Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Note: किती नोटा बदलता येणार? ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम झाल्यास काय करावं?

2000 Note: किती नोटा बदलता येणार? ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम झाल्यास काय करावं?

2000 Notes : आरबीआयनं 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करायच्या आहेत. आता ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांची मात्र लगबग सुरू झालीय. तुमच्याकडेदेखील 2000 रुपयांची नोट असेल तर ती लवकर बँकेत जमा करावी.

कोणत्याही बँकेत जाऊन 2000 रुपयांच्या नोटा जमा करून इतर नोटा तुम्हाला मिळतील. 100, 200, 500 रुपयांच्या नोटा तुम्हाला दिल्या जातील. देशात 2000 रुपयांच्या नोटांचं चलन कमी होतंय. यासोबतच काळा पैसा (Black money) साठवण्यासाठीदेखील 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांचा वापर सुरू झाल्याचं दिसून येत आहे. आता आरबीआयने या नोटा बंद करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे पुन्हा एकदा काळा पैसा बाहेर येतो का, हे पाहावं लागणार आहे. याविषयी टीव्ही 9नं वृत्त दिलंय.

समस्यांना सामोरं जावं लागणार

ज्यांच्याकडे 2 हजाराच्या नोटा असतील त्यांना बँकेत जाऊन त्या बदलून घ्याव्या लागतील. 2016च्या नोटाबंदीमध्ये जेव्हा 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या, तेव्हा त्या बदलण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला आणि त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. यावेळी तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नसली तरी सर्वसामान्यांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, अशी शक्यता आहे. तसंच बँकांमध्ये लांबच लांब रांगा लागण्याचीदेखील शक्यता व्यक्त होतेय.

मर्यादा किती?

तुम्ही बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या तर त्यावर कोणतीही बंधनं आणि मर्यादा नाहीत. तसंच जर एखाद्या ग्राहकाचं बँक खातं नसेल तर तो 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकतो. म्हणजे एका दिवसात 2000 रुपयांच्या फक्त 10 नोटा बदलण्यास मुभा आहे.

केवायसी आवश्यक

20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा तर तुम्हाला बदलून मिळतील. मात्र तुमच्याकडे 2000 रुपयांच्या 25 लाख 40 हजार रुपयांपेक्षा जास्त नोटा असल्यास अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार, हा प्रश्नही पडलेला आहे. जर तुमच्याकडे या मर्यादेपेक्षा जास्त पैसे असतील तर त्यासाठी बँक खातं असणं गरजेचं आहे. बँक खात्यासोबत पूर्ण केवायसी असणंदेखील आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला हवे तेवढे पैसे बँकेत जमा करता येवू शकतात. खूप जास्त रक्कम असेल तर अशावेळी संबंधइत ग्राहकाना उत्पन्नाचा स्रोतदेखील सांगावा लागणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं बँक खातं नाही, ते मात्र 26 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या नोटा बदलू शकणार नाहीत.

काळ्या पैशाचं काय?

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 23 मे 2023पासून देशभरातल्या चलनातून 2000 रुपयांच्या नोटा सर्व बँकांमधून परत मागवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं देशभरातल्या लोकांनी अनेकदा पाहिलंय. सध्या एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटा येणं पूर्णपणे बंद झालंय. त्यामुळे आरबीआयनं अशा नोटा परत घेण्याचा निर्णय घेतलाय. आरबीआयच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा काळा पैसा बाहेर येण्याची शक्यता व्यक्त होतेय. खरं तर 2016साली काळा पैसा बाहेर आणण्यासाठी नोटाबंदी केल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र हा उद्देश सफल झाला नाही. मोठ्या प्रमाणात पैशांचा अपव्यय झाला. आता या निर्णयावर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा टीका करण्यास सुरुवात केलीय.