Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Bank: एचडीएफसी बँक ग्रामीण भागात 675 पेक्षा जास्त नव्या शाखा उघडणार

HDFC Bank

एचडीएफसी बँक ग्रामीण आणि निमशहरी भागात 675 नव्या शाखा सुरू करणार आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये या शाखा उघडल्या जातील. पुढील दोन ते तीन वर्षात ग्रामीण भागातील बँकेचा व्यवसाय दुप्पट करण्याचे लक्ष्य बँकेने ठेवले आहे. सोबतच एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी होम लोन या दोन कंपन्यांचे विलीनीकरण देखील येत्या काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम क्षेत्राला कर्जपुरवठा करण्याचे लक्ष्यही वाढेल.

HDFC Bank: एचडीएफसी बँक भारतातील ग्रामीण आणि निमशहरी भागात 675 नव्या शाखा सुरू करणार आहे. (HDFC Bank new branch) बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने रियटर्स या वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील ग्राहकांवर एचडीएफसी बँकेला लक्ष केंद्रित करायचे असून त्याच नीतिचा भाग म्हणून नवीन शाखा सुरू केल्या जातील. या नव्या शाखा चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत सुरू केल्या जातील, अशीही माहिती समोर आली आहे.  

प्राधान्यक्रम क्षेत्रांना कर्जपुरवठा

बँकांनी अर्थव्यवस्थेतील प्राधान्यक्रम क्षेत्रांना कर्जपुरवठा (Priority Sector Lending -PSL) करणे अनिवार्य आहे. सरकारी आणि खासगी बँकांनाही हा नियम लागू आहे. ग्रामीण भागात शाखा सुरू केल्याने सरकारने घालून दिलेले प्राधान्यक्रम क्षेत्रातील कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही बँकेला मदत होईल. अर्थव्यवस्थेतील कमकुवत गट जसे की, अल्पभूधारक शेतकरी, छोटे व्यावसायिक, बचत गट, आदिवासी, दिव्यांग नागरिकांना कर्ज देणे अनिवार्य असते.

सात हजारांपेक्षा जास्त शाखा

सहाशेपेक्षा जास्त शाखा सुरू केल्यानंतर एचडीएफसीच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील शाखांची संख्या 5 हजारपेक्षा जास्त होईल, असे एचडीएफसी रिटेल बँकिंगचे प्रमुख अरविंद व्होरा यांनी म्हटले. देशातील 3,811 पेक्षा जास्त शहरी आणि ग्रामीण भागात एचडीएफसीच्या 7,821 शाखा आणि 19,727 एटीएम मशिन्स आहेत. एकूण शाखांपैकी 52% शाखा ग्रामीण आणि निमशहरी भागात आहेत, असे एचडीएफसीच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

ग्रामीण भागातील एक लाख ग्राहक वाढवण्याचा निर्धार

नव्याने सुरू होणाऱ्या बँक शाखांद्वारे 1 लाख ग्राहक बँकेशी जोडण्याचे उद्दिष्ट एचडीएफसीने ठेवले आहे. सध्या एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी हाऊसिंग लोन या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेपर्यंत पुढील तीन वर्षात नियोजितपणे प्राधान्यक्रम क्षेत्रांना कर्जपुरवठा करावा, असे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेला सांगितले आहे.

ग्रामीण भागातील व्यवसाय दुप्पट करण्याचे उद्दिष्ट

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी होम लोन या दोन कंपन्या एकत्र झाल्यानंतर त्यांचे नवे नाव एचडीएफसी बँक असे असेल. मात्र, दोन्ही कंपन्या एकत्र केल्यामुळे प्राधान्यक्रम क्षेत्राला जास्त कर्जपुरवठा करावा लागेल. त्यासाठी आरबीआयने बँकेला निर्देश दिले आहेत. पुढील दोन ते तीन वर्षात ग्रामीण भागातील बँकेच्या व्यवसाय दुप्पट करण्याचा निर्धार एचडीएफसी बँकेने केला आहे.