MahaRERA Probe: राज्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या कारभाराची चौकशी महारेराने (Maharashtra Real Estate Regulatory Authority) सुरू केली होती. यामध्ये अनेक बिल्डर महारेराच्या नियमांचे पालन करत नसून बेकायदेशीर व्यवहार करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. 2016 साली महारेरा कायदा आल्यानंतर बिल्डरांकडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या कामांना चाप बसला. मात्र, अद्यापही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे बिल्डर कामकाज करत असल्याचे दिसून येत आहे.
1781 प्रकल्पांकडून नियमांचे उल्लंघन (MahaRERA investigation)
एका बांधकाम प्रकल्पासाठी एकच बँक खाते लिंक करावे, असा महारेराचा नियम आहे. मात्र, राज्यातील 1,781 प्रकल्पांनी या नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. म्हणजेच या प्रकल्पांसोबत एकापेक्षा जास्त बँक खाती लिंक करण्यात आली आहेत. एका बँकेचे अकाउंट अनेक प्रकल्पांना लिंक करण्यामध्ये घोटाळा होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा प्रकारे लिंक करण्यास परवानगी नाही.
एक रजिस्ट्रेशन नंबरसाठी एकच खाते (One Bank account for One housing project)
महारेरा कायद्यानुसार एका बांधकाम प्रकल्पासाठी एकच बँक खाते जोडण्याचा कायदेशीर नियम आहे. खात्यातील रक्कम दुसऱ्या कामांसाठी न वळवता एकाच प्रकल्पासाठी रक्कम वापरली जावी. (Housing project investigation by MahaRERA) पैशांचा गैरवापर होऊ नये, हा उद्देश त्यामागे आहे. वेळेत गृहप्रकल्प पूर्ण होण्यासाठी हे गरजेचे आहे. मात्र, राज्यातील बिल्डर या नियमाचे सर्सास उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे.
सॉफ्टवेअर प्रणालीत बदल
या प्रकाराची महारेराने गंभीर दखल घेतली असून 45 प्रकल्पांना तातडीने नोटीस पाठवली आहे. तर उर्वरीत प्रकल्पांना नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारे एका प्रकल्पाला एकापेक्षा जास्त बँक खाती लिंक करता येऊ नयेत, यासाठी ऑनलाइन प्रणालीतही बदल करण्यात आला आहे. जर दुसरे बँक खाते लिंक करण्याचा प्रयत्न केला, तर अकाऊंट लिंक होणार नाही, असे महारेराने म्हटले आहे. म्युच्युअल बँक खात्यात (एकत्र खाते) नव्या अपडेटनुसार बदलही करता येणार नाहीत.
ग्राहकांच्या हित रक्षणासाठी महारेराकडून चौकशी
ग्राहकांच्या हित रक्षणासाठी महारेराने ही पावले उचलली आहे. याद्वारे बिल्डरांकडून केल्या जाणाऱ्या व्यवहारांत पारदर्शकता येण्यासही मदत होणार आहे. प्रकल्पासाठी मिळालेला 70% निधी खात्यात मेंटेन करून ठेवणे अनिवार्य आहे. तसेच अचानक खात्यातून मोठी रक्कम बिल्डरला काढताही येत नाही. प्रकल्प विकासाच्या कोणत्या टप्प्यात आहे, त्यानुसार अपडेट दिल्यानंतरच खात्यातून पैसे काढता येतात.
313 प्रकल्पांना मागील आठवड्यात नोटीस (MahaRERA notice to 131 project)
ज्या प्रकल्पांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांना प्रोजेक्टमध्ये एकूण फ्लॅट्स किती आहेत. बुकिंग, पैशांचे व्यवहार याची माहिती मागीतली आहे. मागील आठवड्यात महारेराने 313 प्रकल्पांमध्ये अनियमीतता असल्याचे समोर आणले. प्रकल्पावर झालेला खर्च आणि बांधकाम कोणत्या टप्प्यात आहे, यामध्ये अनियमितता दिसून आली. या प्रकल्पांचीही कसून चौकशी सुरू आहे.