Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Footwear QCO: चप्पल, सँडलसाठी आता नवे नियम, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंच्या आयातीवर बंधनं

Footwear QCO: चप्पल, सँडल्स त्याचप्रमाणे पादत्राणांच्या विविध प्रकारात आता निकृष्ट दर्जा पुरवण्यास बंधनं येणार आहेत. मोठ्या आणि मध्यम स्तरावरच्या उत्पादक आणि शूज, चप्पल यांसारख्या फुटवेअर उत्पादनांच्या सर्व आयातदारांना 1 जुलैपासून 24 उत्पादनांसाठी अनिवार्य गुणवत्ता मानकांचं पालन कराव लागणार आहे.

Read More

PAN Card: पॅन कार्डशी संबंधित नकळत केलेली एक चूक पडू शकते महागात! 10 हजारांपर्यंत दंड? काय उपाय?

PAN Card: पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं एक दस्तावेज असून यासंबंधी कोणतीही चूक तुम्हाला महागात पडू शकते. इतकंच नाही तर तुम्हाला मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो. कारण पॅन कार्ड म्हणजे एकप्रकारे तुमचं ओळखपत्रच आहे. यातली चूक दंड आकारण्यास कारणीभूत ठरू शकते. हे कसं टाळावं? पाहू...

Read More

RBI on Wilful Defaulters: थकबाकीदारांच लोन RBI माफ करणार, 3.50 लाख करोड रुपयांचं होणार नुकसान!

आरबीआयने देशभरातील बँकांना आणि वित्तीय सुविधा देणाऱ्या संस्थांना एक पत्र लिहिले आहे. यानुसार विलफुल डिफॉल्टर्स (Wilful Defaulters) आणि फ्रॉड अकाउंट (Fraud Account) असलेल्या थकबाकीदारांकडून ते देऊ शकत असतील तितके पैसे घ्या आणि त्यांचे खाते बंद करा असे म्हटले आहे. काय म्हणता, आरबीआय असं काही करू शकते यावर तुमचा विश्वास बसत नाहीये? परंतु हे अगदी खरं आहे.

Read More

Tourism In India: केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि Airbnb मध्ये करार; 'Visit India 2023' अभियान राबवणार

भारतातील सांस्कृतिक आणि हेरिटेज टुरिझम वाढावे यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि Airbnb कंपनीमध्ये करार करण्यात आला आहे. 'Visit India 2023' या अभियानाद्वारे जगभरात भारतीय पर्यटनाचा प्रसार करण्यात येईल. पर्यटनस्थळी सुविधा उभारण्याबरोबरच स्थानिक रोजगार आणि नवउद्योजक निर्मितीचेही लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Read More

Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेकरुंसाठी खुशखबर, लवकर हॉटेल बुकिंग करा आणि मिळवा 30% सवलत

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरु झाली आहे. येत्या 1 जुलै पासून ही यात्रा सुरु होणार आहे आणि 31 ऑगस्टला या यात्रेचा समारोप होईल. या दरम्यान भाविकांना त्यांच्या राहण्याची सोय करावी लागते. यात्रेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांनी जम्मूमधील मुक्कामासाठी आगाऊ हॉटेल बुक केल्यास त्यांना बुकिंगवर 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय ऑल जम्मू हॉटेल्स अँड लॉजेस असोसिएशनने (AJHLA) जाहीर केला आहे.

Read More

Go First Crisis: गो फर्स्ट एअरलाईन्सचं ग्रहण सुटेना, 22 जूनपर्यंत उड्डाणे रद्द!

3 मे पासून एका पाठोपाठ एक सगळी उड्डाणे कंपनीने बंद केलेली आहेत. पायलट आणि इतर स्टाफचा पगार देखील कंपनीला देता येत नाहीये. अशातच गो फर्स्ट एअरलाइन्सने त्यांची उड्डाण सेवा 22 जून 2023 पर्यंत ठप्प राहणार असल्याची माहिती दिली आहे.

Read More

Instagram broadcast channel: भारतात सुरू झालेल्या इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनेलचं वैशिष्ट्य काय? क्रिएटर्सना फायदा?

Instagram broadcast channel: इन्स्टाग्रामनं नुकतंच ब्रॉडकास्ट चॅनेल लॉन्च केलं आहे. यानुसार लाखो क्रिएटर्स आपल्या फॉलोअर्ससोबत जोडले जाऊ शकतात. म्हणजेच क्रिएटर्स आणि फॉलोअर्स यांच्यात एक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.

Read More

7th Pay Commission: पुढील वर्षी महागाई भत्ता 50 टक्क्यांनी वाढणार; आठवा वेतन आयोगही 'या' वर्षापासून होणार लागू?

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवून दिल्याचे बोलले जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळत आहे. तो वाढवून 50 टक्के दिला जाणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 9000 रुपयांची वाढ होणार आहे.

Read More

Petrol-Diesel Sales: मॉन्सूनच्या आगमनाचा पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर मोठा परिणाम, पाहा सविस्तर आकडेवारी

Petrol-Diesel Sales: मॉन्सूनच्या आगमनाचा पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर बऱ्याच अंशी परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. शेतीसाठी पेट्रोल-डिझेलची मागणी कमी झाली आहे. तर मॉन्सूनच्या आगमनासोबतच रहदारीदेखील कमी झाल्यामुळे या वाहनांच्या इंधनाच्या विक्रीत जूनच्या पहिल्या पंधरवड्यात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More

अलर्ट! US Student Visa साठी मुलाखती लवकरच; मुलाखतीची बुकिंग कशी कराल जाणून घ्या

अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यास दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करतात. मात्र, त्याआधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यातील महत्त्वाची एक प्रक्रिया म्हणजे व्हिसा. मात्र, व्हिसा मिळवण्यासाठी दूतावास कार्यालयात मुलाखत द्यावी लागते. त्यानंतरच व्हिसा मंजूर होतो. चालू वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या व्हिसा मुलाखती लवकरच सुरू होत आहेत.

Read More

FPI Investment: विदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूक वाढली; जून महिन्यात 16 हजार 400 कोटींची गुंतवणूक

FPI Investment: भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जून महिन्यात आत्तापर्यंत ही गुंतवणूक 16 हजार 400 कोटी रुपयांवर पोहचली आहे. कोणत्या क्षेत्रात ही गुंतवणूक करण्यात आली आहे, जाणून घेऊयात.

Read More

Vehicle Parking Rule: चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केल्यास भरावा लागेल दंड, नितीन गडकरी नवा नियम आणण्याच्या तयारीत

बेशिस्तीने वाहन पार्क करणाऱ्या आणि इतर नागरिकांच्या रहदारीत अडथळा आणणाऱ्या वाहन चालकांवर आता कारवाई करण्याच्या विचारात नितीन गडकरी आहेत. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जर कोणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केले तर त्याचे छायाचित्र पाठवणाऱ्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल आणि वाहन चालकाला 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

Read More