Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Expensive Cities In World: जगातील महागड्या शहरात मुंबईचा नंबर कितवा? आलिशान घरांच्या किंमतीमध्ये 37 व्या क्रमांकावर

luxury housing

भारताची आर्थिक राजधानी मुंबईतील आलिशान घरांच्या किंमती ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. आलिशान घरांच्या किंमतीमध्ये जगात मुंबईचा क्रमांक 37 वा आहे. तसेच महागड्या शहरांच्या यादीतही मुंबई 18 व्या क्रमांकावर आहे. दिल्ली, बंगळुरु शहरातील आलिशान घरांचे दर किती आहेत, माहिती करुन घ्या. लक्झ्युरियस घरांच्या मागणीत दुबई पहिल्या क्रमांकावर आहे.

Expensive Cities in World: कोरोनानंतर जगभरात महागाई गगनाला भिडली आहे. मुंबई भारतातील महागड्या शहरांपैकी एक आहे. मात्र, आता जागतिक स्तरावरील महगाड्या शहरांच्या यादीतही मुंबईचा क्रमांक वर येत आहे. तसेच मुंबईतील आलिशान घरांच्या किंमतीही जगातील प्रमुख देशांच्या बरोबरीने वाढत आहेत. आलिशान घरांच्या किंमतीमध्ये 37 व्या क्रमांकावर आहे. तर महागड्या शहरांच्या यादीत 18 व्या क्रमांकावर आहे.

एक वर्षात मुंबईत घरांच्या किंमती 6.4% वाढल्या (House price Hike Mumbai)

आलिशान घरांच्या किंमतीमध्ये जगात मुंबईचा क्रमांक मागील एक वर्षात 92 वरुन 37 व्या स्थानावर आला आहे. 2022 शी तुलना करता मुंबईतील घरांच्या किंमतींमध्ये 6.4% वाढ झाली आहे. प्रॉपर्टी कंन्सलटंट नाइट फ्रँक कंपनीने नुकताच 'The Wealth Report 2023' जाहीर केला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. Prime International Residential Index (PIRI 100) असा शंभर देशांची यादी या अहवालात देण्यात आली आहे. जगभरामध्ये मागील एक वर्षात आलिशान घरांच्या किंमतीमध्ये 5.2% वाढ झाल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

बंगळुरू दिल्लीतही मालमत्तांची मागणी वाढली (Bangalore property price)

चालू वर्षात मुंबईमध्ये आलिशान घरांच्या (Expensive Cities In World) किंमती 3% दराने वाढतील, अशा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. बंगळुरु हे भारतातील आणखी एक महत्त्वाचे शहरही या यादीत वरती आले आहे. 2021 साली बंगळुरुचा क्रमांक 91 वा होता. तो आता 63 वर आला आहे. दिल्लीमधील लक्झ्युरिअस घरांच्या किंमतीही 1.2% वाढल्या आहेत. दिल्लीचा क्रमांक 93 वरुन 77 वर आला आहे.

दुबईत सर्वात महागडी घरं (Dubai has most Costlier homes)

दुबई शहर आलिशान घरांच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 वर्षात दुबईमध्ये घरांच्या किंमती तब्बल 44.2% वाढल्या आहेत. हाय एंड नेटवर्थ असेलल्या व्यक्तींचीच दुबईमध्ये घरे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर Aspen, तिसऱ्या क्रमांकावर रियाध त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अनुक्रमे रियाध, टोकियो आणि अमेरिकेतील मियामी शहर आहे.

मोनॅको शहर महाग

अहवालानुसार, मोनॅको शहर सर्वात महागडे आहे. महागड्या शहरांच्या यादीत त्याचा पहिला क्रमांक आहे. 1 मिलियन युएस डॉलरमध्ये फक्त 17 स्केअर मीटर जागा विकत घेता येऊ शकते. तर एवढ्याच पैशात हाँगकाँग मध्ये 21 स्केअर मीटर आणि न्युयॉर्क शहरात 33 स्केअर मीटर जागा येईल. वरील शहरांच्या तुलनेत मुंबई शहरातील दर थोडे कमी आहेत. मुंबईमध्ये 1 मिलियन डॉलरमध्ये 113 स्केअर फूट जागा येईल. महागड्या शहरांच्या यादीत मुंबईचा क्रमांक 18 वा आहे.

आलिशान सदनिकांची भारतातील मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे मत नाइट फ्रँकलिन इंडियाचे संचालक शिशिर बैजल यांनी मांडले. आशिया पॅसिफिक विभागात मुंबई शहर महागाईच्या बाबतीत टोकियाच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर आहे.