Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Gold Reserves 2026: जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशाकडे? जाणून घ्या

World Gold Reserves 2026: जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशाकडे? जाणून घ्या

World Gold Reserves 2026: जागतिक स्तरावर सोन्याच्या साठ्याबाबत चढाओढ सुरू असून अमेरिकेने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. भारताच्या आरबीआयने (RBI) देखील आपल्या सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ केली असून पाकिस्तान आणि बांगलादेश या शर्यतीत कुठे आहेत, ते जाणून घ्या.

सध्याच्या काळात महागाई आणि युद्धाची टांगती तलवार यामुळे जगातील अनेक देश आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सोन्याचा साठा वाढवण्यावर भर देत आहेत. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे, हे त्या देशाच्या तिजोरीतील सोन्याच्या साठ्यावरून ठरते. 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या साठ्यात कोण पुढे आहे आणि भारताची स्थिती काय आहे, याचा सविस्तर आढावा घेऊया.

जगातील टॉप 5 देश कोणाकडे किती सोनं?

सोन्याच्या साठ्याबाबत अमेरिका आजही जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेकडे सुमारे 8,133 टन सोन्याचा साठा असून तो 'फोर्ट नॉक्स' येथील अभेद्य तिजोऱ्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

जागतिक क्रमवारी:

अमेरिका: 8,133 टन

जर्मनी: 3,350 टन

इटली: 2,452 टन

फ्रान्स: 2,437 टन

रशिया: 2,330 टन

चीन सध्या 2,313.5 टन साठ्यासह सहाव्या क्रमांकावर असला तरी, गेल्या 17 महिन्यांपासून चीन सतत सोने खरेदी करत आहे. त्यामुळे लवकरच चीन टॉप 5 मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भारताची तिजोरी अधिक भक्कम

एकेकाळी 'सोन्याची चिमणी' ओळखला जाणारा भारत आता पुन्हा एकदा आपला सोन्याचा साठा वेगाने वाढवत आहे. मार्च 2026 मध्ये संपलेल्या सहामाहीत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लंडनमधून 104.23 मेट्रिक टन सोने भारतातील आपल्या स्वतःच्या तिजोऱ्यांमध्ये हलवले आहे. सध्या भारताकडे एकूण 880 टन सोन्याचा साठा असून भारत जगात एक मोठा ग्राहक म्हणूनही ओळखला जातो.

पाकिस्तान आणि बांगलादेशची स्थिती काय?

शेजारील देशांच्या तुलनेत भारताची स्थिती अत्यंत मजबूत आहे. पाकिस्तानकडे सध्या केवळ 64.77 टन सोने असून बांगलादेशचा साठा तर अवघा 14.28 टन इतकाच आहे. हे आकडे या देशांची कमकुवत आर्थिक स्थिती दर्शवतात.

सोनं खरेदीत 'हा' देश ठरला किंग!

2026 मध्ये सोने खरेदीच्या बाबतीत पोलंडने सर्वांना मागे टाकले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये पोलंडच्या मध्यवर्ती बँकेने विक्रमी 20 टन सोन्याची खरेदी केली आहे. तसेच मध्य आशियातील उझबेकिस्तान आणि कझाकस्तान या देशांनीही गेल्या महिन्यात प्रत्येकी 8 टन सोने आपल्या साठ्यात जमा केले आहे.