भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी म्हणून इंडिगोने आतापर्यंत एअरबसकडून अनेक अरुंद बॉडी असलेली विमाने खरेदी केली आहेत आणि फ्रान्सचे अर्थमंत्री ब्रुनो ले मायरे यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की इंडिगो युरोपियन विमान निर्मात्याकडून लवकरच शेकडो विमाने ऑर्डर करणार आहे.
840 विमानांची देणार ऑर्डर (Order for 840 aircraft)
इंडिगो वाईड-बॉडी जेट्स खरेदी करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. ज्यामुळे बोईंगच्या 787 ड्रीमलाइनर आणि अपग्रेड केलेल्या एअरबस A330neo यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. इंडिगो, इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या मालकीची, इंडिगोच्या प्रतिनिधीने रॉयटर्सला सांगितले की एअरलाइन उत्पादकांशी सतत चर्चा करत आहे कारण कराराच्या पुढील टप्प्याची योजना इंडिगो आखत आहे. त्यांनी अद्याप काहीही निश्चित केलेले नाही."
'एअरबस' की 'बोईंग' कोणाला मिळणार ऑर्डर (Who will get the order 'Airbus' or 'Boeing'?)
एअरबसने कोणत्याही चर्चेवर भाष्य करण्यास नकार दिला, बोईंगनेही तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. देशांतर्गत एअरलाई बाजारपेठेतील 55% वाटा असलेल्या IndiGo ने मोठ्या प्रमाणात एअरबसला अरुंद-बॉडी जेट्सची ऑर्डर दिली आहे. इंडिगो आधीच एअरबसच्या सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे आणि त्यांनी आतापर्यंत एकूण 830 एअरबस A320-फॅमिली जेट्सची ऑर्डर दिली आहे ज्यापैकी 488 अद्याप डिलिव्हर करणे बाकी आहे.
एअरबससाठी वाईड-बॉडी विमाने तयार करणे आव्हानात्मक ठरणार आहे. बोईंग कंपनीला वाईड-बॉडी विमाने तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. इंडिगोने गेल्या महिन्यात तुर्की इयरलाईन्सकडून बोईंग 777 हे विमान खरेदी केले आहे. याद्वारे इंडिगोने आपले फॉरेन ऑपरेशन्स सुरू केले आहे.
गेल्या महिन्यात एअरइंडियाने केला मोठा करार (Air India signed a big deal last month)
टाटा समूहाच्याच्या मालकीच्या एअर इंडियाने गेल्या महिन्यात एअरबस आणि बोईंगकडून विक्रमी 470 जेट्ससाठी करार केला आणि तात्काळ गरजांसाठी आणखी 25 विमाने भाड्याने देण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे एकूण 495 विमानांचा करार पूर्ण झाला आहे.
इंडिगोने 2006 मध्ये आपली व्यावसायिक उड्डाणे सुरू केली आणि देशाच्या ईशान्येकडील दुर्गम ठिकाणांसह 75 हून अधिक भारतीय शहरांमध्ये यशस्वी उड्डाण केले. एअरलाईन दुबई, सिंगापूर, हनोई आणि मालदीवसह जवळपासच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील उड्डाण करते आणि तुर्की एअरलाइन्ससह भागीदारीद्वारे युरोपमध्ये कंपनीचा विस्तार करत आहे.