यावर्षी होळीनिमित्त अनेकांनी कुठेतरी भेट देण्याचा बेत आखला असेल. बाजाराचा कल पाहता, गोवा, जयपूर, काश्मीर सारखी भारतीय ठिकाणे तसेच दुबई आणि सिंगापूर सारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांना सर्वाधिक मागणी आहे. अशा स्थितीत या ठिकाणांवरील फ्लाइट्सचे बुकिंग जवळपास पूर्ण होत आहे आणि पण विमान भाड्यात 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग सेवा देणारी एक्झिगो (ixigo) कंपनीच्या मते, मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्याच्या 6 ते 12 तारखेदरम्यान विमान प्रवास भाड्यात ही वाढ त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नोंदवण्यात आली आहे. भारतात होळीचा सण ७ आणि ८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.
बुकिंग 30 टक्क्यांनी वाढले
एक्झिगो (ixigo) चे सह-संस्थापक आणि ग्रुप सीईओ आलोक वाजपेयी म्हणतात की, 6 ते 12 मार्च दरम्यान कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरील अनेक लोकप्रिय मार्गांवर विमान भाड्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. हे प्रमाण 6 ते 12 फेब्रुवारीच्या तुलनेत 10 ते 15 टक्के अधिक आहे. वाजपेयींनी सांगितले की त्यांच्या पोर्टलवर होळीच्या आठवड्यासाठी आगाऊ बुकिंग 30 टक्क्यांनी वाढले आहे. जयपूर, गोवा, काश्मीर, दुबई आणि सिंगापूर ही सर्वात जास्त सर्च केलेली आणि बुक केलेली ठिकाणे आहेत.
मुंबई-गोव्यातील भाव सर्वाधिक वाढले
मुंबई आणि गोव्यात सर्वाधिक विमान भाडे आहे. 6 ते 12 फेब्रुवारी दरम्यान मुंबई-गोवा फ्लाइटचे सरासरी भाडे 2,583 रुपये होते. जे 6 ते 12 मार्च दरम्यान 3,883 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच ही भाडेवाढ 50.3 टक्के आहे. त्याचप्रमाणे पुणे ते दिल्ली या विमानाचे भाडे 29.4 टक्क्यांनी वाढले आहे. तर दिल्ली-बेंगळुरू 21 टक्के, दिल्ली-पाटणा 17.3 टक्के, लखनौ-दिल्ली 15.8 टक्के आणि दिल्ली-रांची 14.3 टक्क्यांनी वाढले आहेत.
गोवा, दुबई सर्चलिस्टमध्ये टॉपवर
देशांतर्गत सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या भारतीय कुटुंबांसाठी गोवा हे सर्वात लोकप्रिय सर्च करण्यात आलेले ठिकाण आहे, तर दुबई हे सर्वाधिक मागणी असलेले आंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणून सर्च यादीत टॉपवर आहे. डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरील सर्च डेटाच्या आधारे, गोवा, दिल्ली आणि एनसीआर, मुंबई, पाँडिचेरी आणि जयपूर ही राज्ये/शहरे टॉप 5 राष्ट्रीय म्हणून तर दुबई, सिंगापूर, मालदीव, बाली (इंडोनेशिया) आणि फुकेत (थायलंड) आंतरराष्ट्रीय विभागामध्ये सर्च चार्टमध्ये आघाडीवर आहे.
Source: https://bit.ly/3Yj1aId