Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युटेशन म्हणजे काय? What is Mutation?

Mutation

मालमत्तेवरील मालकी हक्क बदलण्यासाठी महसुली खात्याद्वारे ज्या नोंदी बदलल्या जातात, त्या प्रक्रियेला म्युटेशन असं म्हटलं जातं. हे करण्यासाठी नियमानुसार काही गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

म्युटेशनचा अर्थ महसुलीच्या नोंदीत असलेल्या मालमत्तेवरील मालकी हक्क बदलणे. जर आपल्याला एखाद्या मालमत्तेचा हक्क (Property Right) अन्य व्यक्तीच्या नावाने करायचा असेल तर यासाठी तहसिलदार किंवा समकक्ष अधिकार्‍यांकडे अर्ज करावा लागतो. म्युटेशन करण्यापूर्वी संबंधित मालमत्ता (Property) कशा प्रकारची आणि कोणत्या भागात आहे, हे सांगणे गरजेचे असते. त्यानंतर मालकी हक्क कोणत्या कायद्याच्या आधारे बदलला आहे, हे सांगावे लागते. दोन्ही पक्षाकडील लोकांचे नाव, वडिलांचे नाव, पत्ता याची नोंद करावी लागते. 

मालकी हक्क किती तारखेला बदलला हे देखील सांगावे लागते. म्युटेशनची मागणी करताना मालमत्तेशी निगडीत सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती द्याव्या लागतात. या कागदपत्रात सेल डीड आणि वारसापत्राचा (Sale Deed & Will) समावेश असतो. एखाद्या मालमत्ता कर (Property Tax) भरणार्‍या व्यक्तीने मालमत्ता विकली किंवा अन्य व्यक्तीच्या नावाने केली तर त्याची माहिती महानगरपालिकेला देणे अनिवार्य आहे.


मालमत्ता व्यवहारावर आक्षेप आल्यास

मालमत्तेच्या व्यवहारात एखाद्या पक्षकाराने आक्षेप घेतल्यास त्या विभागातील महसूल सहाय्यकाकडे सुनावणीसाठी हे प्रकरण पाठविले जाते. जर कोणताही पक्ष महसूल सहाय्यकाच्या निकालाने समाधानी नसेल तर तो आदेश दिल्यानंतर महिन्याभरात डेप्युटी कमिशनकरकडे (Deputy Commissioner) अपील करू शकतो.

सरकारी शुल्क

मालमत्ता ट्रान्सफर (Property Transfer) करण्यासाठी सरकारकडे टॅक्स म्हणून काही रक्कम भरावी लागते. जर मालमत्तेत एखाद्या भागाचे म्यूटेशन (Mutation) करायचे असेल तर संबंधित भागासाठी सरकारने नियमाने ठरवल्यानुसार शुल्क (Fee) भरावे लागते. जर संपूर्ण मालमत्ता विकायची असेल तर संपूर्ण मालमत्तेसाठी शुल्क भरावी लागते. मालमत्ता कर आणि अन्य शुल्क (Property Tax & Other Charges) भरताना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या नोंदीवहीत म्यूटेशन करणे अनिवार्य असते.

प्रशासकीय प्रक्रिया

म्युटेशनसाठी अर्ज दिल्यानंतर सरकारी विभागाकडून जाहीरात दिली जाते. नाव बदलण्यावरून आक्षेप असल्यास पंधरा दिवसात संबंधित विभागाकडे तक्रार किंवा अर्ज करावा, असे आवाहन जाहीरातीतून केले जाते. त्यानंतरच्या आक्षेप किंवा तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यानंतर संबंधित अधिकारी आपला अहवाल जमा करतो. अहवालापूर्वी दोन्ही पक्षाची बाजू आणि कागदपत्रांची खातरजमा केली जाते. जर म्युटेशनसाठी कोणीही आक्षेप घेत नसेल तर त्यास लगेच लागू केले जाते.