Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Electricity tariff : दिवसा स्वस्त, रात्री महाग होणार वीज दर; शेतकऱ्यांना दिलासा

केंद्रीय उर्जा मंत्रालयाने वीज दराच्या नियमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना दिवसा वीज वापरल्यास कमी बिल आकारले जाईल. तसेच रात्रीच्यावेळी जेवढी वीज वापरली जाणार आहे. त्या विजेच्या दरामध्ये वाढ केली जाणार आहे. दिवसा वापरण्यात येणाऱ्या वीजचा दर हा 20% स्वस्त तर रात्रीचा वीज दर हा 20% महाग असणार आहे.

Read More

Finology India Survey: 75 टक्के भारतीयांकडे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कोणताही फंड नाही; सर्वेक्षणातून माहिती उघड

Finology India Survey: पर्सनल फायनान्स प्लॅटफॉर्म 'फिनोलॉजी इंडिया'ने (Finology India) भारतीय लोकांच्या आर्थिक नियोजनाबाबत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. नेमकं काय म्हटलं आहे या सर्वेक्षणात, जाणून घेऊयात.

Read More

Apple Card: एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने अ‍ॅपल लवकरच क्रेडिट कार्ड लाँच करणार

HDFC Bank आणि भारतीय नियामक संस्थांशी अ‍ॅपलची बोलणी सुरू असून येत्या काळात ग्राहकांना 'अ‍ॅपल कार्ड' दिसू शकेल. दिल्ली आणि मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे दोन स्टोअर सुरू करून अ‍ॅपलने भारतातील उद्योग वाढीच्या अध्यायाला सुरुवात केली आहे. आता अ‍ॅपल कंपनी HDFC बँकेच्या सहकार्याने क्रेडिट कार्ड आणण्याच्या तयारीत आहे.

Read More

Suhana Khan: शाहरूख खानची मुलगी सुहानाने अलिबागमध्ये खरेदी केली 13 कोटींची प्रॉपर्टी

Suhana Khan: सुहाना खानने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच आपल्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे. अलिबागमध्ये विकत घेतलेल्या या प्रॉपर्टीची किंमत 12.91 कोटी रुपये आहे. तिने थल गावात 1.5 एकर जागा खरेदी केली आहे. या जागेत जमिनीबरोबरच 3 घरे देखील आहेत.

Read More

Electricity Tariff Rule: वीज बिलात 20% बचत होणार! कोणत्या वेळी वीज वापरता त्यानुसार दर आकारणीचा नियम जाणून घ्या

ऊर्जा मंत्रालयाने देशभरात वीज बील आकारणी नियमावलीत बदल केला आहे. नव्या नियमांनुसार ग्राहकांना 20% पर्यंत वीजबील वाचवता येईल. दिवसभरात तुम्ही कोणत्या वेळी वीज वापरता त्यानुसार विजेचे दर ठरतील. जेव्हा विजेची मागणी जास्त असेल तेव्हा प्रति युनिट दरही जास्त राहील. जेव्हा विजेचा दर सर्वात कमी आहे तेव्हा घरकामे उरकून नागरिक बील कमी करू शकतात.

Read More

RBI Governor on Inflation: महागाईशी मुकाबला अजूनही बाकी! रेपो रेटबद्दल काय म्हणाले RBI गव्हर्नर, जाणून घ्या

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे की, महागाई नियंत्रणात आली असली तरी महागाईविरोधात आपल्याला आणखी भरपूर योजना करायच्या आहेत. महागाई विरोधात भारताची ही अर्धी लढाई आहे, चलनवाढीचा धोका अजूनही कायम आहे, त्याविरोधात आरबीआयला उपायोजना करायच्या आहेत, असे ते म्हणाले आहेत.

Read More

FASTag Collection Grow: फास्टटॅगमुळे सरकारच्या तिजोरीत वाढ; मागील 5 वर्षात महसुलात दुपटीने वाढ

FASTag Collection Grow: संपूर्ण देशभरात 964 पेक्षा अधिक टोल नाके आहेत; जिथे फास्टटॅग प्रणाली लावण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 143 तर महाराष्ट्रात 84 फास्टटॅग प्रणाली असलेले टोलनाके आहेत.

Read More

गुड न्यूज! अमेरिकन कंपनी मायक्रॉन भारतात 825 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार; तरुणांना 5 हजार जॉबच्या संधी

मायक्रॉन कंपनीचा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. नव्याने सुरू होणाऱ्या कंपनीत 5 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील. थेट रोजगारासोबतच अप्रत्यक्ष रोजगारही मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. सेमीकंडक्टर चीप तयार करणारी मायक्रॉन ही आघाडीची कंपनी आहे. फॉक्सकॉन नंतर आता मायक्रॉनचा चीप निर्मिती प्रकल्प गुजरातच्या पदरात पडला आहे.

Read More

Vande Bharat Train: तिकीट परवडत नसल्याने प्रवाशांनी फिरवली पाठ, ‘ही’ वंदे भारत ट्रेन होणार रद्द

महागडे तिकीट दर असल्यामुळे प्रवाशांनी वंदे भारत ट्रेनकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे. गेल्या एकाही महिन्यांपासून नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस 50% क्षमतेने सुरु होती. प्रवाशांची कमतरता असल्यामुळे ट्रेनचा परिचालन खर्च देखील भागत नव्हता. त्यामुळे या मार्गावरील ट्रेन रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

Read More

Pandharpur Wari 2023 : विठ्ठल मंदिराचा 73 कोटींचा विकास आराखडा मंजूर

राज्य शासनाने विठ्ठल मंदिर (Vitthal Mandir Pandhrpur) च्या विकासासाठी 73 कोटी 85 लाख 95 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. या विकास आराखड्यास गुरूवारी अंतिम मंजुरी दिली आहे. या निधीतून विठ्ठल मंदिर (Vitthal Mandir)आणि परिसराचे संवर्धन आणि विकास केला जाणार आहे.

Read More

Shirdi Sai Baba Temple: साईबाबांच्या चरणी 2 हजाराच्या नोटांचा खच; एक महिन्यात अडीच कोटी रुपये दानपेटीत जमा

2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही मुदत RBI नं दिलीयं. त्याआधी नागरिक 2 हजारांच्या नोटांची विल्हेवाट वेगवेगळ्या प्रकारे लावत आहेत. डी मार्टमध्ये किराणा माल खरेदी करण्यापासून ते पेट्रोल पंपावर टाकी फुल्ल करण्यापर्यंत 2 हजाराच्या गुलाबी नोटांची चलती आहे. दरम्यान, शिर्डीतील साईबाबा संस्थानात 2 हजार रुपये नोटेच्या स्वरुपात जमा होणारी देणगी कोटींच्या घरात गेली आहे.

Read More

Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठल-रखुमाईच्या दगडी मूर्तींनी सजली पंढरपूर नगरी; दरवर्षो होते कोट्यवधी रुपयांची उलाढाल

Ashadhi Ekadashi 2023: देव आणि दगड यांच्यातील दोन टोकांचे अंतर मिटवण्याचे सामर्थ्य शिल्पकलेत आहे. या शिल्पकलेच्या माध्यमातून पंढरपुरातील वडार समाज आजही दगड्याच्या माध्यमातून विठ्ठलाला घरोघरी पोहचवत आहेत. दगडी मूर्तीच्या विक्रीतून दर आषाढी एकादशीला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.

Read More