Amravati Market: विदर्भातील अमरावती हे शहर 'अंबानगरी' म्हणून ओळखले जाते. विदर्भातील सर्वात मोठे कपडा मार्केट तिथे स्थित आहे. बिझीलँड, सिटीलँड हे तेथील सर्वात मोठे कपडा मार्केट आहे. कपडा मार्केट बरोबरच अमरावतीमध्ये भाजीपाला आणि फळांचे मार्केट सुद्धा आहेत. त्या मार्केटमध्ये वार्षिक 15 कोटी रुपयांच्या वर उलाढाल होते. विदर्भात नागपूरची बाजारपेठ सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. अमरावती बाजारपेठ ही विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे.
Table of contents [Show]
अमरावती मार्केटमध्ये भाज्यांची आवक किती होते?
विदर्भात विविध प्रकारचा शेतमाल शेतकऱ्यांकडून उपलब्ध होतो. बाजारात कांद्याची आवक 67 हजार 267 क्विंटल तर बटाट्याची आवक 83000 क्विंटल होते. त्याचबरोबर वांग्याची आवक 26500 क्विंटल तर कोथिंबीरची आवक 17500 क्विंटल इतकी होते. कोहळे 18000 क्विंटल तर गाजराची आवक 13000 क्विंटल इतकी होते. इतर शहरांमधून दररोज या बाजारपेठेत शेतमालाची आवक होते.
फळांची आवक
अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पन्न सर्वाधिक होते. तेथील बाजारात दररोज सध्या संत्राची आवक 4600 क्विंटल इतकी होत आहे. त्याचबरोबर मोसंबीची आवक 6000 क्विंटल होत आहे. बाजारात डाळिंबाची आवक 8100 क्विंटल इतकी होत आहे. कैरी आंब्याची आवक तेथील मार्केटमध्ये 1900 क्विंटल इतकी होत आहे. लिंबाची आवक 10300 इतकी होत आहे. दशहरी, तोतापुरी, निलम, बदाम इत्यादि आंब्याची आवक बाजारपेठेमध्ये दररोज 15 ते 20 ट्रक इतकी होते.
लिंबासाठी प्रसिद्ध असलेला बाजार
अमरावती जिल्हात नांदगाव खंडेश्वर, परतवाडा, माहूली, नांदगाव पेठ हा भाग लिंबासाठी प्रसिद्ध आहेत. विदर्भासह देशाच्या विविध भागात अमरावती जिल्ह्यातील लिंबू जातो. मे महिन्यात लिंबाचे दर 55 ते 60 रुपयांचा दर गाठतात. पण, यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे लिंबाचे दर 30 ते 35 रुपये किलोवर थांबले आहेत. विदर्भातील शेतकरी शेतात सर्वच प्रकारचे पिकं घेऊन पाहतात. एकदा केलेल्या प्रयोग जर सक्सेस झाला तर शेतात नेहमी ते पिकं घेतले जातात.
दरवर्षी बाजारपेठेत 15 कोटी 96 लाख 47 हजार रुपयांची उलाढाल
अमरावती मधील अनेक कामगार काही वर्षापूर्वी फक्त एक ‘गिलावडा’ खाऊन आपला दिवस काढत होते. त्यावेळी रोजगार उपलब्धी कमी असल्याने कुठेही टिकून राहण्यासाठी अनेक कामगार उपाशी राहून काम करीत होते. अमरावती मधील बाजारपेठेमुळे अनेकांना रोजगार प्राप्त झाला, अनेक लोकं व्यावसायिक बनले आहेत. अमरावतीमधील मुख्य बाजार आणि उपबाजार मिळून वार्षिक उलाढाल तेथे 15 कोटी 96 लाख 47 हजार रुपयांची होते.