Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Investment in India: गुगलने भारतीय स्टार्टअप कंपनी NoBroker मध्ये केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

Google investment in india

Image Source : www.themoscowtimes.com

NoBroker Investment: गुगलने भारतीय स्टार्ट अप कंपनी NoBrokar.com मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे नो ब्रोकर कंपनीमधील 0.5 टक्के हिस्सा Google च्या मालकीचा झाला आहे. या गुंतवणुकीचा नो ब्रोकरला कसा फायदा होईल, हे जाणून घ्या.

जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगल (Google) सातत्याने वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत असते. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी हा पदभार सांभाळल्यानंतर गुगलकडून अनेक वेळा भारतीय व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली गेली आहे. भारतीय स्टार्ट अप कंपनी नो ब्रोकर मध्ये (No Broker) गुगलकडून 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. गुगलच्या या गुंतवणुकीमुळे नो ब्रोकरला कसा फायदा होईल, हे जाणून घेऊयात.

Google ने किती गुंतवणूक केली?

नोब्रोकरचे सह-संस्थापक अखिल गुप्ता (No Broker Co-Founder Akhil Gupta) यांनी सांगितले की, गुगलने नो ब्रोकर कंपनीमध्ये 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारतीय चलनानुसार ही गुंतवणूक सुमारे 41,22,35,000 रुपये इतकी आहे. ही गुंतवणूक एक अब्ज डॉलर्सच्या किंमतीवर झाली आहे. याचा अर्थ असा की, नो ब्रोकर कंपनीमधील 0.5 टक्के हिस्सा Google कडून खरेदी करण्यात आला आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई डिसेंबर 2022 मध्ये जेव्हा भारतात आले होते, त्यावेळी त्यांनी इंडिया डिजिटलायझेशन फंडची (India Digitalization Fund) घोषणा केली होती. हा फंड 10 अब्ज डॉलर्स इतका होता. गुगलच्या याच फंडातून ही गुंतवणूक केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

NoBrokar.com ला गुंतवणुकीचा कसा फायदा होईल?

गुगल (Google) ही जगातील सर्वात मोठ्या कंपनी पैकी एक आहे. आजच्या घडीला गुगलकडे मोठा डेटा उपलब्ध आहे. नो ब्रोकर (No Broker) ही कंपनी ऑनलाईन पद्धतीने कामकाज करते, अशावेळी ग्राहकांचा डेटा त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. गुगलच्या मदतीने  नो ब्रोकरला भारतातील प्रत्येक शहरातील मुख्य ग्राहकापर्यंत पोहचणे सहज शक्य होईल, असे नो ब्रोकरचे सह-संस्थापक अखिल गुप्ता यांनी सांगितले.

ते पुढे असेही म्हणाले की, या गुंतवणुकीमुळे आम्हाला जास्तीत जास्त ग्राहकांना आम्ही आमची सेवा देता येईल. लोकांना सहज, सोप्या पद्धतीने घरं उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.

NoBrokar.com कंपनी काय करते?

NoBrokar.com एक रिअल इस्टेट स्टार्टअप आहे. आयआयटी बॉम्बेचे अमित कामर (Amit Kamar)आणि सौरभ गर्ग (Saurabh Garg), आयआयटी कानपूरचे पदवीधर अखिल गुप्ता (Akhil Gupta) यांनी मिळून या कंपनीची स्थापना केली. ज्या अंतर्गत लोकांना दलाली शिवाय घर घेता येणं शक्य होणार आहे. दलाली शिवाय घर (Without Brokerage Home) ही कल्पना युनिक असल्याने लोकांनी तिला उचलून धरली आणि काही काळातच कंपनी यशस्वी झाली.

NoBrokar.com त्यांच्या मुख्य सेवेसोबत घरासंदर्भातील अनेक सेवा प्रदान करतात. जसे की, होम पेंटिंग, होम क्लीनिंग सर्विस, घराचे कायदेशीर व्यवहार आणि कामकाज, घरातील सामानाचे पॅकिंग करणे, गृहकर्ज उपलब्ध करून देणे यासारख्या सुविधा पुरविल्या जातात.

ही कंपनी बंगळूर, मुंबई, पुणे, चेन्नई, हैद्राबाद, कोलकत्ता, अहमदाबाद , जयपूर, आणि दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांमध्ये काम करत आहे. या शहरांमध्ये तिचे अडीच दशलाखाहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते (Registered Users) आहेत.

NoBrokar.com मध्ये यापूर्वी कोणी गुंतवणूक केली आहे?

या कंपनीमध्ये जनरल अटलांटिक, टायगर ग्लोबल, ईलीवेशन कॅपिटल, मूर स्ट्रॅटेजिक वेंचर्स, बेनेक्स्ट, बिनोज आणि केटीबी या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.