Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Note Memes: RBI च्या घोषणेनंतर 2000 च्या नोटेबाबत सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

2000 Notes Memes

Reserve Bank of Indian ने 2000 रुपयांच्या नोटा आता चलनातून बाद केल्या जाणार आहेत असे काल जाहीर केले. त्यानंतर या निर्णयानंतर काल रात्रीपासून सोशल मिडीयावर अफलातून अशा मिम्सचा पाऊस पडताना दिसतो आहे. यात सामान्य नागरिक आणि राजकीय पक्ष देखील सामील आहेत हे विशेष. चला तर पाहूयात असेच काही प्रातिनिधिक मिम्स...

2000 रुपयांच्या नोटा आता चलनातून बाद केल्या जाणार आहेत हे आता सर्वांना कळून चुकलं आहे. 2018 पासून रिझर्व बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती. या नोटा फार तुरळक प्रमाणात चलनात होत्या. व्यवहारात 2000 रुपयांच्या नोटा आढळत नसल्यामुळे अनेकदा सोशल मिडीयावर उलट सुलट चर्चा रंगताना पहायला मिळाल्या होत्या. परंतु आता खुद्द रिझर्व बँक ऑफ इंडियाने घोषणा केल्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

असे असले तरी 8 नोव्हेंबर 2016  नोटबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात उद्भवलेल्या समस्यांना उजाळा मिळतो आहे. 2016 साली झालेल्या नोटबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने रद्दबातल केल्या होत्या. आता 2000 रुपयांच्या नोटेबाबत कायदेशीर चलनाचा मुद्दा नसला तरी नेटकऱ्यांनी मिश्किलपणे आरबीआयच्या या निर्णयावर टिप्पणी केली आहे.

काल रात्रीपासून सोशल मिडीयावर अफलातून अशा मिम्सचा पाऊस पडताना दिसतो आहे. यात सामान्य नागरिक आणि राजकीय पक्ष देखील सामील आहेत हे विशेष. चला तर पाहूयात असेच काही प्रातिनिधिक मिम्स.

2000 रुपयाची अंत्ययात्रा 

काही नेटकऱ्यांनी आरबीआयच्या घोषनेनंतर 2000 रुपयाच्या नोटेची अंत्ययात्रा निघतानाचे मिम तयार केले आहे.यापुढे  2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात दिसणार नाहीयेत, हा संदर्भ लक्षात घेत हे मिम बनवले गेले आहे. हे मिम मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दुवाओ में याद रखना…

भारतीय युवक कॉंग्रेसने देखील एक मिम शेयर केले असून 2000 रुपयाची नोट आपल्याला सोडून चालली आहे आणि परत कधी भेटणार नाहीये असा आशय त्यात दर्शवला आहे.

अशाच एका नेटकऱ्याने 500 रुपयांची नोट 2000 च्या नोटेला चिडवतानाचे मिम बनवले आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये जेव्हा नोटबंदी केली गेली तेव्हा तत्कालीन 500 आणि 1000 च्या चलनी नोटा रद्द केल्या गेल्या होत्या. त्यानंतर 500 च्या आणि 2000 च्या नव्या चलनी नोटा आरबीआयने चलनात आणल्या होत्या.

नव्याने चलनात आणलेल्या 500 रुपयांची नोट अजूनही चलनात आहे, 2000 ची नोट मात्र आता चलनात दिसणार नाहीये, म्हणून या मिमद्वारे नेटकरी हास्यविनोद करताना दिसत आहेत.

तसेच ज्यांच्याकडे 2000 च्या नोटा नाहीत असे लोक नाचत असल्याचे एक मिम देखील प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 

 Nano Chip ची आठवण…

नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर देशभरात वेगवगेळ्या चर्चा आणि अफवांना पेव फुटले होते. काही अफवांना पत्रकार देखील बळी पडले होते. त्यावेळी 2000 रुपयांच्या नोटेमध्ये नॅनो चिप बसवलेली आहे आणि त्याद्वारे सरकारला देशातील पैशांचा हिशोब ठेवणे सोपे जाणार असल्याचे म्हटले जात होते. नंतर ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. नेटकऱ्यांनी सदर पत्रकारांचे जुने व्हिडियो पोस्ट करत त्यावर क्रिएटिव्ह कमेंट्स, पोस्ट्स आणि मीम्स तयार केले आहेत.