Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Australian Universities: ऑस्ट्रेलियातील आणखी दोन विद्यापीठांत भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेशास बंदी; काय आहे कारण?

Australian Universities

भारतातील काही ठराविक राज्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील दोन नामांकित विद्यापीठांनी प्रवेश घेण्यास बंदी घातली आहे. व्हिक्टोरिया शहरातील फेडरल युनिव्हर्सिटी आणि वेल्स शहरातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाने पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मागील महिन्यातही काही ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी बंदी घातली होती.

Australian Universities: भारतातील काही ठराविक राज्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील दोन नामांकित विद्यापीठांनी प्रवेश घेण्यास बंदी घातली आहे. व्हिक्टोरिया शहरातील फेडरल युनिव्हर्सिटी आणि वेल्स शहरातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाने पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मागील महिन्यातही काही ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी बंदी घातली होती. 

या दोन्ही विद्यापीठांनी तसे अधिकृत पत्रक जाहीर केले असून ऑस्ट्रेलियातील स्थानिक माध्यमांमध्ये हे पत्रक छापून आले आहे. तसेच अॅडमिशन एजंटपर्यंत सुद्धा ही माहिती पोहचवण्यात आली आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्ड वृत्तपत्राने यासंबंधित वृत्त दिले आहे. 

पंतप्रधान मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले असून तेथील स्थानिक आणि भारतीय विद्यार्थ्यांशी त्यांनी संपर्क साधला. दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक देवाणघेवाण वाढावी यासंबंधी चर्चाही केली. दोन्ही देशांमध्ये स्टुंडट एक्सचेंज संबंधित करारावर सह्या देखील झाल्या. मात्र, असे असताना ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनवर निर्बंध घातले आहेत.

विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांवर बंदी घालण्याचे कारण काय?

ऑस्ट्रेलियातील गृह मंत्रालयाने भारतातील काही राज्यातील विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज अनियमितता, बनावट अर्ज या कारणामुळे नाकारले आहेत. शिक्षणाच्या नावाखाली व्हिसा घेऊन ऑस्ट्रेलियात नोकरी करण्यासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. ही चतुराई तेथील गृहमंत्रालयाच्या लक्षात आल्याने विद्यार्थ्यांचे व्हिसा नाकारले आहेत. काही ठराविक राज्यांतील व्हिसावर विद्यापीठांनी बंदी घातली आहे. या आधीही ऑस्ट्रेलियातील काही विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे.

भारतीय विद्यार्थ्यांवरील ही बंदी तात्पुरती असू शकते, अशी आशा व्यक्त करतो, असे विद्यापीठांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मागील महिन्यात व्हिक्टोरिया विद्यापीठ, Edith Cowan विद्यापीठ, टॉरेन्स विद्यापीठ आणि साउथर्न क्रॉस विद्यापीठाने भारतातील काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर निर्बंध घातले होते. या राज्यातील विद्यापीठांचे प्रवेशाचे अर्ज बनावट होते असे विद्यापीठांनी म्हटले होते. भारतीय विद्यार्थ्यांना नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात यायचे आहे, शिक्षणासाठी नाही, असे त्यांनी म्हटले होते.

2022 शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी ऑस्ट्रेलियात प्रवेश घेतला होता त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्ध्यातून सोडून नोकरी सुरू केली. असे निरीक्षण विद्यापीठांनी नोंदवले पंजाब, हरियाणा, गुजरात या राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून दिल्याचेही विद्यापीठांनी म्हटले आहे. बंदी घातलेल्या राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश सुरळीत चालू राहतील, असेही विद्यापीठांनी म्हटले आहे. मे आणि जून महिन्यांपर्यंत बंदी राहण्याची शक्यता आहे.

चार पैकी एक अर्ज बनावट

प्रवेश घेण्याची प्रक्रिया आणखी कठीण करणार असल्याचेही ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांनी म्हटले आहे. फक्त शिक्षण घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यापीठांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाचे नियम आणि शैक्षणिक शुल्क याचाही फेरविचार विद्यापीठे करणार आहेत. चार पैकी एक अर्ज बनावट असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.