Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

महिला बचत गट म्हणजे काय? महिलांना यातून काय फायदा होतो?

Mahila Bachat Gat

Mahila Bachat Gat: महिला बचत गट सध्या सर्वत्र प्रचलित झालेला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी उद्योग स्थापन केले त्या उद्योगाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून दिला. मग आता हा प्रश्न पडेल की हा बचत गट नेमका स्थापन कसा होतो बचत गट स्थापन करण्यासाठी काय प्रोसेस आहे, ती जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Mahila Bachat Gat: आपण कमावलेल्या पैशातून आपले  घर चालावे आणि आपल्या मुलाबाळांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे  इतकीच अपेक्षा एका सामान्य स्त्रीची असते.  घरातील पुरुष जरी कमावता असला तरी त्या पैशांची विल्हेवाट ही स्त्रीच लावत असते. घरातील कोणत्या कामाला किती खर्च व्हावा आणि किती खर्च करून त्यातून बचत होऊ शकेल हे सर्व नियोजन स्त्रियांचे नेहमी झालेले असते.  मग आता पैसे थोडे आणि त्यात  बचतही करायची तर मग बचतीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि सर्वांच्या परिचयाचा असलेला भाग म्हणजे महिला बचत गट.  महिला बचत गट सध्या सर्वत्र प्रचलित झालेला आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी उद्योग स्थापन केले त्या उद्योगाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून दिला.  मग आता हा प्रश्न पडेल की हा बचत गट नेमका स्थापन कसा होतो बचत गट स्थापन करण्यासाठी फार सोपी प्रोसेस आहे, ती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. 

बचत गट म्हणजे काय?  

गावातील दहापेक्षा जास्त किंवा दहा महिला एकत्र येऊन बचत गट तयार करू शकतात. बचत गट हा एक सामाजिक आणि आर्थिक उपक्रम आहे. हा उपक्रम एकमेकांना समजून घेऊन तयार होत असल्याने याला स्वयंसहाय्य गट असेही म्हटले जाते. बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट होय. बचत गट दोन प्रकारचे असतात, 1. नोंदणीकृत 2. अनोंदणीकृत. 

नोंदणीकृत

नोंदणीकृत बचत गटांची नोंदणी ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका आधी स्वायत्त संस्थांनी नेमलेले अधिकारी नाबार्ड महिला आर्थिक विकास महामंडळासारखी मंडळी व अशासकीय संस्था येथे केली जाते. शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. 

अनोंदणीकृत

 या बचत गटांमध्ये सर्व बाबी आलेल्या बचतवर अवलंबून असतात. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. म्हणून बचत गट नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर काही बचत गट दारिद्रय   रेषेखालील असतात तर काही APL मध्ये असतात. दारिद्रय  रेषेखालील बचत गटांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत असतो. 

बचत गटाचे नियम 

  • सर्वाना दरमहा समान रक्कम बचत म्हणून जमा करावी लागते.
  •  ठरलेल्या तारखेला बचत जमा करून मीटिंग घ्यावी लागते. 
  • जमा झालेली बचत बँकमध्ये ठरलेल्या दिवशी जमा केल्यास दंड भरावा लागतो. 
  • बचत गटातून निघतांना घेतलेले कर्ज, व्याज सर्व नील करूनच त्यातून निघता येते. 
  • घेतलेल्या कर्जाचे हप्ते दरमहा वेळेवर भरणे अनिवार्य असते, अन्यथा दंड आकरण्यात येतो. 

बचत गटाचे फायदे

  • दरमहा बचत होते. व्यवसाय स्थापन करण्यासाठी कमी व्याजदरात भांडवल उपलब्ध होते. 
  • बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध होतो. 
  • तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमची बचत वापरायला घेऊ शकता. 
  • एकाच घरातील अधिक सदस्य बचत गटात सहभागी होऊ शकतात. 

आवश्यक कागदपत्रे 

  • सभासद पुस्तक 
  • लेजर
  • हजेरी पुस्तक
  •  नोंदणी अर्ज, कर्ज खाते उघडणे
  • जमा खर्च पत्रक 
  • अहवाल वही