Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Job opportunities: नोकरकपातीचं टेन्शन? आता 'या' क्षेत्रात निर्माण होत आहेत नव्या संधी

Job opportunities: नोकरकपातीच्या या दिवसांमध्ये काही क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. एकीकडे माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रात सर्वात जास्त लेऑफ म्हणजेच नोकरकपात केली जात आहे. तर या क्षेत्राशी संबंधित काही विभागांत रोजगार उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Read More

Cybersecurity Job: सायबर सिक्युरिटी क्षेत्रात 40 हजार जॉबच्या संधी! फ्रेशर्स ते अनुभवी किती पगार मिळू शकतो जाणून घ्या

भारतामध्ये सध्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील विविध पदांच्या 40 हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत, असे TeamLease Digital या कंपनीने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. सध्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रात जे मनुष्यबळ उपलब्ध आहे ते पुरसे नाही. कौशल्याधारित कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या तंत्रज्ञानासंबंधी कौशल्य आत्मसात करून नोकरीच्या संधी तरुण पदरात पाडून घेऊ शकतात.

Read More

Tuljapur Temple Donation: तुळजापूर देवस्थानला मिळालेल्या देणग्यांची 13 वर्षानंतर पहिल्यांदाच मोजणी सुरू

देणगी म्हणून प्राप्त झालेले सोने खरे आणि किंवा बनावट याची पाहणी करण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. 2009 पासून देवस्थानाकडे जमा झालेल्या सोन्या-चांदीची, हिऱ्या-मोत्याची मोजणी 7 जूनपासूनच सुरु झाली आहे. 12 जूनपर्यंत 354 हिरे आणि 207 किलो चांदीची मोजणी करण्यात आली आहे.

Read More

BMC Covid Scam: बीएमसी कोविड घोटाळ्यात ईडीची मुंबईत छापेमारी; काय आहे हा 12 हजार कोटींचा कोविड घोटाळा?

मुंबई महापालिकेने 2019 मध्ये शहरातील कोविडचा संसर्ग वाढल्यानंतर विविध उपाययोजनांसाठी केलेल्या खर्चामध्ये 12 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याच्याशी संबंधित मुंबईतील काही व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांच्या घरावर ईडीने आज छापे टाकले.

Read More

Pandharpur Wari 2023: विठ्ठलाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या व्यवसायातून किती कुटुंबांना रोजगार मिळतो?

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीनिमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी, भाविक हे पंढरपुरला जातात. पंढरपुरात गेल्यानंतर तुळशीची माळ अर्पण करुन विठुरायाचे दर्शन घेतात. पंढरपूर वारीत तुळशीच्या माळांना आणि हारांना प्रचंड महत्त्व आहे. यामागे अनेक धार्मिक मान्यता आहेत. आज आपण विठ्ठलाला वाहिली जाणारी तुळस आणि मंजुळाच्या माळांवर किती कुटुंबाचा रोजगार चालतो? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Read More

Air India: आधुनिक वाहतूक सुविधांसाठी एअर इंडियाने एअरबस-बोईंगसोबत केला करार; 470 नवीन विमाने खरेदी करणार

Air India Boeing-Airbus Agreement: एअर इंडियाने मंगळवारी 20 जून 2023 रोजी पॅरिसच्या एअर शो 2023 मध्ये एअरबस (Airbus) आणि बोईंग (Boeing) सोबत नवीन विमान खरेदी करार केला आहे. या करारा अंतर्गत 470 नवीन विमाने खरेदी केली जाणार आहेत.

Read More

MSRTC in Profit: सरकारच्या योजनांमुळे एसटीला अच्छे दिन; मे महिन्यात 913 कोटींचे उत्पन्न

MSRTC in Profit: 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना आणि सरसकट महिलांना तिकिटामध्ये दिलेली 50 टक्के सवलत योजनेमुळे एसटीच्या प्रवाशी संख्येत तर वाढ झालीच आहे. पण त्याचबरोबर एसटीच्या उत्पन्नात वाढ देखील होऊ लागली आहे.

Read More

BOM dividend: एसबीआयनंतर बँक ऑफ महाराष्ट्रचा बंपर डिव्हिडंड, अर्थमंत्र्यांकडे दिला धनादेश

BOM dividend: एसबीआयनंतर आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक ऑफ महाराष्ट्रनं (BoM) बंपर असा डिव्हिडंड दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे या डिव्हिडंडचा चेकदेखील नुकताच देण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र वेगानं विस्तारणारी सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे.

Read More

EPFO Data: एप्रिल महिन्यात ईपीएफओमधील नवीन सदस्य संख्या 17.20 लाखांवर; नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट

EPFO Data: कामगार मंत्रालयाने मंगळवारी ईपीएफओ (EPFO) संदर्भातील डेटा जाहीर केला. या डेटानुसार एप्रिल महिन्यात नवीन सदस्य संख्या 17.20 लाखांवर पोहचली आहे. तर साधारण 2.25 लाख महिलांनी पहिल्यांदाच ईपीएफओ खाते सुरू केले आहे.

Read More

Hurun India Report: खासगी क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य सर्वात जास्त, तर अदानी ग्रुपच्या मूल्यांकनात घसरण

Hurun India Report: बरगंडी प्रायव्हेट-हुरून इंडियाने मंगळवारी देशातील 500 खासगी कंपन्यांच्या मूल्यांकन बदलाबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) देशातील सर्वात जास्त मूल्यांकन असणारी कंपनी ठरली आहे. तर अनलिस्टेड कंपन्यांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) पहिल्या क्रमांकावर आहे.

Read More

Income from Instagram: इन्स्टाग्राममधून कसा वाढेल तुमचा बिझनेस? सेलिब्रिटी कसे कमवतात पैसे? जाणून घ्या...

Income from Instagram: इन्स्टाग्राम रील्समधून तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. अनेकजण रील्स बनवतात, मात्र उद्देश केवळ मनोरंजनाचा असतो. अशावेळी एक दृष्टीकोन ठेवून रील्स बनवले तर त्यातून आर्थिक लाभ मिळणं कठीण नाही.

Read More

2000 Notes: 2000 रुपयांची नोट तुम्हाला रातोरात लखपती बनवू शकते! जाणून घ्या सविस्तर

भारतात जुने दुर्मिळ चलन, नाणी, नोटा यांचा संग्रह करण्याचा अनेकांना छंद आहे. तसेच नोटांचा नंबर काहीसा खास असेल तर त्या नोटा देखील महाग किमतीत विकल्या जातात. अशाच खास चलनाची खरेदी विक्री करणाऱ्या काही वेबसाइट्सवर, 2000 ची एक नोट 2 लाखांपर्यंत विकली जात आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण...

Read More