Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Consumer Goods Price Hike: रेफ्रिजरेटर, एसीसह पॅकेज्ड फूडच्या किंमती वाढणार; उन्हाळ्यातील शॉपिंग महागणार

Consumer Goods Price Hike

यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनरच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. आता उन्हाळ्यात (समर शॉपिंग) करताना ग्राहकांना घामाच्या धारा लागू शकतात. रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरच्या किंमतींमध्ये वाढ होणार असल्याचे ही इलेक्ट्रिक उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे. सोबतच पॅकेज्ड फूड, मद्य आणि आयात केलेल्या तयार कपड्यांच्या किंमतीही वाढतील असे समोर आले आहे.

Consumer Goods Price Hike: यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. आता उन्हाळ्यात (समर शॉपिंग) शॉपिंग करताना ग्राहकांना घामाच्या धारा लागू शकतात. रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरच्या (AC and fridge Price Hike) किंमतींमध्ये वाढ होणार असल्याचे ही इलेक्ट्रिक उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे. सोबतच पॅकेज्ड फूड, मद्य आणि आयात केलेल्या तयार कपड्यांच्या किंमतीही वाढतील असे या क्षेत्रातील कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.

रुपया कमकुवत तर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ

ही दरवाढ 10 टक्क्यांपर्यंत असू शकते. पर्सनल केअर प्रॉडक्टच्या किंमतीही वाढू शकतात, असे कन्झ्युमर गुड्स क्षेत्रातील कंपन्या आणि जाणकारांचे मत आहे. कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत चालल्याने आयातही महागली आहे. याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

पुढील दोन महिन्यात होईल भाववाढ

पुढील एक ते दोन महिन्यात ही दरवाढ दिसून येईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. कोरोनाकाळात महागाईने उच्चांक गाठला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ केल्याने सर्वच क्षेत्रातील महागाई नियंत्रणात आली होती. मात्र, आता पुन्हा किंमती वाढतील. कोरोनाकाळात जेवढी दरवाढ झाली होती, तेवढी मात्र, दरवाढ होणार नाही. ही दिलासादायक गोष्ट आहे. 

उत्पादनांना मागणी रहावी म्हणून कंपन्या सध्या कच्च्या मालासाठी लागणारे अतिरिक्त पैसे आणि आयातीचा बोजा स्वत: सहन करत आहेत, असे ग्राहकोपयोगी उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले. एप्रिल जून तिमाहित शहरी आणि ग्रामीण भागातील वस्तुंची मागणी सुरळीत होईल, अशी अपेक्षा या कंपन्यांना आहे.

ब्रिटानिया, डाबर कंपन्यांची उत्पादने महागण्याची शक्यता 

ब्रिटानिया आपल्या पॅकेज्ड फूडच्या किंमती 3% पर्यंत वाढवेल , असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. डाबर कंपनी विविध वस्तुंच्या किंमती वाढवण्याच्या तयारी असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा यांनी म्हटले आहे. BSH Household Appliances आणि व्होल्टास या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनीही दरवाढ होणार असल्याचे म्हटले आहे.