आषाढी एकादशीसाठी (Ashadhi Ekadashi) राज्यासह देशातील विविध भागातून वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. 29 जून रोजी पंढरपुरात चंद्रभागेतीरी वैष्णवांचा मेळा दाखल होणार आहे. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी येणाऱ्या वारकऱ्यांसह हजारो भाविक भक्त एकादशीला पंढरपुरात दाखल होणार आहेत. यंदाच्या आषाढी वारीला (Ashadhi wari) सुमारे 17 लाख वारकरी पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या वारीसाठी राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेतच. त्याच प्रमाणे मध्य रेल्वे विभाग (central railway) देखील यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपूर आषाढी एकादशी (Pandharpur Ashadhi Ekadashi) या विशेष गाड्यांचे (special Train) नियोजन केले आहे. त्याबाबतचा आढावा आज आपण घेणार आहोत..
Table of contents [Show]
पंढरपूर आषाढी एकादशी विशेष रेल्वे- Special Train for Ashadhi wari
आषाढी एकादशी निमित्त सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस सर्वच वारकऱ्यांना लागली आहे. पायी चालणारे लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेकडून नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-पंढरपूर या मार्गावर “पंढरपूर आषाढी एकादशी” (Pandharpur Ashadhi Ekadashi)या विशेष गाडीच्या तब्बल 78 फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या मध्य विभागाने दिली आहे.
वारकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार-
आषाढी एकादशीमुळे पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एसटी बस, खासगी वाहनांनी प्रवास करण्यासोबतच रेल्वेने देखील येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, गर्दीचा हंगाम पाहून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून तिकीटाचे दर वाढवून प्रवाशांची लूट केली जाते. तुलनेत रेल्वेचा प्रवास हा आरामदायी आणि कमी खर्चात होतो. आषाढीवारीसाठी रेल्वे विभागाने 76 विशेष गाड्यांची सोय केल्याने नागपूर, अमरावती अशा लाबूंन येणाऱ्या वारकऱ्यांना रेल्वेची विशेष सेवा परवडणारी आहे. त्याच बरोबर रेल्वेकडून विशेष गाड्या चावण्यात येत असल्याने वारकऱ्यांना वेळेत पंढरपुरात दाखल होता येणार आहे. या शिवाय नामदेव पायरी, कळस दर्शन, चंद्रभागा स्नान करून पुन्हा परतीच्या प्रवासासाठी देखील या विशेष रेल्वेचा लाभ घेता येणार आहे.
या मार्गे धावतील गाड्या- Special Train route
आषाढी एकादशी चालवण्यात येणाऱ्या या विशेष रेल्वेची सेवा 25 जून पासून सुरू होणार आहे. या गाड्या नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर,अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, लातूर-पंढरपूर तसेच मिरज-पंढरपूर अशा धावणार आहेत. भुसावळहून पंढरपूरला जाण्यासाठी 2 विशेष गाड्या धावणार असून त्या भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव,अहमदनगर, दौंड मार्गे पंढरपुरात दाखल होतील.
विशेष रेल्वेचे वेळापत्रक (special Train Time table)
नागपूर- मिरज (पंढरपुरातून पुढे मार्गस्थ)
- 25 आणि 28 जूनला सकाळी 8:50 ला सुटेल. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पंढरपुरात दाखल होईल.
- 26 आणि 29 जूनला सायंकाळी 5 वाजता पंढरपुरातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:25 वाजता नागपूरला पोहोचेल.
नागपूर- पंढरपूर विशेष ट्रेन
- 26 आणि 29 जूनला सकाळी 8:50 ला सुटेल. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पंढरपुरात दाखल होईल.
- 27 आणि 30 जूनला सायंकाळी 5 वाजता पंढरपुरातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:25 वाजता नागपूरला पोहोचेल.
अमरावती पंढरपूर, लातूर, मिरजहून जाणाऱ्या भाविकांसाठी
- 25आणि 28 जूनला दुपारी 2:40 वाजता अमरावतीहुन सुटेल; दुसऱ्या दिवशी सकाळी 9:10 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
- 26 आणि 29 जूनला सायंकाळी 7:30 वाजता पंढरपुरातून सुटेल; दुसऱ्या दिवशी 12:40 वाजता अमरावतीला पोहोचेल.
खामगाव ते पंढरपूर
- 26आणि 29 जूनला सकाळी 11:30 वाजता खामगावहून सुटेल; दुसऱ्या दिवशी दुपारी 3:30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
- 27 आणि 30 जूनला पहाटे 5 वाजता पंढरपुरातून सुटेल; दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:30 वाजता खामगावात.
भुसावळ ते पंढरपूर
- 28 जून ला भुसावळ येथून दुपारी 1:30 वाजता सुटेल; 29 जूनला पहाटे 3:30ला पंढरपुरात दाखल होईल
- 28 जूनला पंढरपुरातून रात्री 10:30 ला सुटेल; 29 जूनला दुपारी 1:00 वाजता भुसावळा पोहोचेल.
- जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी स्थानकांत थांबेल.
लातूर पंढरपूर (8 विशेष गाड्या) Latur-Pandharpur
23, 27, 28 आणि 30 जून रोजी
- सकाळी 07.30 वाजता लातूरातून सुटेल; त्याच दिवशी दुपारी 12.25 मिनिटांनी पंढरपुरात पोहोचतील.
- दुपारी 1.50 वाजता पंढरपुरातून सुटेल; त्याच दिवशी सायंकाळी 7.20 वाजता लातूरात पोहोचेल.
या गाड्या हंरगूळ, औसा रोड, मुरूड, ढोकी, कळंब रोड, येडशी, धाराशिव,पांगरी, बार्शी,शेंद्री, कुर्डूवाडी,मोंडनिंब या स्थानकात थांबतील.
मिरज - पंढरपूर Miraj-Pandharpur (10 विशेष गाड्या)
24, 26, 27 जून, 01 जुलै, 3 जुलै रोजी
- सायंकाळी 4:00 वाजता मिरजेतून निघेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 8.20 वाजता पंढरपुरात दाखल होईल.
- सकाळी 9:00 वाजता पंढरपुरातून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.15 वाजता मिरजेत पोहोचेल.
24 जून ते 3 जुलै रोजी नियमित मिरज - पंढरपूर- मिरज
- दररोज पहाटे 5 वाजता मिरजेतून सुटेल; सकाळी 7:30 वाजता पंढरपुरात पोहोचेल
- दररोज सकाळी 9:50 वाजता पंढरपुरातून सुटेल; दुपारी 1:50 वाजता मिरजेत पोहोचेल
24 जून ते 3 जुलै रोजी नियमित मिरज - कुर्डूवाडी- मिरज (पंढरपूर मार्गे)
- दररोज दुपारी 3:10 वाजता मिरजेतून सुटेल; सायंकाळी 6:50 वाजता कुर्डूवाडीत पोहोचेल
- दररोज सायंकाळी 7:55 वाजता कुर्डूवाडीतून सुटेल; रात्री 11:45 वाजता मिरजेत पोहोचेल