• 06 Jun, 2023 18:05

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rajiv Singh Networth: रिअल इस्टेट क्षेत्रातील किंग! DLF चेअरमन राजीव सिंग यांची नेटवर्थ जाणून घ्या

Rajiv Singh Networth

भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे राजीव सिंग. ते डीएलएफ कंपनीचे प्रमुख असून त्यांची नेटवर्थ 59,030 कोटी रुपये आहे. रिअल इस्टेट सोबतच इतरही अनेक क्षेत्रात DLF कंपनीने पाय रोवला आहे. भारतातील टॉप टेन रिअल इस्टेट बिझनेसमन कोण आहेत ते सुद्धा या लेखातून जाणून घ्या.

Rajiv Singh Networth: भारतामध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा पसारा अफाट आहे. भारताची लोकसंख्या चीनला मागे टाकून पुढे गेली आहे. निवासी इमारती, कमर्शिल कॉम्पलेक्स, पायाभूत सुविधा अशा क्षेत्रांमध्ये अनेक रिअल इस्टेट कंपन्या आहेत. नुकतेच GROHE-HURUN इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट 2023 जाहीर झाली आहे. यामध्ये डीएलएफ कंपनीचे चेअरमन राजन सिंग यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.

या श्रीमंत रिअल इस्टेट टायकूनच्या यादीत राजन सिंग पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 59,030 हजार कोटी इतकी आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यानंतर मंगल प्रभात लोढा यांचा क्रमांक लागतो.

राजीव सिंग कोण आहेत?

डीएलएफ रिअल इस्टेट ही कंपनी रघुवेंद्र सिंग यांनी स्थापन केली होती. मात्र, नंतर त्यांचे जावई कुशल पाल सिंग यांच्याकडे कंपनीची धुरा आली होती. राजीव सिंग हे कूशल पाल सिंग यांचे पुत्र आहेत. वयाच्या 90 व्या वर्षी कुशल पाल सिंग यांची निवृत्ती घेतल्यानंतर डीएलएफ व्यवसायाची जबाबदारी राजीव सिंग यांच्यावर आली. त्याआधी ते व्हाइस चेअरमन होते. सिंग कुटुंब हे मुळचे उत्तर प्रदेशातील मेरठ येथील आहे. तर डीएलएफ कंपनीचे मुख्यालय हरियाणातील गुरगाव येथे आहे.

कंपनीची सुत्रे हाती घेतल्यानंतर राजीव सिंग यांनी हॉस्पिटॅलिटी, पुनर्रबांधणी, विमा आणि रिटेल क्षेत्रातही उडी घेतली. सोबतच बांधकाम व्यवसाय आणखी वाढवला. 2008 ते 2012 याकाळात डीएलएफ इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच IPL चे प्रमुख स्पॉन्सर होते. 2007 पासून राजीव सिंग कंपनीतील विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. या काळात त्यांनी कंपनीचा व्यवसाय 1.55 कोटींवरुन 2 हजार 900 कोटींवर नेला.

top-10-real-estet.jpg

राजीव सिंग यांनी मॅसाच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पदवी शिक्षण घेतले आहे. मॅकॅनिकल इंजिनिअरिंगमध्येही त्यांनी पदवी घेतली आहे. 

राजीव सिंग यांची नेटवर्थ?

2021-22 आर्थिक वर्षात डीएलएफने निव्वळ नफा 6,138 कोटी रुपये कमावला होता. तर एकूण नफा 1,513 कोटी रुपये होता. 2020-21 वर्षात राजीव सिंग यांनी 3.2 कोटी रुपये कमावले. तर पुढील वर्षी त्यांना इनकम 15.49 वर गेला. त्यांची एकूण संपत्ती 59,030 हजार कोटी रुपये आहे.

इतर श्रीमंत बांधकाम व्यावसायिक

मंगल प्रभात लोढा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 42,270 कोटी रुपये आहे. (Top ten real estate businessman in India) अर्जुन मेंधा यांची RMZ Corp ही कंपनी तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 37,000 कोटी रुपये आहे.