खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण (Edible oil price down) होण्यास सुरुवात झालीय. तर आणखी कपात खाद्यतेल उद्योगाकडून केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना खाद्यतेल स्वस्तात मिळेल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्यास महागाईही (Inflation) कमी होण्यास मदत होणार आहे. उत्पादक किंवा रिफायनर्स वितरकांच्या किंमती कमी करतात, तेव्हा त्याचा फायदा या उद्योगांनी ग्राहकांनाही द्यायला हवा, अशी सरकारची भूमिका आहे. आता सध्या ज्या कंपन्यांनी आपल्या खाद्यतेलाच्या किंमती कमी केल्या नाहीत, तसंच त्यांच्या खाद्यतेल उत्पादनाची कमाल किरकोळ किंमत (MRP) इतर ब्रँड्सच्या तुलनेत जास्त आहे, त्या सर्वांनाच किंमतीचा फेरविचार करण्यास सांगितल्याचं सरकारच्या निवेदनात म्हटलंय.
Table of contents [Show]
'धारा'नं केली कपात
अन्न मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशन ऑफ इंडिया (SEAI) आणि इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. मागच्या दोन महिन्यांच्या खाद्यतेल उद्योगाच्या एकूण कामगिरीवर नजर टाकल्यास किंमतीतला फरक दिसून येतो. या दोन महिन्यांमध्ये विविध खाद्यतेलाच्या जागतिक किंमती 200-250 डॉलर टनानं घसरल्या आहेत. मात्र अद्याप किरकोळ बाजारातल्या किंमती कमी झाल्याचं दिसत नाही. त्या लवकरच घसरतील, अशी अपेक्षा सरकारनं व्यक्त केलीय. दरम्यान, मदर डेअरीनं धारा ब्रँडच्या खाद्यतेलाच्या एमआरपीत तत्काळ बदल करून 15 ते 20 रुपये लिटरची कपात जाहीर केली.
Decline in the price of Edible Oil should be passed on to consumers expeditiously: Secretary, Department of Food and Public Distribution, Sanjeev Chopra
— PIB India (@PIB_India) May 4, 2023
DFPD reviews Edible Oil prices in a meeting with stakeholders
Read here: https://t.co/cej5d6fzxW@fooddeptgoi
पामतेलाची आयात 60 टक्के
देशाच्या तेलासंबंधीच्या आयातीचा विचार केला, तर जवळपास 60 वाटा पाम तेलाचा आहे. पाम तेलाच्या (मुंबई बंदरावर) उतरलेल्या किंमती या वर्षी 28 एप्रिलला 1,791 डॉलर टनच्या तुलनेत 44 टक्क्यांनी घसरून 1,000 डॉलर टनवर आल्या आहेत. कच्च्या सोया आणि सूर्यफूल तेलाच्या उतरलेल्या किंमती अनुक्रमे 50 आणि 55 टक्क्यानं घसरून 960 आणि 990 डॉलर टन झाल्या आहेत. भारत आपल्या वार्षिक 24-25 दशलक्ष टन (MT) खाद्यतेलाच्या वापरापैकी जवळपास 56 टक्के आयात करतो. इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांतून सुमारे 8 मेट्रिक टन पाम तेल दरवर्षी आयात करण्यात येतं.
ग्राहक व्यवहार विभागाची आकडेवारी
देशांतर्गत खाद्यतेलामध्ये मोहरी (40 टक्के), सोयाबीन (24 टक्के) तसंच भुईमूग (7 टक्के) आणि इतरांचा समावेश होतो. ग्राहक व्यवहार विभागानं यासंदर्भातली आकडेवारी दिलीय. त्यानुसार शेंगदाणा आणि पामतेल या खाद्यतेलाच्या किरकोळ किंमती गेल्या तीन महिन्यांत अनुक्रमे 185 आणि 105 रुपये लिटरवर आहेत. मोहरीच्या तेलाच्या किरकोळ किंमती तीन महिन्यांपूर्वीच्या किंमतीच्या तुलनेत सुमारे 9 टक्क्यांनी घसरून 150 रुपये लिटर झाल्या.
तेलबियांच्या किंमतीत घसरण
मागच्या महिन्यात मोहरीच्या तेलाच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. तब्बल 14.65 टक्क्यांची ही घसरण होती. तर सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाची महागाई मार्च 2023 या महिन्यात 10.93 टक्के कमी झाली. याच महिन्यात तेल आणि फॅट प्रकारातली किरकोळ चलनवाढ 7.86 टक्कानं घटली आहे. सध्या क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर फक्त 5 टक्के कृषी इन्फ्रा उपकर आणि 10 टक्के शैक्षणिक उपकर लागू होतो. थोडक्यात एकूण कराचं प्रमाण 5.5 टक्के इतकं आहे. दरम्यान, SEAIच्या माहितीनुसार, नोव्हेंबर ते मार्च 2022-23 या कालावधीत खाद्यतेलाची आयात 23.7 टक्क्यांनी वाढून 6.98 MTवर गेलीय.
Source : financialexpress.com