रति शेअर 2 रुपये लाभांश

BSE (Bombay Stock Exchange) आकडेवारीनुसार, 1 रुपयाच्या दर्शनी मूल्यावर प्रति शेअर 2 रुपये लाभांश देण्याचे जाहीर केले. 19 जून रोजी होणार्‍या एजीएम (अॅन्युअल जनरल मिटिंग) मिटिंगमध्ये अंतिम मंजूरी घेतली जाईल. 21 जून किंवा त्यानंतर शेअरधारकांना लाभांश दिला जाईल. टाटा पॉवरने याआधी जून 2022 मध्ये 1.75 रुपये प्रति शेअर लाभांश जारी केला होता.

टाटाच्या सर्व क्लस्टर्स मधील नफ्यात वाढ

मुंद्रा प्लांटमधील नफा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढीमुळे त्याचा एकत्रित नफा EBITDA (Earnings Before Interest, Taxes, Depreciation, and Amortization) FY22 मध्ये 8,192 कोटी रुपयांच्या तुलनेत 23 टक्के वाढून 10,068 कोटी रुपये झाला. तसेच कंपनीचा एकत्रित अहवाल असे दर्शवतो की, टाटाच्या सर्व क्लस्टर्समध्ये चांगल्या कामगिरीमुळे आर्थिक वर्ष 2022 मधील Process analytical technology (PAT) देखील 2,156 कोटींच्या तुलनेत 77 टक्के वाढून 3,810 कोटी झाला.

कंपनी वचनबध्द

'आम्हाला निकाल जाहीर करताना आनंद होत आहे की, टाटा पॉवरने आर्थिक वर्ष 23 मध्ये आमच्या सर्व बिझनेस क्लस्टर्स - जनरेशन,ट्रान्समिशन, वितरण आणि नवीकरणीय क्षेत्रात चांगली कामगिरी केली. वीजेच्या वाढत्या मागणीमुळे आम्हाला प्रगती करता आला. कारण आम्ही विश्वासार्ह आणि दर्जेदार वीज पुरवठ्यासह देशाची मागणी पूर्ण करण्यास वचनबद्ध आहोत, असे टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी प्रवीर सिन्हा यांनी तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर म्हटले.