Goonj Fellowship : गुंज फेलोशिप ही एक वर्षाची फेलोशिप आहे. यात दोन फेलोशिप आहेत, गुंज अर्बन फेलोशिप आणि ग्रासरूट फेलोशिप. पदवीधर तरूण आणि व्यावसायिकांना भारतातील वास्तविकता प्रत्यक्ष पाहण्याची आणि वास्तविक समस्यांवर काम करण्याची संधी या फेलोशिपच्या माध्यमातून मिळते. ग्रामीण भागातील ग्राऊंड लेव्हलवरील समस्या त्याचबरोबर विविध संघासोबत काम करण्याचा अनुभवसुद्धा मिळतो. या फेलोशिपसाथी अर्ज करणारा तरूण पदवीधर असणे आवश्यक आहे. ही फेलोशिप फक्त भारतीय नागरिकांना दिली जाते. त्याचबरोबर अर्जदाराचे वय 21-30 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे. या फेलोशिपबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
गुंज फेलोशिपमध्ये किती स्टायपेंड मिळतो?
या फेलोशिपसाथी निवडलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये ते 20,000 रुपये प्रति महिना फेलोशिप स्टायपेंड दिला जातो. स्टायपेंडमध्ये प्रवास शुल्क, इंटरनेट शुल्क, फोन रिचार्ज इत्यादींचा समावेश असतो. उमेदवारांना शहर प्रवास भत्तासुद्धा दिल जातो. फेलो नियमित राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त दर वर्षी 20 अतिरिक्त सुट्ट्यांसाठी देखील पात्र आहेत. पाणी, स्वच्छता, पायाभूत सुविधा, शिक्षण यापैकी प्रभाव क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 3 महिन्यांचा प्रकल्प आराखडा उमेदवाराला तयार करावा लागेल.
गुंज फेलोशिप अर्ज प्रक्रिया
- गुंज फेलोशिप अर्ज गुंज संस्थेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये केला जातो.
- इच्छुक अर्जदारांनी गुंज अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 'गुंज फेलोशिप' विभागावर क्लिक करावे.
- त्यांना अर्जावर क्लिक करावे लागेल.
- अर्ज इंग्रजी किंवा हिंदीमध्ये भरावा लागेल.
- गुंज फेलोशिप ऑफलाइन फॉर्म आणि गुंज फेलोशिप ऑनलाइन फॉर्म दोन्ही स्क्रीनवर प्रदर्शित केले आहेत.
- ऑनलाइन अर्जदाराने नाव, वय, लिंग, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी सर्व आवश्यक डिटेल्स भरावेत.
- उमेदवाराने काही प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.
- गुंज फेलोशिप मुलाखतीसाठी शहर निवडा आणि CV, SOP आणि रेफरी डिटेल्स अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज सबमिट करावा.
गुंज फेलोशिप अटी आणि नियम
या फेलोशिपसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे जसे की, अर्जदार फेलोशिपसाठी अर्ज का करत आहे? त्याला/तिला अनुभवातून काय मिळण्याची आशा आहे फेलोशिपमुळे त्यांना भविष्यातील कामाची योजना आखण्यात कशी मदत होईल. गुंजचे दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, ऋषिकेश, चेन्नई, कोची आणि मुंबई येथे कार्यालये आहेत. उमेदवारांना गरज आणि आवडीच्या आधारावर कोणत्याही ठिकाणी ठेवले जाते. फेलोशिप कालावधी दरम्यान फेलोने कोणताही ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोर्स करू नये.
फेलोशिप दरम्यान उमेदवाराला कोणत्याही ग्रामीण, शहरी भागात अल्प किंवा दीर्घ मुदतीसाठी ठेवता येईल. उमेदवाराचे मुद्दे आणि कल्पना गुंजच्या चालू कामाशी म्हणजेच प्रकल्पांशी जुळल्या पाहिजेत. अर्जदाराची विशिष्ट आवड असल्यास, त्यांनी अर्ज आणि मुलाखतीत त्याचा उल्लेख करावा. सोशल वर्क, लिबरल आर्ट्स, एंटरप्रेन्युअरशिप स्टडीज आणि गांधी फेलोशिप, टिच फॉर इंडिया फेलोशिप, YIF, जागृती यात्रा यासारख्या इतर प्रतिष्ठित फेलोशिप करत असलेले अर्जदार फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत परंतु त्यांना कोणतेही अतिरिक्त प्राधान्य दिले जाणार नाही.
फेलोशिप 12 महिन्यांसाठी असेल आणि फेलोशिप पूर्ण होण्यापूर्वी कधीही सोडलेल्या कोणत्याही उमेदवारास कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार नाही. फेलोशिपचा लॉक-इन कालावधी 6 महिन्यांचा असतो, या दरम्यान फेलोशिप सोडल्यास, फेलोला फेलोशिप प्रमाणपत्र दिले जाणार नाही आणि एक महिन्याचे स्टायपेंड काढले जाईल.
source: www.jotform.com