2000 Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 च्या नोटा ग्राहकांना न देण्याचा आदेशही दिला आहे. तुमच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा कराव्या लागणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे, की आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनात बदलल्या जाऊ शकतात. अशातच जर बँकेने तुमची 2000 रुपयाची नोट घेण्यास नकार दिला तर कराल? जाणून घेऊया, काय सांगतो नियम.
नोटा बदलून देण्यास बँकेने नकार दिल्यास काय करावे?
तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलून घ्यायच्या असतील तर तुम्ही बँकेत जाऊन त्या जमा करू शकता. 30 सप्टेंबर 2023 पूर्वी, जर बँक शाखा किंवा इतर कोणत्याही बँकेने 2000 रुपये घेण्यास नकार दिला तर तुम्ही त्याबद्दल संबंधित बँकेत जाऊन तक्रार करू शकता. जर बँक 30 दिवसांच्या आत उत्तर देत नसेल किंवा तक्रारदार बँकेच्या उत्तराने समाधानी नसेल, तर तो RBI पोर्टलवर आपली तक्रार नोंदवू शकतो.
बँकेत नोटा जमा करण्याबाबत काही निर्बंध आहेत का?
तुम्हाला तुमचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. बँकेत तुम्ही कितीही नोटा जमा करू शकता. त्यासाठी तुम्हाला KYC आणि बँकेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. तुम्हाला जर नोटा बदलून पाहिजे असल्यास फक्त 20 हजार रुपयांच्या म्हणजेच 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून मिळेल.
कोणत्या बँकेतून बदलता येतील नोटा?
तुमच्या क्षेत्रातील कोणत्याही बँकेत तुम्ही 2000 रुपयांच्या नोटा एक्स्चेंज करू शकता. पण, त्या बँकेचे तुमचे बँक अकाऊंट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही बँकांच्या बिझनेस करस्पाँडंट्सच्या माध्यमातूनही नोटा एक्स्चेंज करू शकता. यासाठी दिवसाला 4000 रुपयांची मर्यादा आहे. तुम्हाला जर 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम हवी असेल तर, तुम्हाला सर्व पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करावे लागतील, त्यानंतर तुम्ही जास्त रक्कम मिळवू शकता.